शेअर बाजारात खुला झालाय तब्बल 2,830 कोटींचा 'हा' आयपीओ, कमाईची मोठी संधी!
काहीशा घसरणीनंतर गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. अशातच आज गुंतवणुकदारांसाठी प्रीमियर एनर्जी लिमिटेडचा आयपीओ खुला झाला आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार आजपासून अर्थात २७ ऑगस्टपासून 29 ऑगस्ट 2024 पर्यंत या आयपीओमध्ये पैसे गुंतवू शकणार आहेत. याशिवाय 28 ऑगस्ट अँकरसाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. त्यामुळे या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणुकीची मोठी संधी गुंतवणूकदारांना असणार आहे.
2,830.40 कोटींची उभारणी करणार
प्रीमियर एनर्जी लिमिटेड ही इंटिग्रेटेड सोलर सेल आणि सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 2,830.40 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 1,291.40 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेल अर्थात ओएफएसअंतर्गत 1,539 कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. त्यामुळे या आयपीओमध्ये एकूण 6,29,09,198 शेअर्स ऑफर करण्यात येणार आहे. दरम्यान, कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य हे 1 रुपये प्रति शेअर असणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – केंद्र सरकार प्रत्येकाला 46,715 रुपये देणार? …हे खरंय का? पीआयबीने केलाय मोठा खुलासा
या आयपीओच्या काही महत्वाच्या तारीख
– IPO उघडण्याची तारीख – 27 ऑगस्ट
– IPO बंद होण्याची तारीख – 29 ऑगस्ट
– शेअर्स वाटपाची तारीख – 30 ऑगस्ट
– परतावा मिळण्याची तारीख – 2 सप्टेंबर
– डीमॅट खात्यात शेअर्स जमा करण्याची तारीख – 2 सप्टेंबर
– लिस्टिंग तारीख – मंगळवार, 3 सप्टेंबर
गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार
प्रीमियर एनर्जी लिमिटेडचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये उत्तम लिस्टिंग दर्शवत आहे. इन्व्हेस्ट ऑर गेन डॉट कॉमच्या मते, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी 358 रुपये प्रति शेअर म्हणजेच जीएमपीच्या 79.56 टक्के आहेत. जर ही स्थिती लिस्टिंगच्या दिवसापर्यंत कायम राहिली तर कंपनीचे शेअर्स 808 रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध होऊ शकतात. अशा स्थितीत कंपनीच्या या आयपीओच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.
काय करते ही कंपनी
प्रीमियर एनर्जी ही देशातील दुसरी सर्वात मोठी इंटिग्रेटेड सोलर सेल आणि सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ही कंपनी भारतातील आपली उत्पादने टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स, एनटीपीसी, पॅनासोनिक लाईफ सोल्युशन्स, शक्ती पंप्स, माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांसारख्या कंपन्यांना विक्री करते. 2023-24 या
कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती
आर्थिक वर्षात कंपनीने 3143.79 कोटी रुपयांची कमाई केली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 742.87 कोटी रुपयांची कमाई झाली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीला 14.41 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनी नफ्यात आली होती. कंपनीने 231.36 कोटी रुपये इतका नफा कमावला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)