धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्..., नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना
भाऊराव हिलम हे ओणे येथील बरड यस्तीवर शेतमजुरी करतात. शनिवारी सायंकाळी ते कसबे सुकेणे रेल्वेस्थानक परिसरातील पेट्रोल पंपावरून दुचाकीने घरी परतत होते. बसस्थानकाजवळ अचानक धारदार नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. हिलम यांनी प्रसंगावधान राखून हाताने मांजा बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मांजाने गळ्याला खोलवर जखम केली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हिलम यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉ. किरण देशमुख यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करून गळ्याला पाच टाके घातले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची छुप्या पद्धतीने विकी सुरू असल्याने अशा घटना घडत आहेत, प्रशासनाने केवळ कागदोपत्री बंदी न घालता मांजा विक्रेत्यांसह वापरणान्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कसबे सुकेणे परिसरातील नागरिकांनी केली आहे. दुचाकी चालवताना गळ्याला मफलर किंवा संरक्षक पट्टा वापरावा आणि वेग मर्यादित ठेवावा, जेणेकरून अशा संकटांपासून बचाव होऊ शकेल.
मी माझ्या अंतरात्म्याला स्मरून अशी शपथ घेतो-घेते की, पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्षी व माणसाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने यापुढे मी नायलॉन मांजा वापरणार नाही. याची ग्वाही देती-देते. तसेच, कोणी वापरताना दिसल्यास त्यांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगून ती वापरण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन.
नायलॉन मांजामुळे दरवर्षी होणाऱ्या अपघातांबद्दल गंभीर वास्तवाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण काची, यासाठी उडान फाऊंडेशनतर्फ सिन्नरमधील शाळांमध्ये जाऊन नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत मांजा न वापरण्याची शपय देण्याचा अभिनव उपक्रम राबविला. दिवसेंदिवस या मांजाचा वापर वाढत असून, त्याचा पेट फटका दुचाकीस्वारांना बसत आहे. काहीचा दुर्दैवी मृत्यूही होती. या पाश्र्वभूमीवर जनजागृतीसाठी फाऊंडेशनने तालुक्यातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्याव्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासह तो न वापरण्याची सामूहिक शपथ देण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्याव्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षक व शाळा व्यवस्थापनानेही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. भविष्यात ही चळवळ उज्युक्त ठरणार असल्याचा विश्वास उड़ानचे संस्थाइक अध्यक्ष भरत शिंदे यानी व्यक्त केला.






