साहित्य – १ वाटी वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणे, २ हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, दाण्याचे कूट, जिरे, चवीपुरते मीठ, तूप
कृती – वरी तांदूळ आणि साबुदाणा एकत्र भिजवा. पाण्याची पातळी साधारण साबुदाणा आणि वरी तांदूळ भिजून त्यावर किमान दोन इंच इतकी असावी आणि हे तुम्ही रात्रभर भिजवून ठेवा. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर सकाळी मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या. हे वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचे कूट, मीठ सर्व मिक्स करावे. नेहमीच्या घावनाप्रमाणेच हे सारण सरसरीत करावे. नॉनस्टिक तव्याला तूप लावा आणि घावन पसरवा आणि मग भाजून घ्या. खोबऱ्याच्या चटणीसह खायला द्या.
साहित्य – १ वाटी साबुदाण्याचे पीठ, ३ उकडलेले बटाटे, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा जिरे, मीठ – चवीनुसार, तळण्यासाठी तेल
कृती – सर्वप्रथम साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याचे पीठ तयार करा. नंतर दुसऱ्या भांड्यात उकडलेले बटाटे किसणीवर किसून घ्या. त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जीरे व मीठ घालून चांगले एकजीव करा. त्यानंतर त्यात तयार साबुदाण्याचे पीठ घालून ते चांगले मळून घ्या. मळलेल्या पीठाचा तयार गोळा चपातीसारखा लाटून घ्या. त्याला खूप जाड किंवा पातळ लाटू नका नाही तर तो चिकटून राहिल. त्यानंतर त्याचे पिझ्झासारखे त्रिकोण कट करा. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल चांगले गरम करा. मंद आचेवर तयार कोन तळून घ्या व दह्यासोबत सर्व्ह करा.
साहित्य – २ उकडलेले बटाटे, १ वाटी राजगिऱ्याचे पीठ, २ हिरव्या मिरच्या (तिखट तुमच्या आवडीप्रमाणे), मीठ, साखर, तूप
कृती – उकडलेल्या बटाट्याची साले काढून ते कुस्करून घ्यावेत. त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, चिमूटभर साखर, थोडेसे तूप घालून मीठ व्यवस्थित मळून घ्यावे. त्यानंतर त्याने गोळे करावेत. बटर पेपरला तूप लावा आणि त्यावर हे थालिपीठाप्रमाणे थापा आणि मध्ये एक छिद्र पाडा. तवा मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर तूप सोडावे आणि वरून थालिपीठ लावावे. मंद गॅसवर हे थालिपीठ खमंग भाजा. तयार झाल्यावर दही अथवा शेंगदाण्याच्या उपवासाच्या चटणीसह खायला द्या.
साहित्य – उकडलेले बटाटे, ४-५ हिरव्या मिरच्या, लाल तिखट, आल्याचे तुकडे, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ पाव वाटी, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल अथवा तूप
कृती – आधी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात हिरवी मिरची पेस्ट, आल्याची पेस्ट अथवा तुकडे आवडीनुसार मिक्स करा. तेलावर हे परतून बटाट्यामध्ये घाला आणि तुम्हाला हवं असेल तर दाण्याचे कूटही घालू शकता. त्यात मीठ घाला. या मिश्रणाचा वड्याचा आकार करून घ्यावा. वरी पीठ, साबुदाणा पीठ, मीठ, तिखट आणि सोडा मिक्स करून पाणी घालून भिजवून सारण करावे. गोळे यात बुडवून वडे तळावेत. खोबऱ्याच्या चटणीसह हे वडे चविष्ट लागतात.
साहित्य – १ वाटी शेंगदाणे, १ मोठा चमचा साजूक तूप, जिरे, ओले खोबरे, आले – मिरची पेस्ट, आमसूल, चवीनुसार मीठ आणि गूळ, तिखट, उकडलेले बटाटे
कृती – शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उपसून साधारण त्याला ५ शिट्ट्या कुकरमध्ये द्या. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या. कढईत तूप तापवा त्यात जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, आले – मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट शिजवून घ्या. याचे पॅटीस तयार करा आणि ते तेलावर अथवा तूपावर शेकून घ्या. शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या. पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या रगडा पॅटीसची चव अधिक चांगली करा.
sanarajwadkar@gmail.com