कचरा वेचणाऱ्या महिलांना सापडला मृतदेह
शनिवारी दुपारी सेक्टर-१४५ येथील डंपिंग ग्राऊंडवर काही महिला कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. तितेच त्यांना एक संशयास्पद काळ्या रंगाची मोठी बॅग पडलेली दिसली. त्यांनी ती बॅग उघडली तेव्हा त्यांना धक्काच बसला. बॅगमध्ये त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय २२ ते २५ वर्षांच्या दरम्यान आहे. तिच्या अंगावर लोअर आणि टीशर्ट आहे. आरोपींनी ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा देखील जाळला. त्यामुळे तिची ओळख पटवणे सध्या कठीण झाले आहे. प्राथमिक तपासात तिची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या निर्जन डम्पिंग ग्राऊंडवर आणून टाकल्याचा संशय आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहेत.
पोलिसांनी व्यक्त केला ऑनर किलिंगचा संशय?
याप्रकरणी पोलिसांनी ऑनर किलिंगचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपासासाठी चार विशेष पथके तयार केली आहे. आजूबाजूच्या परिसरातील आणि शेजारील जिल्ह्यांतील बेपत्ता मुलींची माहिती गोळा केली जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस या प्रकरणाचा सगळ्या पैलू ने तपास करत आहे.
Ans: नोएडाच्या सेक्टर-145 येथील डंपिंग यार्डमध्ये.
Ans: आरोपींनी तरुणीचा चेहरा जाळला आहे.
Ans: ऑनर किलिंगसह सर्व शक्य अंगांनी तपास सुरू आहे.






