Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चिखलात अडकले शेतकऱ्यांचे पाय! चंद्रपुरातील पांदण रस्त्यांची दुरवस्था, शेतीची कामे ठप्प

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने शेतीला दिलासा दिला असला, तरी पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. चिखल, दलदल आणि खराब रस्त्यांमुळे शेतीची कामे, वाहतूक आणि शेतमालाची ने-आण करताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 03:07 PM
Chandrapur News: चिखलात अडकले शेतकऱ्यांचे पाय! चंद्रपुरातील पांदण रस्त्यांची दुरवस्था, शेतीची कामे ठप्प

Chandrapur News: चिखलात अडकले शेतकऱ्यांचे पाय! चंद्रपुरातील पांदण रस्त्यांची दुरवस्था, शेतीची कामे ठप्प

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे अनेक पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे.
  • खराब रस्त्यांमुळे खत, बियाणे, औषधे आणि कृषी साहित्य शेतापर्यंत पोहोचवणे मोठे आव्हान बनले आहे.
  • शेतकरी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करत असून काही ठिकाणी श्रमदानातून रस्ते वाहतुकीयोग्य केले जात आहेत.
चंद्रपूर: जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर धान रोवणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक पांदण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पांदण रस्ते चिखलमय झाले असून बैलगाड्या, ट्रॅक्टर, दुचाकी तसेच कृषी अवजारे अडकण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे, औषधे व इतर साहित्य शेतापर्यंत पोहोचविणे मोठे आव्हान ठरत आहे.

Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

महसूल विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध योजनांमधून आतापर्यंत ६ हजार ०२० पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, १ हजार ३६७ कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत २५७ नवीन रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. शासनाच्या आकडेवारीत हजारो रस्ते पूर्ण झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये जुन्या पांदण रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. धान लागवडीच्या हंगामात दररोज शेतात जावे लागत असल्याने खराब रस्त्यांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यांवर दलदल निर्माण झाली आहे. बैलगाडी किंवा ट्रॅक्टर घसरल्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने पांदण अरुंद झाली असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि महसूल विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली. मात्र, अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकण्यापलीकडे कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाली असती, तर शेतकऱ्यांचा मोठा त्रास टळला असता, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, प्रशासनाचे म्हणणे आहे की विविध योजनांमधून टप्प्याटप्प्याने पांदण रस्त्यांची कामे सुरू असून उर्वरित कामांनाही गती देण्यात येत आहे. मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पांदण रस्ता योजनेतून विधानसभा स्तरावर रस्त्यांचे नियोजन केले जात असून, आवश्यक निधी उपलब्ध होताच कामे पूर्ण केली जातील, अशी माहीती प्रशासनाकडून देण्यात आली.

शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी व शेतमाल ने-आण करण्यासाठी पादण रस्ते अत्यत महत्वाचे आहेत. मात्र सध्या पांदण रस्त्यांची स्थिती अत्यंत गंभीर असून त्या रस्त्यावरून बैलगाडी नेणे तर कठिणच. शिवाय माणूस चालत जाणेही अवघड झाले आहे. यंदा पाऊस कमी पडले असले तरी रस्त्यावर चिखलमय स्थिती निर्माण झाली आहे. काही पांदण रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. – मंगेश बोरकर, शेतकरी, रत्नापूर, ता. सिंदेवाही

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने

रेतीतस्करीमुळे रस्त्याची चाळण

जिल्ह्यातील काही भागांत अवैध रेती वाहतुकीसाठी अवजड ट्रॅक्टर व ट्रकांचा वापर होत असल्याने अनेक पांदण रस्ते खचले आहेत. सततच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यांवर खोल खड्डे पडले असून, पावसाळ्यात त्यांचे चिखलात रूपांतर होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी प्रशासनाकडून दुरुस्ती होत नसल्याने काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानातून मुरूम टाकून व पाण्याचा निचरा करून पांदण रस्ते तात्पुरते वाहतुकीयोग्य केले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur farmers struggle due to muddy farm roads during monsoon paddy plantation hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण
1

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ
2

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ

Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
3

Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

“तू कधी शारदा, तू कधी रागीनी….”  बसमधील गैरवर्तनाला महिलेचे सडेतोड उत्तर, Video Viral
4

“तू कधी शारदा, तू कधी रागीनी….” बसमधील गैरवर्तनाला महिलेचे सडेतोड उत्तर, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.