Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वसईतील धबधबे, किनारे अन् निसर्ग पर्यटनस्थळांवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

मान्सूनमध्ये होणारी दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि खाणींमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. चिंचोटी धबधबा, सुरुची बीच, भुईगाव बीच आणि राजीवली खदान यांसारख्या प्रमुख ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 27, 2026 | 11:22 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी!
  • वसईतील पर्यटनस्थळांवर या तारखेपर्यंत बंदी
  • उल्लंघन केल्यास होणार कारवाई
Vasai News : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या धबधबे, समुद्रकिनारे आणि निसर्ग पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश ३ ऑगस्टपर्यंत लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस उपआयुक्त अशोक विरकर यांनी दिला आहे.

Vasai News : ‘धोकादायक इमारती तातडीने खाली करा…’, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा इशारा

मान्सूनमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांवर येत असतात. मात्र, अतिवृष्टी, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता नागरिकांच्या जीवित व वित्तहानीची शक्यता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन

वसई, नायगाव आणि वालीव पोलीस ठाण्यांनी वाढती गर्दी आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात आणून दिल्यानंतर हा आदेश लागू करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, टिंगलटवाळी, अश्लील हावभाव, शेरेबाजी किंवा लज्जास्पद वर्तन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले असून, पावसाळ्यात धोकादायक पर्यटनाचा मोह टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

कोणती ठिकाणं आहेत प्रतिबंधित?

या काळात संबंधित पर्यटनस्थळांवर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यात उतरून पोहणे, खोल पाण्यात जाणे, धबधब्याखाली बसणे, धोकादायक ठिकाणी किंवा कठड्यांवर उभे राहून सेल्फी काढणे अथवा चित्रीकरण करणे यावरही बंदी असेल. याशिवाय मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, अनधिकृत मद्यविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणे किंवा बेदरकार वाहन चालविणे यावरही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार वसई पोलीस ठाणे हद्दीतील सुरुची बीच, रानगाव बीच, ब्रह्मपाडा बीच, भुईगाव बीच, बेनापट्टी बीच तसेच वसई किल्ला जेटी आणि पाचूबंदर जेटी, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी धबधबा व कामण देवकुंडी, वालीव पोलीस ठाणे हद्दीतील राजीवली खदान आणि खैरपाडा-धुमाळनगर खदान परिसरात १०० मीटरच्या परिघात विविध निबंध लागू राहणार आहेत.

वाहनांतील स्पीकर वाजवण्यास परवानगी नाही

पर्यावरण संवर्धनालाही या आदेशात महत्त्व देण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, थर्माकोल किंवा इतर कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली असून ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होईल अशा कोणत्याही कृतीवर बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या आवाजात डीजे, संगीत यंत्रणा किंवा वाहनांमधील स्पीकर वाजवण्यासही परवानगी दिली जाणार नाही.

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा

Web Title: Vasai tourism restricted till august 3 beaches waterfalls and quarries see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Business News
  • Heavy Rain
  • mansoon
  • Marathi News
  • palghar
  • tourism
  • vasai
  • Vasai news

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.