1 लाखाचे पाच दिवसांत झाले, पावणे दोन लाख; 'या' शेअरमुळे गुंतवणुकदार मालामाल!
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात काहीसे चढ-उतार पाहायला मिळाले. माञ, असे असले तरी ओला इलेक्ट्रिक कंपनीला मोठे यश मिळाले आहे. मागील पाच दिवसांत शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यापासूनच ओला इलेक्ट्रिकचा शेअर चांगलाच तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात या शेअरचा भाव १३३ रुपये इतका आहे.
आठवडाभरात गुंतवणुकदार मालामाल
९ अॉगस्ट रोजी शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर, पहिलयाच दिवशी ओला इलेक्ट्रिकचा शेअर तब्बल २० टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार करत होता. तर आता कंपनीचा शेअर पाच दिवसांत तब्बल 75 टक्क्यांनी उसळला आहे. अर्थात एखाद्या गुंतवणूकदाराने ९ अॉगस्ट रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज त्याच्या एक लाख रुपयाचा संबंधित गुंतवणूकदाराला तब्बल १ लाख ७५ हजार रुपये इतका परतावा मिळाला असता. त्यामुळे आता ओला इलेक्ट्रीकचे गुंतवणुकदार अवघ्या पाच दिवसांत मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – बेरोजगारी घटली, शहरांमध्ये वाढला रोजगार; वाचा… काय सांगतोय एनएसएसओचा नवीन अहवाल!
तब्बल तीनवेळा अप्पर सर्किट धडक
ओला इलेक्ट्रिकचा मागील आठवड्यात पाच दिवसांत तब्बल तीनवेळा अप्पर सर्किटला स्थिरावला आहे. शुक्रवारी (ता.११) ओलाचा शेअर १३३ रुपयांवर बंद झाला. याच दिवशी या शेअरने तीनदा अप्पर सर्किटला धडक दिली आहे. लिस्टिंगवेळी या शेअरची किंमत ७६ रुपये होती. माञ, आता ती दुपटीपेक्षा 19 रुपयांनी कमी आहे. बहुधा पुढील आठवड्यात सोमवारी या कंपनीचा शेअर आणखी १० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
तज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला
ग्लोबल ब्रोकरेज फर्म HSBC ने या स्टॉकला ‘बाय’ रेटिंग दिले आहे. तसेच प्रति शेअर 140 रुपये लक्ष्य किंमत ठेवली आहे. ओला इलेक्ट्रिक ही भारतातील लीड इलेक्ट्रिक स्कूटर (ईव्ही) उत्पादक आहे. जी बॅटरी सेलसह इलेक्ट्रिक व्हेयिकलसाठी तंत्रज्ञान सेवा आणि उत्पादन करते. त्यामुळे आता तज्ञांकडून हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
स्वातंञ्यदिनी पहिली बाईक लॉंच
15 ऑगस्टला ओला इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक मोटर सायकल सेगमेंटमध्ये आपली पहिली बाईक लॉन्च केली आहे. Ola ने ‘Roadster’, ‘Roadster X’ आणि ‘Roadster Pro’ या बाईक लाँच केल्या आहेत. दरम्यान, सध्या कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नाहीये. कंपनीचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये तोटा वार्षिक आधारावर 346 कोटी रुपये इतका राहिला आहे. तर आर्थिक वर्ष २०२४ मधील कंपनीचा तोटा 268 कोटी रुपये होता. माञ असे असले तरी तिमाही ते तिमाही आधारावर कंपनीचा तोटा 418 कोटी रुपयांनी कमी झाला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)