Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हे जोडपे लंडनहून भारतात परतताच पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनुष्का आणि विराटने भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे. लंडनमधील मुक्कामानंतर त्यांनी भारतात नवी आलिशान प्रॉपर्टी खरेदी केली आहे,

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 11:55 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री?
  • रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक
  • कुठे खरेदी केली कोट्यवधीची प्रॉपर्टी?
Virushka Property Buy: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईच्या प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे लंडननंतर पुन्हा भारतात गँड एन्ट्री घेतली का? अशा चर्चा रंगायला लागल्या आहेत. नेमकी कुठे आणि किती गुंतवणूक केली आहे? काय किमत आहे प्रॉपर्टीची किमत काय आहे सविस्तर जाणून घेऊयात.

नेपाळला फिरायला जाताय? किती खर्च येणार? भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती? जाणून घ्या सविस्तर

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा परिसरात असलेल्या गोदरेज स्कायशोर प्रकल्पात १८.२९ कोटी रुपयांचे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट एका उच्च-स्तरीय निवासी प्रकल्पाचा भाग आहे आणि मुंबईच्या लक्झरी गृहनिर्माण मार्केटमधील वाढती मागणी पाहता ही गुंतवणूक बरीच मोठी गुंतवणूक मानली जाता आहे.

किती प्रॉपर्टी केली खरेदी?

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्रफळ २,६४४ चौरस फूट आहे. या फ्लॅटमध्ये ३१६ चौरस फुटांची विशेष जागा आणि तीन गाड्यांसाठी पार्किंगची जागा देखील समाविष्ट आहे. कागदपत्रांनुसार, हा व्यवहार अंदाजे ६९,१५९ रुपये प्रति चौरस फूट दराने झाला असं समोर येत आहे. वर्सोवाच्या प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमध्ये मागणी झपाट्याने वाढली आहे.

केव्हा केली नोंदणी?

मालमत्ता नोंदणीच्या डेटानुसार, हा व्यवहार २१ जुलै, २०२६ रोजी झाली. या खरेदीवर अंदाजे ₹१.०९ कोटी स्टँप ड्यूटी आणि ₹३०,००० रजिस्ट्रेशन शुल्क भरण्यात आले. कागदपत्रांवरून असेही दिसून येते की, ही खरेदी थेट गोदरेज प्रॉपर्टीजच्या प्रकल्पात करण्यात आली होती.

वर्सोवा का आहे खास?

मुंबईतील वर्सोवा परिसर हा शहरातील सर्वाधिक मागणी असलेल्या आलिशान निवासी भागांपैकी एक मानला जातो. चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील अनेक प्रमुख व्यक्ती येथे राहतात. येथील उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, मेट्रो नेटवर्क, समुद्राजवळील स्थान आणि उत्तम पायाभूत सुविधांमुळे या भागातील उच्च श्रेणीच्या मालमत्तांची मागणी सातत्याने वाढत आहे. बॉलीवूड उद्योगात काम करणाऱ्यांनाही गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये ये-जा करणे सोपे जाते. याशिवाय, अंधेरी परिसरात मोठ्या संख्येने स्टुडिओ आहेत.

यापूर्वीही केली मोठी गुंतवणूक

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी यापूर्वी देशाच्या विविध भागांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी अलीकडेच अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. वर्सोवामधील हे नवीन आलिशान अपार्टमेंट त्यांच्या वाढत्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमधील आणखी एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक मानली जात आहे. त्यामुळे या गुंतवणूकीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

मुंबईच्या लक्झरी मार्केटला चालना

रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, सेलिब्रिटींच्या गुंतवणुकीमुळे मुंबईच्या प्रीमियम गृहनिर्माण बाजाराला चालना मिळते. गेल्या काही महिन्यांत, अनेक चित्रपट तारे, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या आलिशान मालमत्ता खरेदी केल्या आहेत, ज्यामुळे उच्च-श्रेणीच्या रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आली आहे.

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?

Web Title: Anushka sharma virat kohli invest crores in indian real estate property see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • Business News
  • King virat Kohli
  • Marathi News
  • property
  • property deal
  • real estate
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा
4

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.