अदानी, हिंडेनबर्ग गदारोळातच ...आता मुकेश अंबानींबाबत उपस्थित होतोय 'हा' मुद्दा!
हिंडेनबर्ग रिसर्चने आपला नवीन अहवाल जारी करत, सेबीच्या अध्यक्ष माधवी बूच यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अदानी समूह प्रकरणात हिंडेनबर्गने माधवी बूच यांचे देखील नाव गोवले आहे. अशातच आता अदानी, हिंडेनबर्ग गदारोळात … मुकेश अंबानींबाबत देखील एक मुद्दा उपस्थित होतो आहे. उद्योजक आणि गुंतवणूकदार असलेल्या अनुपम मित्तल यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल हा मुद्दा उपस्थित केला आहे.
काय आहे नेमका हा मुद्दा?
‘इंडियन टेक अँड इन्फ्रा’ या एक्स हॅन्डलने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने खर्च कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच नोकरभरतीचा वेग कमी करण्यावर देखील कंपनीकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे.
असे कारण देत ही ४२ हजार कर्मचाऱ्यांची कपात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून केली जाणार आहे. याच मुद्द्यावरून उद्योजक आणि गुंतवणूकदार असलेल्या अनुपम मित्तल यांनी ‘इंडियन टेक अँड इन्फ्रा’ या एक्स हॅन्डलचे हे ट्विट रिट्विट करत, या मुद्द्यावर इतकी शांतता का आहे? असे म्हटले आहे.
नेमकं काय म्हटलंय अनुपम मित्तल यांनी?
शादी डॉटकॉमचे संस्थापक आणि शार्क टॅंक इंडियाचे जज अनुपम मित्तल यांनी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून होणाऱ्या ४२ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 42 हजार? या बातमीबाबत इतकी शांतता का आहे? या बातमीमुळे आर्थिक आणि राजकीय पटलावर प्रश्न उपस्थित व्हायला हवे होते. हा गंभीर धोका मानला गेला पाहिजे.
42k? Why is this ‘quiet news’? Should be raising serious alarm bells across the economic & political circles 🤷🏻 https://t.co/L0XP0nnzHu
— Anupam Mittal (@AnupamMittal) August 10, 2024
काय आहे नेमकं कर्मचारी कपातीचे कारण?
‘इंडियन टेक अँड इन्फ्रा’ या एक्स हॅन्डलने जारी केलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 42 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. खर्चात कपात करणे आणि नोकरभरतीचा वेग कमी करण्यासाठी ही कपात कंपनीकडून केली जाणार आहे.