AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी ( सौजन्य - सोशल मीडिया )
जाहिरात परिसंस्था पुनरावलोकनाच्या कमी होत जाणाऱ्या वेळेमुळे असो, देखरेख ठेवण्यासाठीच्या विविध माध्यमांच्या स्वरूपामुळे असो किंवा नियंत्रण यंत्रणा बदलणाऱ्या क्रिएटर्समुळे असो पारंपरिक सुरक्षा उपायांपेक्षा अधिक वेगाने पुढे जात आहे. अशा वेळी विश्वासार्हतेचे रक्षण करणे, त्याचे स्पष्टीकरण देणे आणि ती गती मोठ्या प्रमाणावर टिकवून ठेवणे हीच आता मुख्य गुरुकिल्ली ठरत आहे. ब्रँड्ससमोरील धोके हे व्यापक विश्वासार्हतेच्या समस्येचा भाग आहेत, जिथे कधी-कधी अपप्रवृत्ती मूळ संवादाचा ताबा घेतात, तर दुसरीकडे ग्राहक पुरावे आणि ठोस स्पष्टीकरणांची मागणी करतात. जाहिराती आता सार्वजनिक आरोग्य, ऑनलाइन सुरक्षितता आणि लहान मुलांचे स्वास्थ्य यांसारख्या मोठ्या सामाजिक चर्चांमध्येही ओढल्या जात आहेत.
व्हिजन २०३२ हा काळ जाहिरात क्षेत्रासाठी मोठ्या उत्क्रांतीचा असल्याचे मान्य करते, जे क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या क्रांतिकारी बदलांचे, तसेच व्यक्तीनुरूप संवाद, रिटेल मीडिया आणि नवीन डिजिटल स्वरूपांसारख्या प्रमुख बदलांचे साक्षीदार ठरत आहे. पारंपारिक स्वनियमन हे एएससीआयच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिले असले तरी ही संस्था धोरण, संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षमता बांधणीच्या माध्यमातून आपली प्रतिबंधात्मक भूमिका विस्तारण्याचा विचार करत आहे.
या आराखड्याचा भाग म्हणून, एएससीआय विधी व धोरण, जाहिरातींमधील जबाबदार एआय नाविन्यता आणि क्रिएटर्सचे प्राविण्य व विश्वासार्हता यांचा समावेश असणारी तीन उत्कृष्टतेची केंद्रे (सेंटर्स ऑफ एक्सलन्स) स्थापन करण्याची योजना आखत आहे.
● एएससीआय लीगल अँड पॉलिसी फोरम जाहिरात क्षेत्रातील नियामक स्पष्टता, अर्थ स्पष्टीकरण किंवा धोरण विकासाची गरज असलेल्या उदयोन्मुख मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी उद्योगक्षेत्र, कायदेतज्ज्ञ, नियामक, शिक्षणतज्ज्ञ आणि ग्राहकांचे प्रतिनिधी यांना एकाच मंचावर आणेल. हे फोरम संशोधन, धोरणात्मक चर्चा, मार्गदर्शन आणि उद्योग प्रशिक्षणालाही पाठबळ देईल.
● एएससीआय सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन इन एआय इन अॅडव्हर्टायझिंग सर्जनशील विकास, लक्ष्यीकरण, व्यक्तीनुरूपता, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि ग्राहक सहभाग या सर्व क्षेत्रांमध्ये एआयचा जबाबदार वापर आणि नाविन्यतेवर भर देईल. हे केंद्र सिंथेटिक मीडिया, एआय-निर्मित दावे, स्वायत्त निर्णय प्रक्रिया (एजंटिक डिसिजन-मेकिंग) आणि ग्राहकांच्या माहितीपूर्ण निवडी करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पाडणाऱ्या इतर सर्व उदयोन्मुख क्षेत्रांवर मार्गदर्शन विकसित करेल, तसेच संशोधन करेल.
