• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Salute To Milestone Marathi Drama Plays Nrvb

‘माईलस्टोन’ नाटकांना सलाम!

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे जुन्या, गाजलेल्या, दर्जेदार मराठी नाटकांचे चित्रिकरण करून जतन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. तसेच शासनाच्या दप्तरी नाटकांची यादी आणि नाट्यसंस्था यांचीही जमावाजमाव सुरू आहे. जेणेकरून जो समृद्ध नाटकांचा वारसा भावी पिढ्यान् पुढे जागर होईल. अशा योजना - प्रकल्पांचे स्वागत होणं काळाची गरज आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 12, 2023 | 06:01 AM
‘माईलस्टोन’ नाटकांना सलाम!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी नाटकांना पावणेदोनशे वर्षाची परंपरा आहे. काळानुरूप त्यात बदल होत गेले. अगदी विषयापासून ते सादरीकरणापर्यंतची त्यात विविधता आहे. मराठी माणसाचे दोन ‘विकपॉईंट’ म्हणून ओळखले जातात. त्यात एक राजकारण आणि दुसरं नाटक! परिस्थिती बदलत गेली. मनोरंजनाचे शेकडो पर्याय समोर उभे ठाकले पण तरीही नाटकांबद्दलचे प्रेम हे कमी झालेले नाही. शनिवार – रविवार वर्तमानपत्रातली दोन पाने ही नाटकासाठी गच्च भरलेली असतात. घरबसल्या चॅनलवरली करमणूकीची सवय झालेल्या कोरोनाच्या दोन वर्षाच्या मध्यंतरानंतरही नाट्यगृहे बहरू लागली आहेत. एकूणच ‘नाटक’ हे क्षेत्र रसिकांच्या दृष्टीने आजही बाद झालेलं नाही. होणार नाही. त्यामागे कोट्यवधी रुपयांचे अर्थचक्रही आहे. शेकडोंना रोजगाराची संधी देखिल आहे… असो.

आता मराठी रंगभूमीवरही गाजलेली नाटके हा विषय तसा संशोधनाचा. अथांग असा पसरलेला. तरीही त्याची मांडणी करतांना संगीत नाटके, गद्य नाटके, लोकनाट्ये प्रायोगिक – समांतर नाटके, एकांकिका – दीर्घांक, व्यावसायिक नाटके असे वर्गीकरण करता येईल. जगातील सर्वच देशातील नाटकांचा विचार करता त्यांचा शुभारंभ हा कुठेतरी देवाधर्माशी, रितीपरंपरेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जोडलेला दिसतो. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने मराठीतही नाट्य जन्माला आलय. आज ते एक पूर्णवेळ व्यवसायच बनलय.

१८८१ च्या सुमारास मराठी रंगभूमीवर सुरू झालेला संगीत नाटकांचा प्रवाह हा पुढे किर्लोस्कर, खाडिलकर, देवल, गडकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, आचार्य अत्रे, मो. ग. रांगणेकर यांनी कल्पकतेने पुढे नेला. पण १९३५ नंतर संगीत नाटकांना काहीशी मरगळही आली होती. त्यावेळी पत्रकार, नाटककार विद्याधर गोखले यांनी ‘मंदारमाला’ नाटकाने नवी उर्जा भरली. चित्रपटात शास्त्रीय संगीत वाढले होते. त्यावेळी रसिकांच्या बदलत्या अभिरुचीला सामोरं जाण्यासाठी त्यांनी करिष्मा केला. ‘मंदारमाला’ त्यात आघाडीवर ठरले. मंदारमालाचे शंभरावर प्रयोग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या रंगमंदिरने केले. नंतर राजाराम शिंदे यांनी त्यांच्या ‘मंदारमाला’ने जबाबदारी घेतली आणि उभ्या देशभरात दौरे करून नाबाद चारशे प्रयोगांचा महाविक्रम केला. त्यावेळी अन्य राज्यात दौरे आणि प्रयोगांचा हा विक्रम म्हणजे एक चमत्कारच होता.

