येत्या आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार; 'या' कारणामुळे असेल सुट्टी!
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, भारतीय शेअर बाजाराला मोठा हिंदोळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता पुढील आठवड्यात शेअर बाजाराला तीन दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गुरुवारच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे बँकांना तसेच शेअर बाजाराला पुढील आठवड्यात सुट्टी असणार आहे. तर १७ आणि १८ ऑगस्टला शनिवार, रविवार असल्याने शेअर बाजार बंद असणार आहे.
गुरुवारी राष्ट्रीय सणाची सुट्टी
पुढील आठवड्यात गुरुवारी देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत या राष्ट्रीय सणानिमित्त संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सणाची सुट्टी असणार आहे. बँका आणि शाळांसोबतच शेअर बाजारही बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवारी आठवडी सुट्टी असल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजार बंद असल्याने इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह बाजार बंद राहतील.
(फोटो सौजन्य : istock)
ऑगस्ट महिन्यात इतके दिवस बाजाराला असेल सुट्टी
– 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनी शेअर बाजार बंद राहणार.
– 17 ऑगस्ट – शनिवार असल्याने सुट्टी असेल.
– 18 ऑगस्ट – रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सुट्टी असेल.
– 24 ऑगस्ट – शनिवार असल्याने सुट्टी असेल
– 25 ऑगस्ट – रविवार असल्याने सुट्टी असेल.
– 31 ऑगस्ट – शनिवार असल्याने सुट्टी असेल
देशभरातील बँकांनाही असेल सुट्टी
15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशात सुट्टी असेल. 18 ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी असेल. 19 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ या शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. त्याच वेळी 20 ऑगस्ट रोजी श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त कोची आणि तिरुअनंतपुरममधील बँकांना सुट्टी असणार आहे.