नोकरीतून मिळायचे 15 हजार, आज करतोय 71 लाखांचा टर्नओव्हर; एफपीओतून शेतकऱ्याने साधली प्रगती!
सध्याच्या घडीला अनेक सुशिक्षित तरुण शेतीकडे ओढले जात आहे. विशेष म्हणजे हे तरुण आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर शेतीमध्ये क्रांती घडवून आणत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देत हे तरुण शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या नोकरीला सोडचिट्ठी देत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून या तरुण शेतकऱ्याला वार्षिक ७१ लाख रुपयांचा टर्नओव्हर होत आहे.
करत होते १५ हजारावर नोकरी
धर्मेंद्र मौर्या दुबरा असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील पहाडी गावचे रहिवाशी आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काळ नोकरी केली. मात्र, नोकरीतून खूपच कमी पगार मिळत होता. ज्यामुळे त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पारंपारिक शेती न करता शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी २०२२ मध्ये शेतीसोबतच फार्मर प्रोड्यूसर कंपनी (एफपीओ) स्थापन केली. आज त्यांच्या एफपीओशी १२०० हुन अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.
मिलेट्सआधारित प्रक्रिया उद्योगावर भर
शेतकरी धर्मेंद्र मौर्या दुबरा सांगतात, “आपली कंपनी मिलेट्सआधारित प्रक्रिया उद्योगात असून, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्यापासून प्रक्रियाकृत उत्पादने तयार केली जातात. यामध्ये प्रामुख्याने मिलेट्सची बिस्कीट, काही अनेक प्रकारची नमकीन, मल्टीग्रेन पीठ आणि हरभरा डाळ यांसारखी उत्पादने कंपनीच्या माध्यमातून विक्री केले जातात. इतकेच नाही तर आपली कंपनी शेतकऱ्यांकडून बाजरी खरेदी करून वाराणसी, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पुरवठा करते. याशिवाय बाजरीपासून बनवलेल्या उत्पादनांना कंपनीकडून देश-विदेशात पाठवले जात आहे.”
जोडले गेलेत 1238 शेअरधारक शेतकरी
शेतकरी धर्मेंद्र मौर्या सांगतात, “आपण २०२२ मध्ये कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीसोबत एकूण 1238 शेअरधारक शेतकरी जोडले गेले आहेत. दोनच वर्षांत कंपनीने हे यश संपादन केले आहे. आपल्या परिसरात एफपीओच्या स्थापनेनंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यामुळे त्यांच्या राहणीमानात देखील मोठा बदल झाला आहे. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल ७१ लाख रुपये इतकी आहे. पुढील वर्षी कंपनीचा टर्नओव्हर १ कोटीपर्यंत वाढवण्याचा आपला मानस आहे. असेही शेवटी ते म्हणाले आहे.