बीकेसी स्टेशनला मिळाले कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशन असे ब्रँड नाव!
कोटक महिंद्रा ग्रुपने मेट्रो ३ अॅक्वा लाइनच्या बीकेसी स्टेशन कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनला असे ब्रँड नाव दिले आहे. या नवीन ब्रँडेड स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरातील पहिली भूमिगत मेट्रो – अॅक्वा लाइन मुंबईकरांना समर्पित करणार आहे. जी मुंबईतील शहरी वाहतूकीमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा व खासगी भागीदारांमधील या सहयोगाचा शहरातील सार्वजनिक परिवहन यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचा मनसुबा आहे.
मुंबईतील वर्दळीच्या व्यवसाय झोनमध्ये धोरणात्मकरित्या स्थित कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशन दररोज लाखो प्रवाशांना सुखकर प्रवासाचा आनंद देईल. ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासादरम्यान वेळ देखील वाचेल. या स्टेशनमध्ये सर्व प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांसह आधुनिक सुविधा, तसेच ऑटोमेटेड तिकिटिंग सिस्टम्स, डिजिटल बँक ब्रांच, एटीएम आणि सुलभ पर्याय उपलब्ध आहेत.
हे देखील वाचा – शेअर बाजारात पडझडीचे सत्र सुरुच; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण! वाचा… आज काय घडलंय!
कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (‘केएमबीएल’ / ‘कोटक’)ने या स्टेशनला ब्रँड नाव देण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) सोबत सहयोग केला आहे. ज्यामुळे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) सोबतचा त्यांचा प्रबळ सहयोग अधिक दृढ झाला आहे. उच्चस्तरीय कमर्शियल हब ‘कोटक महिंद्रा ग्रुप’ची ‘कर्मभूमी’ देखील आहे. जेथे दोन मोठी कार्यालये आहेत आणि हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनमध्ये प्रख्यात ब्रँडिंगचा समावेश असेल. ज्यामुळे त्याचे व्हिज्युअल लुक अधिक आकर्षक होईल आणि आर्थिक सेवांमधील नाविन्यता व सर्वोत्तमतेप्रती कोटकची कटिबद्धता अधिक दृढ होणार आहे.
कोटकने दृश्यमानता वाढवण्यासाठी बीकेसी आणि सीएसएमटी (व्हीटी) मेट्रो स्टेशन्ससोबत ब्रँडिंग अधिकार सुनिश्चित केले आहेत. हे दोन स्टेशन्स कोटक ग्रुपसाठी महत्त्वाचे आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या अॅफ्लूएण्ट, एनआरआय, बिझनेस बँकिंगचे अध्यक्ष व प्रमुख आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर रोहित भासिन म्हणाले आहे की, ”बीकेसी अनेक श्रमजीवी भारतीयांसाठी महत्त्वाचे हब आहे. जे नेहमी रस्त्यांवरील वर्दळीमधून प्रवास करतात. वर्षानुवर्षे मुंबईमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक स्वप्नवत प्रकल्प राबवताना दिसण्यात आले आहेत. मेट्रो लाइनच्या प्रवासाचा अनुभव देखील अधिक सुखकर होईल.
मुंबईमध्ये विविध सुधारणा केल्या जात असताना कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनमधून प्रबळ सार्वजनिक परिवहन नेटवर्क निर्माण करण्याप्रती शहराची कटिबद्धता दिसून येते. जे व्यापक व उत्साही व्यक्तींच्या मागण्यांची पूर्तता करते.