संगीत नाटकाच्या वाटेवर अनेक कलाकारांवर रसिकांनी जीव ओतून प्रेम केले त्यात बालगंधर्व नंबरवनवर आहेत. प्रयोग हमखास हाऊसफुल्ल होणारच! पुढे हा मान डॉ.काशिनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले यांनी पटकावला. डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, भरत जाधव, संतोष पवार, विजया मेहता, निळू फुले, मच्छिंद्र कांबळी यांच्याभोवतीही रसिकांचे आकर्षण होते. त्यांच्या भूमिका बघण्यासाठी नाटकाला गर्दी होत होती. भालचंद्र पेंढारकर, फैय्याज, किर्ती शिलेदार, मा. दत्ताराम, पं. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, मा. दिनानाथ, केशवराव भोसले यांच्या नाटकातील पदांनी रसिकांना रात्र-रात्र जागविले! गाजविले!!
काही गाजलेल्या संगीत नाटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात संशयकल्लोळ, शारदा (गोविंद बल्लाळ देवल), राजसंन्यास, एकच प्याला, भावबंधन (राम गणेश गडकरी), सौभद्र, शाकुंतल (अण्णासाहेब किर्लोस्कर), कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, स्वयंवर, द्रौपदी (कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर) स्वरसम्राज्ञी, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, मंदारमाला, सुवर्णतूला, मेघमल्हार (विद्याधर गोखले), कट्यार काळजात घुसली (पुरुषोत्तम दारव्हेकर), ययाती आणि देवयानी (वि. वा. शिरवाडकर), मत्स्यगंधा (वसंतराव कानेटकर) प्रितीसंगम, लग्नाची बेडी (आचार्य अत्रे), कुलवधू (मो. ग. रांगणेकर), अवघा रंग एकचि झाला (मीना नेरुरकर), रेशमगाठी (आनंद म्हसवेकर), दुरीतांचे तिमिर जावो (बाळ कोल्हटकर), देवबाभळी (प्राजक्त देशमुख).

१९२० ते १९५० या काळात अनेक राज्यातील – देशातील घडलेल्या घटना आणि चळवळींचे परिणाम हे नाटकातील विषयांवर पडले. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उ:शाप, तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘खराब्राह्मण’. या नाटकांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ही तिन्ही नाटके एका टप्प्यावरली ठरतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकूण तिन नाटके लिहिली. त्यातले पहिले ‘उ:शाप’, दुसरे ‘संन्यस्त खड्ग’ आणि तिसरे ‘सं. उत्तरक्रिया’. ही तिन्ही नाटके त्यांनी चक्क रत्नागिरीत पोलिसांच्या नजरकैदेत गजाआड लिहीली. त्यांच्यातला सशक्त क्रांतीचा पूरस्कर्ता ‘संन्यस्त खड्ग’ यात दिसतो.

तर ‘उ:शाप’मध्ये मुस्लीम राज्यकर्त्यांना विरोध आहे‌. काहीसा प्रचारी थाट संवादात असला तरी तत्कालीन राजकीय – सामाजिक परिस्थितीचे पडसाद त्यात आहेत. ‘किर्लोस्कर’ आणि ‘देवल’ यांनी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ उभा केला. तिथपासूनचा हा प्रवास. अगदी आजही २०२२ वर्षात विक्रमी पुरस्काराचे मानकरी ठरलेले प्राजक्त देशमुख यांचे संगीत देवबाभळी! म्हणजे संगीत नाटकाबद्दलचे आकर्षण रसिकांमध्ये कायम आहे. पूर्वीप्रमाणे संगीत नाटके जरी संख्येने रंगमंचावर येत नसली तरीही दर्जेदार नाटकांचे स्वागत हे आजच्या संगणकयुगात होतेय, हे दखल घेण्याजोगं आहे.

