Rahul Gandhi on Gokul Milk Politics: गोकुळच्या राजकारणात राहुल गांधींची एंट्री; भाजपला थेट इशारा, शेतकरी विसरणार नाहीत...
राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मिडिया ट्विटर एक्सवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ” गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. त्यामुळे भाजपने निवडणुकीनंतर नियमच बदलले. चार संचालक वाढवले, १२ चे १६ केले आणि बहुमताची चोरी केली. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे. हे जनादेशात फेरफार करणे आहे. भाजप इतका हताश झाला आहे की, सर्वत्र सत्ता टिकवण्यासाठी तो कोणत्याही थराला जात आहे. जे दूध उत्पादकांची मते चोरतात, त्यांनी हे लक्षात ठेवावे—शेतकरी कधीही विसरत नाहीत.” अशी टिका राहुल गांधी यांनी केली आहे.
Gokul Story: गोकुळात श्रीकृष्णाने बदलल्या श्रद्धा, परंपरा आणि समाजाची …
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए – 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है – जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें – किसान भूलता नहीं। — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2026
Gokul Milk Union Election Twist: गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून …
राहुल गांधी यांच्या ट्विटपाठोपाठ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. “कोल्हापूरच्या ५५०,००० दूध उत्पादकांचा आवाज बनल्याबद्दल धन्यवाद, राहुलजी… गोकुळला मिळालेला कौल शेतकऱ्यांचा आहे. आम्ही न्यायालयात आणि रस्त्यावर उतरून लढू..” असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
धन्यवाद राहुल जी, कोल्हापुर के साढ़े पाँच लाख दूध उत्पादकों की आवाज़ बनने के लिए…गोकुल का जनादेश किसानों का है. कोर्ट में भी लड़ेंगे और सड़क पर भी… — Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 5, 2026
“लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या बहुमताचा अवमान करून चोरट्या मार्गाने गोकुळची सत्ता हस्तगत करण्याचा हा प्रयत्न करत आहेत. पण सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात आणि सहकार क्षेत्रातील हस्तक्षेपाविरोधात आम्ही शांत बसणार नाही. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यासोबतच थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा खुला इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडी राज्य सरकारने सहकार कायद्यात बदल करून गोकुळवर ४ शासननियुक्त संचालक (Government Nominated Directors) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आणि राजकीय समीकरणात या चार नवीन संचालकांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असून, प्रशासकीय पातळीवर यासाठीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे.
शासननियुक्त संचालकांची नावे निश्चित करून त्यांना अध्यक्ष निवडीच्या विशेष सभेला उपस्थित राहण्यासाठीची अधिकृत पत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. ‘गोकुळ’च्या संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे बहुमत असले, तरी महायुती सरकारने नेमलेल्या ४ नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस आणि राजकीय गणिते पूर्णपणे बदलू शकतात.
Ans: राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, गोकुळमध्ये शेतकऱ्यांनी भाजपचा पराभव केल्यावर भाजपने नियम बदलून ४ संचालक वाढवले (१२ चे १६ केले) आणि बहुमताची चोरी केली, जे शेतकरी कधीही विसरणार नाहीत.
Ans: सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या ५.५ लाख दूध उत्पादकांचा आवाज बनल्याबद्दल राहुल गांधी यांचे आभार मानले आणि सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात दाद मागण्यासोबतच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.
Ans: निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीला बहुमत मिळाल्यानंतरही, राज्य सरकारने ४ अतिरिक्त संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अध्यक्ष निवडीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






