Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा
Maharashtra to World Breaking News: अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने खामेनेईंच्या हत्येचा बदला घेणार असल्याची शपथ घेतली आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे.
02 Mar 2026 05:36 PM (IST)
तालुक्यातील येलूर व कुंडलवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने पाळीव शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी चालत्या वाहनांवर झेप घेण्याचे धाडस केल्याने प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. तसेच शिराळा तालुक्यात बिबट्यांची संख्या आणि वावर लक्षणीय वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून शेतीकामावरही त्याचा परिणाम होत आहे. डोंगर, रान आणि उसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचा मुक्त वावर वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करणे.
02 Mar 2026 05:14 PM (IST)
Mahindra & Mahindra ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार Mahindra XEV 9e चा सिनेलक्स एडिशन (Cinelux Edition) लाँच केले आहे. हे विशेष एडिशन टॉप-ऑफ-द-लाइन पॅक थ्री व्हेरिएंटवर आधारित आहे. या कारमध्ये 79 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून कंपनीच्या दाव्यानुसार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ती 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. ही कार आता दोन नवीन प्रीमियम रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे – सॅटिन ब्लॅक (Satin Black) आणि सॅटिन व्हाईट (Satin White).
02 Mar 2026 04:50 PM (IST)
श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये 800 पैलवानांनी सहभाग नोंदवला होता. 11 ते 19 वयोगटातील 25 मुलीने देखील या कुस्ती स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पैलवान या कुस्तीच्या फळांमध्ये सहभागी झाले होते लातूर शहरा नजीक असलेले रायवाडी या गावचे ऋषी बोंबले हे विजेते ठरले असून सव्वा किलो चांदीचा गदा पटकावत सिद्धेश्वर केसरीचा मान पटकावला. ऋषी बुमडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपले वडील नातेवाईक मित्रमंडळी व वस्ताद यांना देत. महाराष्ट्र केसरी साठी देखील माझी तयारी सुरू आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा देखील जिंकेन अशा पद्धतीचा आत्मविश्वास ऋषी बोंबले यांनी नवराष्ट्र शी बातचीत करताना दिला करताना दिला. त्याचबरोबर आजकालच्या युवकांनी नशेच्या आहारी न जाता मैदानी खेळ व व्यायाम नियमित करावा अशा पद्धतीच्या आव्हान देखील ऋषी कराड यांनी युवकांना केले. या स्पर्धेसाठी प्रशासक सचिन जांबुतकर व मंदिर विश्वस्त, अशोक भोसले व्यंकटेश हालिंगे सुरेश मुंडे रमेश भिसेन विशाल झांबरे या लोकांनी चांगल्या पद्धतीचा आयोजन केले होते.
02 Mar 2026 04:45 PM (IST)
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अंबरनाथ येथील एका तरुणीने स्वतःला संपवले. पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्य का येत आहे? याबाबत या तरुणांशी संवाद साधला आहे.
02 Mar 2026 04:40 PM (IST)
माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या गिरीस्थान नगरपरिषद शिक्षण मंडळाची हुतात्मा वीर भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेने यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरावर भरारी मारली आहे.जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम आलेल्या माथेरान पालिका शाळेचे राज्यस्तरीय समितीने मूल्यांकन केले असून राज्य स्तरावर माथेरान पालिका नंबर पटकावेल असा आशावाद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांना आहे.
02 Mar 2026 04:35 PM (IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या तथाकथित ‘Epstein Files’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाईंदरमध्ये रस्त्यावर महिला आणि पुरुष यांच्यात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी Navghar Police Station येथे दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून येत्या काही दिवसांत राज्यभर आंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी आंदोलनासंदर्भातील जाहिरात फलक लावले जात आहेत. संबंधित फलकांवर पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावून त्यावर निषेधार्थ फुली मारण्यात आल्याचे दिसून आले.
02 Mar 2026 04:25 PM (IST)
ठाण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा महागिरी कोळीवाडा येथे ‘एक गाव, एक होळी’ हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील सर्व समाजबांधव एकत्र येत एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देत होळी उत्सव साजरा केला.
