'या' आयपीओची शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री, 243 रुपयांचा आयपीओ 600 रुपयांवर झालाय सूचिबद्ध!
गेल्या महिन्यात अनेक आयपीओ शेअर बाजारात दाखल झाले होते. त्यानंतर आता या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग आणि शिव टेक्सकेम लिमिटेड अशा दोन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहे. या आयपीओंना सेबीकडून मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
हे आहेत दोन आयपीओ
१. गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग – गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग या आयपीओचा आकार 264.10 कोटी रुपयांचा असणार आहे. यामध्ये 173.85 कोटी रुपयांचे 1.83 कोटी नवीन शेअर्स जारी केले जाणार आहे. तर 90.25 कोटी रुपयांचे 95 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत जारी केले जाणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हा आयपीओ 8 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदार बोली लावू शकणार आहे. या शेअरची किंमत 92 रुपये ते 95 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 157 शेअर्स आहेत. यासाठी गुंतवणूकदारांना 14,915 रुपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट बुक करू शकतात.
काय करते ही कंपनी?
गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग ही एक बांधकाम कंपनी आहे. त्याची स्थापना 2010 मध्ये झाली. ही कंपनी निवासी, व्यावसायिक, औद्योगिक इत्यादी प्रकल्प बांधते. हे पायाभूत सुविधा आणि आदरातिथ्य प्रकल्पांसाठी सेवा देखील प्रदान करते. कंपनी IPO उत्पन्नाचा वापर तिच्या खेळत्या भांडवलाच्या निधीसाठी, काही संपादने करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करेल.
२. शिव टेक्सकेम लिमिटेड – शिव टेक्सकेम लिमिटेड हा आयपीओ 101.35 कोटी रुपये किमतीचा असणार आहे. कंपनीच्या या आयपीओमध्ये 61.06 लाख किमतीचे शेअर हे पुर्णपणे नव्याने जारी केले जाणार आहे. तर ओएफएसअंतर्गत कोणतेही शेअर्स जारी केले जाणार नाहीत.
हा आयपीओ 8 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. गुंतवणूकदार या आयपीओसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत बोली लावू शकतील. या आयपीओच्या एका शेअरची किंमत ही 158 ते 166 रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 800 शेअर्स आहेत. यासाठी गुंतवणूकदारांना 1,32,800 रुपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार फक्त एक लॉट बुक करू शकणार आहे.
काय करते ही कंपनी?
ही कंपनी हायड्रोकार्बन आधारित रसायनांची आयात आणि वितरण करते. हे रसायन अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून वापरले जाते. कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली आहे. कंपनी या आयपीओमधून मिळालेल्या निधीचा वापर तिच्या दीर्घकालीन कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे. ही रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी देखील वापरली जाणार आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)