Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Old Monk प्रेमींना मोठा धक्का! महाराष्ट्रातील विक्रीवरील Ban कायम; Bombay High Court चा थेट नकार

Old Monk Ban In Maharashtra : महाराष्ट्रातील Old Monk शौकिनांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ओल्ड मोंकच्या विक्रीवर महाराष्ट्रात लादलेली तात्पुरती बंदी उठवण्यास बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. उत्पादन आणि ब्रँड मालकी हक्काशी संबंधित कायदेशीर वादामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 06, 2026 | 07:32 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Old Monk प्रेमींना मोठा धक्का!
  • महाराष्ट्रातील विक्रीवरील Ban कायम
  • Bombay High Court चा थेट नकार
Old Monk Ban In Maharashtra : महाराष्ट्रातील ओल्ड मॉन्कची शौकिन असणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर महाराष्ट्रात लादलेली तात्पुरती बंदी उठवण्यास बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘ओल्ड मॉन्क’ची निर्मिती करणाऱ्या मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीज प्रायव्हेट लिमिटेडला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. कंपनीने महाराष्ट्रात ‘ओल्ड मॉन्क’च्या विक्रीवर बंदी घालणाऱ्या FSSAI आदेशाला आव्हान दिले होते. अजूनही बंदी का आहे बरकरार? ( Old Monk Ban In Maharashtra )

Social Security Fund : डिलिव्हरी बॉईज, ड्रायव्हर्सना सरकारकडून संरक्षण? PF, विमा अन् Pension चा मिळणार लाभ; काय आहे योजना ?

सुनावणीदरम्यान, कंपनीचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील नवरोज सीरवाई यांनी न्यायालयासमोर तीन सुधारित उत्पादन लेबले सादर केली. त्यांनी सांगितले की, कंपनीने कोणतेही हक्क न सोडता संभाव्य उपाय शोधण्यासाठी ही लेबले सादर केली आहेत. जर दोन्ही पक्षांनी हे बदल स्वीकारले, तर कंपनी ते करण्यास तयार आहे, परंतु कोणताही विरोध झाल्यास ते बदल मागे घेतले जाऊ शकतात.

पुढील सुनावणी ८ सप्टेंबरला

केंद्र सरकार आणि FSSAI यांचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या सुधारित लेबल्सबाबत सूचना मिळवण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. या प्रकरणातील पुढील सुनावणी ८ सप्टेंबर, २०२६ रोजी ‘तातडीच्या पूरक मंडळा’त होणार आहे. पण न्यायालयाने यावेळी कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.

काय होती कंपनीची मागणी?

कंपनीने FSSAI च्या आदेशाला स्थगिती देण्याची आणि प्रकरणाच्या अंतिम सुनावणीपर्यंत स्वतः उत्पादित केलेल्या रमची विक्री करण्याची परवानगी मागितली होती.
उच्च न्यायालयाने म्हटले की, या टप्प्यावर असा अंतरिम आदेश देणे हे अंतिम दिलासा देण्यासारखेच होईल.
न्यायालयाने हेही नमूद केले की, दोन्ही पक्ष प्रकरणाच्या अंतिम तोडग्याबाबत आधीच सविस्तर युक्तिवाद सादर करत आहेत.
न्यायालयाने म्हटले की, अशा परिस्थितीत कंपनीला अंतरिम टप्प्यावर रम विकण्याची परवानगी देणे योग्य होणार नाही.

ओल्ड मॉन्कवर बंदी का घालण्यात आली?

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाची तपासणी केल्यानंतर FSSAI ‘ओल्ड मॉन्क’च्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश दिला, आणि या वादाला सुरुवात झाली. FSSAI ने म्हटले की, कंपनीच्या उत्पादनात बाहेरून रमचा स्वाद वापरला जात होता, परंतु उत्पादनाच्या लेबलवर ‘फ्लेवर्ड रम’ असे स्पष्टपणे नमूद केलेले नव्हते. या आधारावर, अन्न नियामक संस्थेने महाराष्ट्रात त्याच्या विक्रीवर बंदी घातली.

Success Story : कधी भंगार विकायचे; आज 43000 कोटींचे मालक! महिला – मुलांच्या कल्याणासाठी दान करणार 75% संपत्ती

Web Title: Bombay high court refuses to stay ban on old monk rum sale in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • FSSAI
  • Liquor Ban
  • Mumbai High Court
  • Old Monk

संबंधित बातम्या

FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : प्रियागोल्ड बिस्किट उत्पादक कंपनी अडचणीत; पशुखाद्याचा कोंडा वापरल्याच्या आरोप
1

FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : प्रियागोल्ड बिस्किट उत्पादक कंपनी अडचणीत; पशुखाद्याचा कोंडा वापरल्याच्या आरोप

Government Action On Underage Drinking : 23 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना दारू पाजल्यास… सरकारचा कडक इशारा, पाहा नवीन नियम
2

Government Action On Underage Drinking : 23 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना दारू पाजल्यास… सरकारचा कडक इशारा, पाहा नवीन नियम

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका
3

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.