अर्थसंकल्प २०२४-२०२५ : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम या आज साठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2024) साधार करणार आहेत. निर्मला सीतारामन या इंग्रजीमध्ये अर्थसंकल्प साधार करणार आहेत. त्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या नव्या योजना आणल्या जातील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर काय अर्थसंकल्पामध्ये सांगतात त्यावर महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष असणार आहे.
अर्थसंकल्पाचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर बजेटचं थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. त्याचबरोबर संसद टीव्ही आणि दूरदर्शनच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हे भाषण ऑनलाइन पाहता येणार आहे. अर्थ मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट www.finmin.nic.in वरही थेट प्रसारण होणार आहे.
मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे आज सर्वांच्या नजरा अर्थसंकल्प २०२४ वर असणार आहेत.
अर्थमंत्री सीतारामन आज लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण 2024-25 इंग्रजीमध्ये वाचणार आहेत. परंतु संसद टीव्हीच्या माध्यमातून दर्शकांना अर्थसंकल्पीय भाषण हिंदीमध्ये ऐकण्याचा पर्याय असेल. लोकसभा सचिवालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार अर्थसंकल्पीय भाषण संसद टीव्ही चॅनल क्रमांक १ वर इंग्रजी भाषेत थेट प्रक्षेपित केलं जाणार आहे. तर संसद टीव्ही चॅनल क्रमांक २ वर अर्थसंकल्पीय भाषण हिंदीमध्ये ऐकता येणार आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, नवीन पेन्शन प्रमाणाली आणि आयुष्यमान भारत यासारख्या सामाजिक सुरक्षेची घोषणा होण्याची शक्यता आहे असे अंदाज वर्तवले जात आहेत.