गद्य नाटकाच्या जमान्यात पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर, बबन प्रभू, आचार्य अत्रे, पुरुषोत्तम दारव्हेकर, विश्राम बेडेकर, रणजित देसाई, मधु मंगेश कर्णिक, चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर, प्रशांत दळवी, प्रेमानंद गज्वी, रत्नाकर मतकरी, मधुसूदन कालेलकर, जयवंत दळवी, गंगाराम गवाणकर – या नाटककारांनी एक पर्व गाजविले. बबन प्रभू यांच्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ हा फार्स; आचार्य अत्रे यांचा ‘तो मी नव्हेच’मधला कोर्ट ड्रामा आणि फिरता रंगमंच; शाहीर दादा कोंडके यांनी गाजविलेले ‘विच्छा माझी पुरी करा!’ हे वसंत सबनीस यांचे लोकनाट्य, विजय तेंडुलकरांचे शैलीप्रधान घाशीराम कोतवाल; गंगाराम गवाणकर यांचे मालवणी बोलीभाषेला मानाचे स्थान देणारे ‘वस्त्रहरण’; रत्नाकर मतकरी यांचे ‘वास्तवतेकडे जाणारे लोककथा ७८’; पु. ल. देशपांडे यांचे मराठी शब्दांची महती सांगणारे ‘ती फुलराणी’; केदार शिंदे यांचे ‘सही रे सही’… यादी अपूर्ण राहील. एकूणच विविधतेनं नटलेल्या अशा शेकडो नाट्यकृतींनी मराठी रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य केले…

मराठी रंगभूमीवरली ‘निवडक ११ नाटकांच्या नवलकथा’ संग्रही करण्याचा योग नाट्यअभ्यासकांसाठी जुळून आला होता. निवडक ११ नाटके आणि त्यातही ती गाजलेली असावीत, असा संयोजकांचा हेतू त्यामागे होता. २००७ साली माझा हा प्रकल्प पूर्ण झाला. कणकवली नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा लालन सारंग यांनी या पुस्तकाचे नाट्य संमेलनात प्रकाशन केले आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने संदर्भग्रंथ म्हणून याची दखल घेतली होती.

एका काळातील मानकरी नाटके म्हणूनही या संकल्पनावर शिक्कामोर्तब झालाय. त्यात निवडलेल्या नाटकात – आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच; पु. ल. देशपांडे यांची ‘ती फुलराणी’, वसंत सबनीस यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’, जयवंत दळवी यांचे ‘पुरुष’, प्रा. मधुकर तोरडमल यांचे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, वसंत कानेटकर यांचे ‘अश्रूंची झाली फुले’, विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाईंडर’, गंगाराम गवाणकर यांचे ‘वस्त्रहरण’, वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, दिलीप प्रभावळकर यांचे ‘हसवाफसवी’, वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’! यांचा समावेश केला. ही ‘माईलस्टोन’ नाटके आहेत. त्यांना सलाम!

संजय डहाळे

sanjaydahale33@gmail.com

Web Title: Salute to milestone marathi drama plays nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • milestone
  • Plays

ताज्या बातम्या

पुढे वाचा
किती ते दुर्दैव! व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या कष्टाची चेष्टा; 1 किलो कांद्याला मिळतोय फक्त 1 रुपयांचा भाव

किती ते दुर्दैव! व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या कष्टाची चेष्टा; 1 किलो कांद्याला मिळतोय फक्त 1 रुपयांचा भाव

Jan 05, 2026 | 09:25 PM
कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल

कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल

Jan 05, 2026 | 09:07 PM
Indian Railways News: विनातिकीट प्रवाशांना रेल्वेचा दणका! ९ महिन्यांत वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड

Indian Railways News: विनातिकीट प्रवाशांना रेल्वेचा दणका! ९ महिन्यांत वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड

Jan 05, 2026 | 09:04 PM
असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

Jan 05, 2026 | 08:48 PM
Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

Jan 05, 2026 | 08:37 PM
Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Jan 05, 2026 | 08:33 PM
आई-आज्जी सावधान! Baby Boy च्या प्रायव्हेट पार्टसह करू नका ‘ही’ 1 चूक, नाहीतर डॅमेज…

आई-आज्जी सावधान! Baby Boy च्या प्रायव्हेट पार्टसह करू नका ‘ही’ 1 चूक, नाहीतर डॅमेज…

Jan 05, 2026 | 08:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM
किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Jan 05, 2026 | 07:23 PM
Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Jan 05, 2026 | 07:17 PM
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.