'ही' भारतीय वंशाची व्यक्ती सांभाळणार, जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा कारभार; वाचा... कोण आहेत ते!
आयफोन हे नाव काढताच आपल्या डोळ्यासमोर ॲपल कंपनीचे नाव उभे राहते. ॲपल कंपनीच्या आयफोनच्या भारतीयांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. एखाद्या आयफोन असेल तर अशा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन लगेचच बदलतो. याच ॲपल कंपनीने आपल्या व्यवस्थापनात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ॲपल कंपनीची धुरा भारतीय वंशाचे केविन पारेख हे सांभाळणार आहे. पारेख यांची ॲपल कंपनीचे नवीन नवीन मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती झाली आहे.
आठवडाभरात व्यवस्थापनात दुसरा मोठा बदल
केविन पारेख हे यापुर्वीचे मुख्य वित्तीय अधिकारी लुका मेस्त्री यांची जागा घेणार आहे. अशातच आता ॲपल कंपनी लुका मेस्त्री यांना नवीन जबाबदारी देणार आहे. सध्या केविन पारेख ॲपल कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. ते नववर्षात अर्थात १ जानेवारी २०२५ पासून कंपनीच्या सीएफओ पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. त्यामुळे ॲपल कंपनीने आपल्या व्यवस्थापन विभागात एका आठवड्यात केलेला हा दुसरा मोठा बदल आहे.
हेही वाचा – शेअर बाजारात खुला झालाय तब्बल 2,830 कोटींचा ‘हा’ आयपीओ, कमाईची मोठी संधी!
11 वर्षांपासून सांभाळतायेत विविध जबाबदाऱ्या
52 वर्षीय केविन पारेख हे ॲपल कंपनीमध्ये गेल्या 11 वर्षांपासून ॲपल कंपनीमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहे. कंपनीला पुढे नेण्यासाठी आर्थिक रणनीती ठरवण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते आता ॲपलचे सीईओ टीम कुक यांच्या टीमचा एक मुख्य हिस्सा असणार आहेत.
केविन पारेख यांना कामाचा तगडा अनुभव
ब्लूमबर्ग या आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, केविन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री हे गेल्या केविन पारेख यांना कंपनीच्या सीएफओ पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार करत होते. याआधी केविन पारेख यांनी ॲपल कंपनीच्या विक्री, किरकोळ आणि विपणन विभागात देखील आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे त्यांना ॲपल कंपनीच्या व्यवसायाची चांगली माहिती आहे. दरम्यान ॲपलमध्ये येण्याआधी केविन पारेख यांनी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम केले आहे. ते ४ वर्षे रॉयटर्सचे उपाध्यक्ष (वित्त) होते. त्यांनी जनरल मोटर्समध्ये व्यवसाय विकास संचालक म्हणूनही काम केले आहे.