धोकादायक ऑगस्ट..! अनेक आर्थिक घटना घडल्यात याच महिन्यात; शेअर बाजारात सांभाळून पाऊल टाका!
आजपर्यंतच्या माहितीनुसार, जगभरात सर्वाधिक आर्थिक घटना या ऑगस्ट महिन्यात घडतात. मग एखादे युद्ध म्हणा… किंवा मग शेअर बाजार… किंवा आर्थिक मंदीची शक्यता ही याच महिन्यात समोर येते. जाणकारांच्या माहितीनुसार, सर्वाधिक आर्थिक घटना याच महिन्यात घडल्या आहेत. सध्याच्या घडीला जगभरात आर्थिक हिंदोळे बसत आहे. इस्राईल-इराण युद्ध असेल, अमेरिकेतील आर्थिक मंदीची चाहूल असेल, बांगलादेशमधील राजकीय पेचप्रसंग असेल किंवा मग जगभरासह भारतीय शेअर बाजाराची पडझड असेल. या सर्व घटना ऑगस्ट महिन्यातच आपले विक्राळ रूप धारण करत उदयाला येत आहे.
शेअर बाजारात जपून पावले टाकण्यातच शहाणपण
आता तुम्ही म्हणाल की ऑगस्ट महिन्यात घडणाऱ्या मागील घटना कोणत्या? तर ऑगस्ट यापूर्वी देखील अनेक मोठ्या आर्थिक घडल्या आहेत. ज्यामुळे आता असे म्हटले जाऊ शकते की, आर्थिक वर्ष आणि कॅलेण्डर वर्षांमध्ये ऑगस्ट महिन्यात हा सर्वात धोकादायक महिना मानला जात आहे. यापूर्वी 2015 मध्येही चीनमध्ये संभाव्य मंदीच्या धोक्यामुळे शेअर बाजार 1500 हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यावेळी ही 2015 सालचा तो महिनाही ऑगस्टच होता. त्यामुळे आता या महिन्यात शेअर बाजारात जपून पावले टाकण्यातच शहाणपण असणार आहे.
हेही वाचा : अदानी, हिंडेनबर्ग गदारोळातच …आता मुकेश अंबानींबाबत उपस्थित होतोय ‘हा’ मुद्दा!
जुलै ते सप्टेंबर आर्थिकदृष्ट्या धोकादायक काळ
तज्ज्ञांच्या मते, आर्थिकदृष्ट्या जुलै ते सप्टेंबर हा काळ सर्वात धोकादायक मानला जातो. अशा स्थितीत ऑगस्टमध्ये घडणाऱ्या घटना येणाऱ्या संकटांची चाहूल असते. परिणामी, शेअर बाजारात सावधपणे आपली पावले उचलणे, गरजेचे असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या घडत असलेल्या अनेक घटना ऑगस्टमध्ये सुरू होतात. ज्यामुळे पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये आर्थिक संकट निर्माण होते. या घटनांमुळे ऑगस्टमध्ये अनेकांना तणाव जाणवू लागतो. मात्र, आगामी काळात आर्थिक संकटाची हीच ती चाहूल असते.
मंदीच्या घटनांबाबत साम्य
जगभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यांनी ऑगस्टमध्ये आर्थिक संकट निर्माण केले. ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात आर्थिक परिस्थिती बिकट होते. जुलै 1990 च्या उत्तरार्धात इराक कुवेतवर हल्ला करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण 2 ऑगस्ट रोजी इराकी सैन्याने सीमा ओलांडत कुवेतवर हल्ला केला. या युद्धामुळे तेलाच्या किमती तीन पटीने वाढल्या होत्या. त्यामुळे ब्रिटनसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये महागाई दरात लक्षणीय वाढ झाली होती. यातून मंदीचा काळ सुरू झाला.
हेही वाचा : येत्या आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार; ‘या’ कारणामुळे असेल सुट्टी!
इस्रायल, इराणमध्ये युद्धसदृश परिस्थिती
ऑगस्ट 2008 मध्ये मंदीची सुरुवात झाली. त्यावेळी पाश्चिमात्य देशांत आर्थिक स्तरावर बराच गोंधळ सुरू होता. जग आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडण्याची भीती अनेकांना वाटत होती. आणि तेच झाले. सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले. यानंतर जगभरात मंदी आली. सध्या इस्रायल आणि इराणमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हा महिनाही ऑगस्टचा आहे. इस्रायलनेही हल्ले सुरू केल्याचे वृत्त आहे. मध्यपूर्वेतील या तणावामुळे तेलाचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ शकते. असे झाले तर भारतात देखील पुन्हा मंदी येऊ शकते.