● एएससीआय सेंटर फॉर क्रिएटर एक्सलन्स अँड ट्रस्ट व्यावसायिक मानक व प्रशिक्षण, क्रिएटर प्रमाणीकरण, प्रकटीकरण (डिस्क्लोजर) आणि नियमपालन, तसेच संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेगाने वाढणाऱ्या क्रिएटर परिसंस्थेशी जोडले जाईल. या महत्त्वाच्या उपक्रमांना दिशा देण्यासाठी संचालक मंडळाने विद्यमान अध्यक्ष सुधांशू वत्स यांची अतिरिक्त कार्यकाळासाठी फेरनिवड केली. एस सुब्रमण्येश्वर उपाध्यक्षपदी, तर परितोष जोशी मानद खजिनदार म्हणून कायम राहतील.
या प्रसंगी मत व्यक्त करत एएससीआयचे अध्यक्ष सुधांशू वत्स म्हणाले, “भारतातील जाहिरात क्षेत्र ज्या गतीने विकसित होत आहे, ते पाहता आमच्यासमोर मोठी नियामक आव्हाने आहेत. एआय, क्रिएटर्स, विविध प्लॅटफॉर्म्स आणि व्यक्तीनुरूपता या सर्व गोष्टी ब्रँड्स प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचतात या पद्धतीला नवा आकार देत आहेत. एएससीआयचे व्हिजन २०३२ प्रत्यक्षात साकार होईल याची खात्री करण्यावर माझा मुख्य भर आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही स्थापन करू इच्छित असलेली तीन उत्कृष्टतेची केंद्रे ही एएससीआयच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एएससीआय नियमन करत असलेल्या परिसंस्थेच्या गतीने संस्थेच्या क्षमतांचाही विस्तार होईल याची खात्री करण्यावर संचालक मंडळाचा भर आहे.”
एएससीआयचे उपाध्यक्ष एस. सुब्रमण्येश्वर म्हणाले, “आजच्या जाहिरात क्षेत्रात पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक घटकांचा सहभाग आहे आणि व्हिजन २०३२ या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची खात्री देते. आम्ही संकल्पना मांडलेली ही उत्कृष्टतेची केंद्रे जाहिरात परिसंस्थेतील पारंपरिक घटकांपलीकडे जाऊन अनेक भागधारकांच्या अधिक व्यापक सहभागास वाव देतात आणि त्यांची तशी गरजही आहे. यामुळे जाहिरातींची विस्तारत जाणारी ही परिसंस्था स्वनियमनाच्या पद्धतींशी प्रभावीपणे जोडली जाईल आणि परिसंस्थेच्या विकासात मोलाचे योगदान देईल, याची खात्री मिळते.”
एएससीआय अकॅडमी प्रशिक्षण, ग्राहक शिक्षण आणि वैचारिक नेतृत्वावर भर देणे सुरूच ठेवेल, ज्यामध्ये भविष्यातील उपक्रम म्हणून ट्रस्ट इन अॅडव्हर्टायझिंग इंडेक्स, उद्योग आणि विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपक्रम, संशोधन भागीदारी, ग्राहक शिक्षण उपक्रम आणि एएससीआय अॅडट्रस्ट आयपी यांचा समावेश असेल.
एएससीआयची विद्यमान तक्रार निवारण यंत्रणा ग्राहकांच्या तक्रारींची तपासणी सुरूच ठेवेल, तसेच प्राधान्य श्रेणी, जाहिरातींचे नवे प्रवाह आणि त्रुटींवर स्वतःहून (सुओ मोटो) देखरेख ठेवणाऱ्या विभागाला अधिक दृढ करेल. आपली देखरेख क्षमता वाढवण्यासाठी एएससीआयचा तक्रार विभाग विविध एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे पर्यायही पडताळून पाहत आहे.
व्हिजन २०३२ च्या माध्यमातून, एएससीआयचे जाहिरातींवरील विश्वासार्हता आपल्या दीर्घकालीन अजेंड्याचा केंद्रबिंदू ठेवून स्वनियमनाच्या अधिकाराचा विस्तार करण्याचे, तसेच धोरण, संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान व परिसंस्थेतील सहभागामधील आपली भूमिका अधिक दृढ करण्याचे उद्दिष्ट आहे.
गणेशोत्सवात Instamart चे ट्रेंड्स; Eco Friendly गणपतींच्या मागणीत 176% तर मावा मोदकांमध्ये 145% वाढ!






