मुंबई : आघाडीच्या जागतीक ग्राहक वित्त प्रदाता संस्थेची स्थानिक सहयोगी संस्था होम क्रेडिट इंडिया (HCIN),दिवाळीच्या निमित्ताने “जिंदगी हिट”-च्या वचनासह आपल्या नवीन ब्रँड अभियानाचा शुभारंभ करत आहे. “जिंदगी हिट” हा ग्राहकांच्या अपेक्षापूर्तीच्या माध्यमाने त्यांच्याशी असलेल्या कनेक्टला पुन्हा परिभाषित करण्याचा होम क्रेडिटचा प्रयत्न आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये आरबीआयद्वारे नियमन केले जाणाऱ्या ग्राहक एनबीएफसीच्या स्वरुपात या वर्षी होम क्रेडिट इंडिया १० वर्षे पूर्ण करण्याच्या काळात हे अभियान प्रस्तुत केले जात आहे.
ब्रँड कॅम्पेनचा परिचय दिवाळी कॅम्पेन फिल्ममध्ये करण्यात आला असून, “लोकांना आत्ता अपेक्षित असलेले जीवन जगण्याची मुभा देण्याच्या” ब्रँडच्या धेय्याचे हे प्रतीक आहे. होम क्रेडिट इंडियाचे ग्राहकांच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करणारी संस्था बनण्याचे लक्ष या अभियानामधून प्रकर्षाने समोर येते.
होम क्रेडिटच्या भारतातल्या दशकभराच्या यात्रेत असे निरीक्षण करण्यात आले आहे की, सर्व वेतनधारक ग्राहकांच्या जीवनाबद्दलच्या अपेक्षा एकसमान असतात. परंतु कमी उत्पन्न श्रेणीला कायम आपल्या इच्छा दाबाव्या लागतात किंवा खरेदी करण्यातल्या अडचणींमुळे कायम प्रतिक्षा करावी लागते. नेमके हेच होम क्रेडिट इंडियाचे तत्व आहे, ही संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या लोकांना आपल्या सोप्या व अडचण विरहित कर्जांनी आपल्या स्वप्नांना सत्यात आणण्यात मदत करते. जेव्हा स्वप्न पूर्ण होते, तेव्हा जीवनाचा प्रत्येक क्षण सणासारखा वाटतो.
या दिवाळीच्या न्यू ब्रँड टॅगलाइन बद्दल बोलताना होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आशिष तिवारी म्हणाले,”या वर्षी भारतात आम्ही एक दशक पूर्ण केले आहे, आमच्यामते ब्रँडला ग्राहकांच्या आणखीन समिप नेण्याची ही अतिशय योग्य वेळ आहे. मिळवलेल्या शिकवणूकींवरुन जिंदगीहिट या टॅगलाइनसोबत, आम्हाला ग्राहक तसेच संभाव्य कर्ज मिळवण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसह होम क्रेडिट बॅंडच्या अर्थाला व कनेक्टला पुनरुज्जीवीत करण्याची इच्छा आहे. यथायोग्यपणे वापर करणा-यांसाठी कर्ज ही बळकटी आणणारी बाब असते आणि होम क्रेडिटच्या सेवा लोकांना त्यांच्या इच्छा साकारण्यात मदत करण्यात सक्षम बनण्यासाठी झटतात. यामुळेच होम क्रेडिट इंडियामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या #ZindagiHit साठी त्यांच्यासोबत कार्यरत आहोत.”
होम क्रेडिट इंडिया ब्रँड अभियानाची तत्वे इष्टतमता, प्रगती, विश्वासार्हता, पारदर्शकतेसारख्या गुणविशेषांभोवती गुंफलेली आहेत, ज्यामुळे ग्राहक कर्जाच्या बाबतीत ब्रँडची त्याच्या सक्षमपणामुळे निवड केली जाते. हे फेस्टिव्ह कॅम्पेन/अभियान होम क्रेडिटच्या सोशल चॅनलसह Facebook, Instagram, Twitter, YouTube, LinkedIn या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर त्याचप्रमाणे MX Player सारख्या प्रसिध्द ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाइव्ह आहे
या सणाच्या मोहकतेत आणखीन भर पाडण्यासाठी आणि ग्राहकांच्या भावनांना प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न म्हणून, या दिवाळीला होम क्रेडिट इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी#ZindagiHitची निर्मिती केली आहे, ज्यामुळे ते किमान 20000 रु. किमतीचे मोबाईल्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि घरगुती अप्लायन्सेस एचसीच्या 50K+ पीओएस भागीदार दुकानांमधून कर्जाच्या रकमेवर 7.5% कॅशबॅक देऊन खरेदी करु शकतील, ही रक्कम बॅंक खात्यामधून थेट डेबिट होईल.
होम क्रेडिट इंडियाने आपल्या १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतेच#10SaalBemisal अभियान सुरु केले आहे. या अभियानातून ब्रँडचा भारतातला एक दशक लांबीचा प्रवास अधोरेखीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कर्जदाराला केंद्रस्थ ठेवणा-या सेवा व सेफ पे (पेमेंट हॉलिडे, शून्य अग्रिम परतावा दंड आणि विमा), केअर 360 (हितावह आरोग्यदेखभाल सेवा संरक्षण उत्पादन), उज्ज्वल ईएमआय कार्ड (डिजिटल प्रि-सेट क्रेडिट लिमिट कार्ड) इ. अनेक उत्पादनांची ओळख करुन देत देशभरात क्रेडिटचा प्रसार करण्यामार्फत आर्थिक समावेशकतेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन देखील ठळक होते.
देशात आपली पावले ठामपणे रोवत, होम क्रेडिट इंडिया सद्यस्थितीत 625हून जास्त शहरांमध्ये, 53,000 पॉइंट ऑफ सेल (पीओएस)च्या नेटवर्क सह कार्यरत आहे. तिची ग्राहकसंख्या 15 दशलक्षाहून जास्त आहे. एक जवाबदार ग्राहक कर्जप्रदाता म्हणून होम क्रेडिट इंडिया 3 दशलक्षाहून जास्त व्यक्तींसोबत आपल्या आर्थिक साक्षरता अभियान-पैसे की पाठशाला मार्फत सक्रिय आहे, ज्यामुळे समाजामध्ये मोठ्याप्रमाणावर जवाबदार कर्ज संस्कृतीला चालना मिळते.