अभंगांनी भरलेले संगीत नाटक, शुभांगी सदावर्ते (आवली), मानसी जोशी (सखुबाई), हे दोनच कलाकार, गंभीर विषयावरले आध्यात्मिक विचार मांडणारे नाट्य – हे सारं काही असूनही देवबाभळीने पाचशे प्रयोगांची मजल ही गेल्या साडेचार वर्षात मारली. २२ डिसेंबर २०१७ ते २२ नोव्हेंबर २०२३ असा हा प्रवाह. जो भक्तीरसाने भरलेला. येत्या २२ नोव्हेंबरला भव्य षण्मुखानंद सभागृहात याचा समारोपाचा प्रयोग होत आहे. जो रसिकांना, निर्मात्यांना चटका लावून जाणारा ठरेल. ज्याचा शुभारंभ झालाय, त्याचा समारोप हा अटळ असतो. पण नाटकाच्या प्रयोगाचा समारोप जरी वाटला तरी त्यातल्या आध्यात्मिक विचारांचा कदापि समारोप होणार नाही.
– संजय डहाळे
anjaydahale33@gmail.com






