मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी
विजयसिंह जाधव, मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या स्पर्धेतून मिळालेले उमेदवारी आता विजयापर्यंत न्यायचे असेल तर केवळ ग्राउंड परिश्रम उपयोगाचे नाहीत तर त्यासाठी देवाधिकांचाही आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद नाही तर ग्रहताऱ्यांची ही साथ पाहिजे आणि अगदीच रिस्क नको म्हणून मंत्र तंत्र आणि जादू टोण्यांचाही तोडगे करायला काय हरकत आहे? या मानसिकेतून सध्या मुंबईतील अनेक उमेदवारांनी रात्रीतून तीर्थक्षेत्र क्षेत्र गाठून देवांना साकडे घालण्यासाठी सुरुवात केली आहे. दिवस कमी आणि सोंग फारअशी परिस्थिती निवडणुकीची आहे. आता केवळ पुढच्या पंधरा दिवसात संपूर्ण मतदारसंघ विजयापर्यंत न्यायचा आहे, परंतु देवाधिकाच्या आशीर्वाद पाहिजे त्यामुळे सध्या रात्रीतून आपल्या कुलदेवताला अथवा आपल्याला सांगितल्या गेलेल्या देवाला जाऊन साकडे घालून परत येण्याचा आटापिटा सुरु आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान होणार असून, त्यानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने स्वतःला चांगली मते मिळावीत आणि निवडून यावे यासाठी अघोरी व अनिष्ट प्रथांचा वापर करून लिंबू मिरची उतारे करून अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते करत आहेत ही पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. चटनेतील वैज्ञानिक दृष्टीकोन कोनाची ही पायमल्ली असेल याचा निषेध अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचे प्रशांत एस. पोतदार यांनी सांगितले.
मुंबईतील काही उमेदवार अशी रात्रीतून देवस्थान गाठून सांगितलेली पुजाआर्चा करण्यासाठी मुंबई, नाशिक, शिर्डी, शनी शिंगणापूर, पंढरपूर आदी नदीकाठावरील मंदिरामध्ये पूजाआचर्चा प्रारंभल्याची चित्र पाहावयास मिळत आहे. काही उमेदवार आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी गावाकडे धाव घेताना दिसून येत आहेत, तर काहीं गुरू, बाबा-बुवांकडे फैन्ऱ्या वाढवत आहेत, निवडणुकीच्या धामधुमीत हे धार्मिक व ज्योतिषीय उपाय लोकांच्या लक्षात येत आहेत. काही बाबांनी उमेदवारांचे आहार व जीवन शैलीसुद्धा नियंत्रित केली असून, निवडणुकीसाठी विशेष पथ्याचे पालन सुरू असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्ज छाननीनंतर आणि माघारीनंतर आता किती उमेदवार रिंगणात आहेत, याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सध्या मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत उमेदवारांचे पाय जमिनीवर कमी आणि देवस्थानांवर अधिक पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
मात्र अंतिम निर्णय मतदारच्या हातात असून, ग्रह किंवा मंत्र नव्हे, तर मतांची ताकतच अंतिम निकाल ठरविणार आहे.






