अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. त्यांनी विवाह सोहळ्यात परिधान केलेले दागिने पाहून नेटकरीसुद्धा आश्चर्यचकित झाले आहे. दागिन्यांसोबत रश्मिकाने लग्नाच्या वेळी डोक्याला बांधलेल्या बारीक पिवळी पटीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदू धर्मात विविह सोहळ्याला खूप जास्त महत्व आहे. लग्न सोहळ्यात मंत्रोपचार करून सर्व विधी केले जातात. मराठी विवाह सोहळ्यात मुंडावळ्या बांधल्या जातात, त्याप्रमाणे इतर धर्मांमध्ये सुद्धा वेगवेगळे गोष्टी लग्न सोहळ्यात परिधान करण्यास दिल्या जातात. चला तर जाणून घेऊया वेगवेगळ्या प्रांताच्या प्रथा. (फोटो सौजन्य – pinterest)
अभिनेत्री रश्मिका मंदानाने लग्नात कपाळाला बांधले होते? जाणून घ्या वेगवेगळ्या प्रांतातील खास प्रथा

रश्मिकाने लग्नाच्या वेळी डोक्याला बांधलेल्या पिवळ्या पट्टीला नेथी चुट्टी असे म्हंटले जाते. तामिळ लग्न सोहळ्यात नेथी चुट्टीचे विशेष महत्व आहे. त्यामुळे रश्मिका मंदानाने सुद्धा नेथी चुट्टी बांधली होती.

मराठी विवाह सोहळ्यात नवरा नवरीला मुंडावळ्या बांधण्यास दिल्या जातात. या मुंडावळ्या मोती किंवा रंगीत मण्यांपासून बनवल्या जातात. मुंडावळ्या कपाळाला दिसल्या की नवरानवरी लगेच ओळखून येतात.

राजस्थानी नवरीच्या डोक्यावर बोरला असते. याशिवाय पारंपरिक कार्यक्रमांमध्ये किंवा इतर सणावाराच्या दिवसांमध्ये राजस्थानी महिला डोक्यात बोरला घालतात.

बंगाली नवरीच्या डोक्यावर मुकूट घातले जाते. हे मुकुट प्रामुख्याने चांदीचे असते. मराठी लग्नात ज्याप्रमाणे मुंडावळ्या घातल्या जातात त्याप्रमाणे बंगाली लग्नात नवरा नवरीच्या डोक्यात मुकुट घातले जाते.

साऊथ इंडियन विवाह सोहळ्यात नवरा नवरीच्या डोक्याला पिवळ्या रंगाची पट्टी बांधण्यास दिली जाते. या पट्टीला विवाह सोहळ्यात खूप जास्त महत्व आहे.






