पर्यटन विकासासाठी गोव्याची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवा; रोहन खंवटेंची शेखावत यांच्याकडे मागणी!
जागतिक पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी गोव्याची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवणे. त्यासाठी प्रमुख जागतिक शहरांशी संपर्क सुधारण्याची गरज आणि त्यातून गोव्याच्या प्रमुख पर्यटन स्थळांची प्रतिष्ठा वाढवणे. या उद्देशाने गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली आहे. यावेळी बैठकीत पुनर्संचयित पर्यटन आणि वर्धित आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीवर भर देण्याबाबत चर्चा झाली आहे.
बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा?
जागतिक पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी गोव्याची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवणे. हा या बैठकीच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू होता. गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनी थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवण्याच्या आणि प्रमुख जागतिक शहरांशी संपर्क सुधारण्याच्या महत्त्वावर भर दिला. ज्यामुळे गोव्याची प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रतिष्ठा वाढेल. असे या बैठकीत म्हटले आहे.
Held a meeting with Union Minister for Tourism, Shri Gajendra Singh Shekhawat Ji and alongwith Secretary Sanjeev Ahuja & Director-Tourism Suneel Anchipaka, discussed our initiatives of Regenerative Tourism and sought Central support for enhancing Tourism Infrastructure in Goa.… pic.twitter.com/69SkKmQlVs
— Rohan Khaunte (@RohanKhaunte) August 10, 2024
प्रसाद योजनेला गती देण्याची विनंती
चर्चेचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोव्यातील सर्वात प्रतिष्ठित वारसा स्थळांपैकी एक असलेल्या बॅसिलिका ऑफ बॉम जीझससाठी प्रसाद योजनेला गती देण्याची विनंती गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली आहे. याशिवाय गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनी प्रसाद प्रकल्पाला गोव्यातील आगामी प्रमुख प्रदर्शनासह संरेखित करण्याच्या गरजेवर भर दिला. ज्याकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा उपक्रम वेळेवर पूर्ण केल्याने अभ्यागतांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव वाढण्यासोबत राज्याच्या एकूण पर्यटन आकर्षणालाही चालना मिळेल. असेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून मदतीची मागणी
याव्यतिरिक्त, गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनी राज्याच्या पर्यटन पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहनात्मक प्रयत्नांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीची मागणी केली. दोन्ही मंत्र्यांनी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचा दर्जा उंचावण्यासाठी सहयोगी प्रयत्नांचे महत्त्व मान्य केले. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी गोव्याला केंद्राच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे आगामी पर्यटन उपक्रमांचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. या बैठकीला गोव्याचे पर्यटन सचिव संजीव आहुजा, आयएएस आणि गोवा पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका, आयएएस उपस्थित होते.