Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच

इंडियामार्टची उपकंपनी आणि 'बिझी अकाउंटिंग सॉफ्टवेअर'ची निर्माती 'बिझी इन्फोटेक'ने भारतातील लहान आणि मध्यम उद्योगांसाठी MSME 'बिझी मॅजिक' हा नेक्स्ट-जनरेशन एआय-आधारित व्यवसाय व्यवस्थापन प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 22, 2026 | 07:32 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं!
  • MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय
  • AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच
बिझी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या बिझी अकाउंटिंग सॉफ्टवेअरची निर्माती आणि इंडियामार्टच्‍या उपकंपनीने आज बिझी मॅजिक या नेक्स्ट-जनरेशन व्यवसाय व्यवस्थापन आणि अकाउंटिंग प्लॅटफॉर्मच्या लाँचची घोषणा केली. भारतातील एमएसएमईंसाठी अकाउंटिंग, बिलिंग, इन्व्हेंटरी, जीएसटी आणि व्यावसायिक अहवाल सोपे बनवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म डिझाइन करण्‍यात आला आहे. संपूर्ण भारतातील ६ लाखांहून अधिक व्यवसायांना सेवा देण्याच्या बिझीच्या अनुभवावर आधारित बिझी मॅजिक पहिल्यांदाच सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांसाठी, तसेच वाढणाऱ्या व्यवसायांसाठी नवीन पिढीचा इंटरफेस, जलद नोंदणी प्रक्रिया, एआय-आधारित ऑटोमेशन आणि सोपी कार्यप्रणाली एकत्र आणतो.

नवीन व्यवसायांसाठी महत्त्वाची बातमी! Cashfree Payments कडून मार्च 2027 पर्यंत खास सवलत, होणार मोठा फायदा?

दैनंदिन कामकाजातील गुंतागुंत कमी करणं

बिझी मॅजिक व्यावसायिकांना विक्री, खरेदी, रोख आणि बँक स्थिती, येणे- देणे, साठ्याची मर्यादा, कमी असलेला साठा, प्रलंबित ऑर्डर्स, चलन, ई-वे बिले आणि ई-इनव्हॉइस यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी एकच डॅशबोर्ड उपलब्ध करून देऊन दैनंदिन कामकाजातील गुंतागुंत कमी करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म किरकोळ विक्रेते, वितरक, घाऊक विक्रेते, उत्पादक, व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांसह विविध क्षेत्रांतील लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी विकसित करण्‍यात आला आहे. हे विशेषतः अशा व्यवसायांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, जे हस्तलिखित नोंदी, स्प्रेडशीट्स आणि विस्कळीत व्यवस्थेकडून अधिक रचनाबद्ध व जोडलेल्या डिजिटल वातावरणाकडे जाऊ इच्छितात.

अडचण दूर करण्यासाठी डिझाइन

या लाँचबाबत मत व्यक्त करत बिझी इन्फोटेकचे सीईओ ब्रिजेश अग्रवाल म्हणाले , ”अनेक लहान व्यवसायांसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा स्वीकार करणे हे त्यांच्या डिजिटल बदलाच्या प्रवासातील पहिले मोठे पाऊल असते. बिझी मॅजिक मार्गदर्शन करणाऱ्या कार्यप्रणाली, उपयुक्त डॅशबोर्ड आणि एका सोप्या अनुभवाद्वारे ही अडचण दूर करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, जे व्यावसायिक आणि त्यांच्या अकाउंटिंग व्यवस्थेला पाठबळ देते. आमचे उद्दिष्ट दैनंदिन आर्थिक कामकाज कमी भीतीदायक आणि अधिक कार्यक्षम बनवणे हे आहे. सोप्या वापरासोबत प्रत्यक्ष उपयोगात येणाऱ्या ऑटोमेशनचा मेळ घालून आम्ही एमएसएमईंना त्यांच्या कामकाजावर अधिक दृढ नियंत्रण मिळवण्यास आणि आत्मविश्वासाने चांगले निर्णय घेण्यास मदत करू इच्छितो.”

उत्पादन वापरकर्त्यांना मदत करते

बिझी मॅजिकमधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एआय व्हाउचर स्कॅन आणि ऑटोमॅटिक बँक रिकॉन्सिलिएशन, जे वापरकर्त्यांना स्कॅन केलेल्या कागदपत्रांमधून व्हाउचरचा तपशील थेट मिळवण्यास, हस्तलिखित माहिती भरण्याचे काम कमी करण्यास आणि बँकेच्या तपशिलाचा अकाउंटिंग नोंदींशी मेळ घालण्यास मदत करते. जलद बिलिंग आणि व्हाउचर नोंदणी करणे, विक्री, खरेदी, रोख प्रवाह, येणे व देणे यांवर स्पष्ट नजर ठेवणे, साठ्याची अचूक नोंद ठेवणे, मॅन्युअल काम कमी करणे, जीएसटी व ई-इनव्हॉइस कार्यप्रणालीसाठी उत्तम तयारी असणे आणि व्यावसायिक, अंतर्गत टीम्स, अकाउंटंट्स व कर तज्ज्ञांमध्ये अधिक सुलभ समन्वय साधणे यासाठी हे उत्पादन वापरकर्त्यांना मदत करते. यामध्ये स्मुथ सिंक समाविष्ट आहे, जे नेहमीचा वेळखाऊ व्यवहार कमी करण्यासाठी आणि कायदेशीर पूर्तता व ऑडिट कार्यप्रणालीला गती देण्यासाठी व्यावसायिक आणि चार्टर्ड अकाउंटण्‍ट्स यांच्यात जलद द्विमार्गी डेटा हस्तांतरणास सक्षम करते.

भारतातील एमएसएमई परिसंस्थेत बिझी आपला विस्तार सातत्याने करत असताना बिझी मॅजिक लाँच करण्‍यात आले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १७० कोटी रुपयांचे बिलिंग आणि ४४.५ कोटी रुपयांची ईबीआआयटीडीए कमाई नोंदवली असून ४.४२ लाखांहून अधिक सॉफ्टवेअर परवाने विकले आहेत. तसेच ३५४ कर्मचाऱ्यांची टीम तयार केली असून १,००० हून अधिक नगर व शहरांमधील ८०० हून अधिक चॅनेल भागीदारांचे नेटवर्क उभारले आहे.

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?

Web Title: Busy infotech launches ai based accounting platform busy magic for msme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business News
  • GST
  • GST Rate Decrease
  • GST Rates
  • Marathi News
  • MSME
  • New Gst Rates

संबंधित बातम्या

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
1

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

BRICS Summit : चीनचा AI मास्टरप्लॅन! BRICS देशांसाठी ‘Open Source Zone’; अमेरिकेला नवा टेक्नॉलॉजी चॅलेंज?
2

BRICS Summit : चीनचा AI मास्टरप्लॅन! BRICS देशांसाठी ‘Open Source Zone’; अमेरिकेला नवा टेक्नॉलॉजी चॅलेंज?

आता युवा, शेतकरी, महिलांना मिळणार 21 देशांचं सहकार्य; BRICS परिषदेत PM Modi चा मोठा प्लॅन
3

आता युवा, शेतकरी, महिलांना मिळणार 21 देशांचं सहकार्य; BRICS परिषदेत PM Modi चा मोठा प्लॅन

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली
4

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.