Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘PAN Card’बाबतचे नवे नियम नेमके कुणासाठी? आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता करण्यात आले ‘हे’ बदल

स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घर, फ्लॅट किंवा जमिनीच्या व्यवहारात पॅन नसल्यास नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 02:35 AM
‘PAN Card’बाबतचे नवे नियम नेमके कुणासाठी? आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता करण्यात आले ‘हे’ बदल
Follow Us
Follow Us:

मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक
स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी पॅनकार्ड बंधनकारक
दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीदरम्यानही पॅन महत्वाचे

पुणे: आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि करचोरीला आळा घालण्यासाठी (Business) केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या ‘प्राप्तिकर कायदा २०२५’ अंतर्गत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. नव्या नियमांनुसार, उच्च मूल्याच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड (Permanent Account Number) सादर करणे अनिवार्य करण्यात आले असून, पर्यायी घोषणापत्रांची सुविधा बंद करण्यात आली आहे.

यापूर्वी पॅन नसलेल्या व्यक्तींना ‘फॉर्म ६०’ सादर करून काही व्यवहार करण्याची मुभा होती. मात्र नव्या व्यवस्थेत ही सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक राहणार आहे.

स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घर, फ्लॅट किंवा जमिनीच्या व्यवहारात पॅन नसल्यास नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीदरम्यानही पॅन सादर करावा लागणार आहे.

PAN Card Rules 2026: PAN कार्ड मिळवणे आता होणार कठीण! 1 एप्रिलपासून होणार नवे नियम लागू

बँकिंग क्षेत्रातही नव्या नियमांचा प्रभाव दिसून येणार आहे. एका दिवसात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करताना, परकीय चलन खरेदी करताना तसेच शेअर्स, म्युच्युअल फंड आणि डिबेंचर्समधील मोठ्या गुंतवणुकीसाठी पॅनकार्ड अनिवार्य असेल.
याशिवाय, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करताना तसेच ५० हजार रुपयांहून अधिक हॉटेल बिलांच्या व्यवहारातही पॅनची माहिती देणे आवश्यक राहणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच बँका आणि वित्तीय संस्थांना पॅनशिवाय उच्च मूल्याचे व्यवहार न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मते, प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेणे, करसंकलन वाढविणे आणि काळ्या पैशाच्या व्यवहारांवर नियंत्रण मिळविणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे अद्याप पॅनकार्ड नसलेल्या नागरिकांनी ते तातडीने काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या नव्या व्यवस्थेमुळे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील, करचोरीला आळा बसेल आणि प्रामाणिक करदात्यांना अधिक सुलभ व स्पष्ट व्यवहार प्रणालीचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

कोणत्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड अनिवार्य?
५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घर, फ्लॅट किंवा जमिनीची खरेदी-विक्री
दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी
एका दिवसात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बँकेत जमा करणे
परकीय चलन (Foreign Currency) खरेदी
शेअर्स, म्युच्युअल फंड आणि डिबेंचर्समधील मोठी गुंतवणूक
क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डसाठी अर्ज
५० हजार रुपयांहून अधिक रकमेची हॉटेल बिले
इतर उच्च मूल्याचे आर्थिक व्यवहार

Web Title: Central government made amendments to income tax act 2025 to enhance transparency in financial transactions pan card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Business News
  • income tax
  • pan card

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…
2

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
3

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
4

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.