प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान (photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ‘रेड बर्ड एव्हिएशन’च्या विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. कलबुर्गी जवळ असतानाच विमानाचे संतुलन बिघडल्याचे आणि ते हवेत डगमगू लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुख्य वैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे मंगलोर गावाजवळील एका शेतात विमान कोसळले.
#WATCH | Karnataka | Visuals from the spot where, according to Belagavi Police, “A Red Bird private jet carrying two passengers crashed in Mangalore village of Babaleshwar taluk, Vijayapura district.” Further details awaited. According to DGCA, Redbird Flying Training Academy… pic.twitter.com/njbDFFxIwY — ANI (@ANI) February 8, 2026
बँक खाते गोठवण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचा लगाम; मनमानी कारवाईवर ताशेरे
विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार इंधनाच्या कमतरतेमुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सखोल तपास सुरू केला आहे. ‘रेड बर्ड एव्हिएशन’ किंवा पोलीस प्रशासनाकडून अधिकृत विधान येणे अद्याप बाकी आहे.
‘रेड बर्ड एव्हिएशन’ ही भारतातील एक प्रमुख पायलट ट्रेनिंग अकॅडमी आहे. या दुर्घटनेत सेस्ना १७२ या विमानाचा वापर केला जात होता. हे विमान जगभरात वैमानिक प्रशिक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय मानले जाते. या विमानात बेसिक ऑटोपायलट यंत्रणा देखील असते, जी उंची आणि दिशा राखण्यास मदत करते.
दिल्ली नव्हे, देशातील ‘हे’ शहर ठरलं सर्वात प्रदूषित; श्वास घेणंही कठीण, रिपोर्टमध्ये खुलासा






