Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरिहंत अकॅडमी लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2026 मध्ये एकूण उत्पन्नात वाढ; करोत्तर नफा दुप्पट, पोहोचला 9.11 कोटी रुपयांवर

अरिहंत अकॅडमी लिमिटेड या एसएससी, आयसीएसई, सीबीएसई, सायन्स आणि कॉमर्स या क्षेत्रांतील मुंबईमधील अग्रगण्य कोचिंग संस्‍थेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे आपले लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 29, 2026 | 04:20 PM
(फोटो- सोशल मिडिया)

(फोटो- सोशल मिडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Arihant Academy : अरिहंत अकॅडमी लिमिटेड या एसएससी, आयसीएसई, सीबीएसई, सायन्स आणि कॉमर्स या क्षेत्रांतील मुंबईमधील अग्रगण्य कोचिंग संस्‍थेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे आपले लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे, जिथे करोत्तर नफा ९.११ कोटी रूपयांवर पोहोचला आहे, ज्‍यामध्‍ये आर्थिक वर्ष २०२५ मधील ४.४५ कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत वार्षिक आधारावर १०४.८५ टक्‍के वाढ झाली आहे. कंपनीचा एकूण एकत्रित महसूल आर्थिक वर्ष २०२५ मधील ४२.५२ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २६ मध्ये ५२.५७ टक्क्यांनी वाढून ६४.८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण नावनोंदणी, नवीन बाजारपेठांमधील विस्तार, करिअर-केंद्रित प्रोग्राम्समधील वैविध्य आणि सातत्यपूर्ण कार्यक्षम कामकाज यांमुळे ही वाढ झाली आहे.

Supreme Court चा निकाल आणि क्रॅश झाला ‘हा’ शेअर, आज तब्बल 16 टक्क्यांनी गडगडले भाव!

विस्तारणाऱ्या नेटवर्कमधील वाढती क्षमता

आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने ३.३२ कोटी रुपयांचा करोत्तर नफा नोंदवला आहे, ज्‍यामध्‍ये आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीतील १.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्रैमासिक आधारावर ८७.२८ टक्‍के वाढ झाली आहे. या तिमाहीत एकूण महसूल १६.११ कोटी रुपये राहिला, ज्‍यामध्‍ये तिसऱ्या तिमाहीतील १४.५४ कोटी रुपयांच्या तुलनेत १०.७८ टक्‍के वाढ झाली. या तिमाही कामगिरीमधून कंपनीचा सातत्यपूर्ण वेग, शैक्षणिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि विस्तारणाऱ्या नेटवर्कमधील वाढती क्षमता दिसून येते.

दर्जेदार शैक्षणिक निकाल देण्‍याचा मनसुबा

आर्थिक वर्ष २०२६ मधील कामगिरीबाबत मत व्‍यक्त करत अरिहंत अकॅडमीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल कपासी म्हणाले: “गेल्या वर्षापासून आमच्या संस्थेमध्ये प्रबळ गती पाहायला मिळत आहे. हे आमच्या विद्यार्थी आणि पालकांचा वाढता विश्वास, त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या विस्तारित शैक्षणिक संधी आणि आमच्या समर्पित प्राध्यापक व ऑपरेशनल टीम्सची अथक मेहनत आणि कटिबद्धता याचेच फळ आहे. या तिमाहीच्‍या आमच्‍या निकालांमधून विविध आर्थिक आणि ऑपरेशनल क्षेत्रांतील उत्तम वाढ दिसून येते, तसेच हे निकाल आम्ही गेल्या काही वर्षांत जे मॉडेल उभे केले आहे त्याची विस्तार क्षमता देखील सिद्ध करतात.
आम्ही आमची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि आमच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी अधिक सखोलपणे जोडले जाण्यासाठी प्रयत्‍न करत असताना, आमचा दर्जेदार शैक्षणिक निकाल देण्‍याचा आणि त्याच वेळी शाश्वत पद्धतीने आमचा विस्तार करण्‍याचा मनसुबा आहे. आमच्या बिझनेस पाईपलाईन आणि नावनोंदणी व्यवस्थेमध्ये दिसून येणारी प्रगती आम्हाला येणाऱ्या तिमाहींसाठी आत्मविश्वास देते. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या टीमचे सातत्यपूर्ण प्रयत्‍न, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन आमच्या दीर्घकालीन विस्ताराच्या प्रवासाला पुढेही पाठबळ देत राहतील.”

दर्जेदार शिक्षण मिळणे अधिक सुलभ

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, अरिहंत अकॅडमीने नाशिक (महाराष्ट्र), अहमदाबाद (गुजरात) आणि राजस्थान येथे धोरणात्मक केंद्रे सुरू करून अनेक शैक्षणिक हबमध्ये आपली उपस्थिती वाढवली. राजस्थानमध्ये दोन नवीन केंद्रे सुरू केल्यामुळे त्या राज्यातील एकूण केंद्रांची संख्या पाच झाली आहे. कंपनीने मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) मध्ये देखील सात नवीन केंद्रे सुरू करून आपले स्थान अधिक दृढ केले आहे, ज्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण मिळणे अधिक सुलभ झाले आहे.

या वर्षादरम्यान, अरिहंत अकॅडमीने एनएसई अकॅडमीसोबत सहयोगाने सर्टिफाइड इंटर्नल ऑडिटर (सीआयए) सर्टिफिकेशन कोर्स देखील सुरू केला आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थी आणि व्यावसायिकांना ऑडिटिंग, अनुपालन आणि वित्तीय प्रणालींमध्ये उद्योगासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रदान करणे हा आहे. या उपक्रमांमधून कंपनीचा विस्तार, शैक्षणिक नाविन्यता आणि करिअर-केंद्रित शिक्षणाच्या संधींवर असणारा सातत्यपूर्ण भर दिसून येतो.

Ethanol Petrol Impact: इथेनॉलवाल्या पेट्रोलमुळे गाड्यांच्या मायलेजवर परिणाम? इंजिनही खराब…, नेमकं काय म्हणाले लोक?

Web Title: Arihant academy limited fy26 net profit doubles to 9 crore marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

कमी भांडवलात मोठी कमाई! नोकरीसोबतही करता येतील हे 8 छोटे व्यवसाय; कमी गुंतवणुकीत चांगली कमाईची संधी
1

कमी भांडवलात मोठी कमाई! नोकरीसोबतही करता येतील हे 8 छोटे व्यवसाय; कमी गुंतवणुकीत चांगली कमाईची संधी

Supreme Court चा निकाल आणि क्रॅश झाला ‘हा’ शेअर, आज तब्बल 16 टक्क्यांनी गडगडले भाव!
2

Supreme Court चा निकाल आणि क्रॅश झाला ‘हा’ शेअर, आज तब्बल 16 टक्क्यांनी गडगडले भाव!

RTO Vehicle Sale Rules : बेकायदा वाहन विक्रीवर आता कडक कारवाई; केंद्र सरकारची नवी नियमावली लागू
3

RTO Vehicle Sale Rules : बेकायदा वाहन विक्रीवर आता कडक कारवाई; केंद्र सरकारची नवी नियमावली लागू

कागदी नोटा बंद होणार? बाजारात येणार प्लास्टिकच्या नोटा… RBI चा नेमका प्लॅन काय?
4

कागदी नोटा बंद होणार? बाजारात येणार प्लास्टिकच्या नोटा… RBI चा नेमका प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.