02 Mar 2026 04:20 PM (IST)
कुडाळ-मालवण मार्गावर नाबरवाडी येथे आज सकाळी ११.३० च्या सुमारास दुचाकी आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन दुचाकीसस्वार महिला जागीच ठार झाली आहे. कुडाळ ते मालवण मार्गावर भरधाव डंपर आणि ट्रक यांची वाहतूक सुरू असते. यामुळे अपघातांची संख्या वाढत असून या भरधाव वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कारवाई न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
02 Mar 2026 04:18 PM (IST)
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील भगरिया केमिकल्स मध्ये ओलियम वायूची गॅस गळती झाल्याने परिसरातील कामगारांना व नागरिकांना वायुगतीचा त्रास होऊ लागला आहे ओलियम वायू हवेच्या संपर्कात आल्याने सल्फर डाय ऑक्साईड व इतर सल्फर्स ऑक्साईड ची निर्मिती होऊन त्याचा परिणाम परिसरात होऊ लागला आहे ओलियमचा मोठा साठा असणाऱ्या एमआयडीसी च्या टी झोन मधील भगरिया केमिकल्स मध्ये दुपारी दोन ते सव्वा दोन वाजल्याच्या दरम्यान ओलियमची गळती सुरू झाली वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने सल्फर डाय ऑक्साईड व इतर सल्फर्स ऑक्साईड ची निर्मिती होऊन त्यामुळे परिसरातील कामगार व नागरिक बाधित झाले आहेत सल्फर डाय-ऑक्साइडमुळे डोळ्याला चुरचुरणे डोळे लाल होणे घशामध्ये कोरड पडणे घशा मधून खवखव होणे इत्यादी प्रकार घडू शकत असून या वावीची व्यक्ती सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाले आहे या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाफर यांनी माहिती मिळतात त्यांनी आपत्कालीन व्यवस्था कक्ष तसेच महसूल व इतर यंत्रणेला सतर्क केला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू असावे घटनास्थळी पोचली असून पोलिसांचा मोठा ताफा कंपनीच्या परिसरात तैनात करण्यात आला
02 Mar 2026 04:15 PM (IST)
सध्या जगावर युद्धाचे सावट आहे. मिडल ईस्ट भागात इराण विरुद्ध अनेक देश जोरदार युद्ध सुरू झाले आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आहेत. मार्क कार्नी हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धावर भाष्य केले आहे. इराण-इस्त्रायल, अमेरिकेच्या युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे.
02 Mar 2026 03:40 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटातून जात असल्याचे चित्र आहे. निसर्गाचा लहरीपणा, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव, मजुरांची कमतरता, वाढती मजुरी, महागडी कीटकनाशके तसेच शासनाचे दुर्लक्ष या कारणांमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे ‘रायगडच्या शेतकऱ्याला वालीच नाही’ अशी भावना शेतकरीवर्गात व्यक्त होत आहे.
02 Mar 2026 03:35 PM (IST)
देशात ‘गोल्डन स्पाइस’ म्हणून ओळखली जाणारी हळद उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्थापन केलेले राष्ट्रीय हळद मंडळ २९ जून २०२५ रोजी तेलंगणातील निजामाबाद येथे कार्यान्वित झाले. कृषी संशोधन, मूल्यवर्धन आणि निर्यातवृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प मराठवाड्यात येऊ शकला असता मात्र राजकीय इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण पाठपुराव्याअभावी ही संधी हुकल्याची चर्चा कृषी वर्तुळात रंगत आहे.
02 Mar 2026 03:30 PM (IST)
गेली पाच, सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा व काजूचे अपेक्षित पिक हातात येत नाही. बदलते हवामान, अवकाळी पाउस, कमी जास्त थंडी याचा थेट परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी सन २०२५-२०२६ मध्ये तर भरपूर मोहोर येऊनही फलधारणा झालेली नाही. तरी याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांसोबत चर्चा करून भरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
02 Mar 2026 03:25 PM (IST)
खेळण्या-बागडण्याच्या आणि शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे, संसार थाटण्याचे स्वप्न रंगवित असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत, असाच काहीचा प्रकार गुजरातमधील अहमदाबादमधील चिलोडा परिसरात घडला आहे.
02 Mar 2026 03:20 PM (IST)
वातवरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, दूषित पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला कावीळसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाते. कावीळ हा लिव्हरसबंधित अतिशय धोकादायक आजार आहे. योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील रक्ताचे पाणी होते आणि कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. शरीरातील बिलीरुबिन नावाच्या पिवळ्या रंगाच्या द्रव पदार्थाचे प्रमाण वाढल्यानंतर कावीळ होते.जगभरात लिव्हरच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात कावीळ कशामुळे होते? कावीळ झाल्यानंतर कोणते लक्षणे दिसून येतात आणि त्यावरील उपाय? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती
02 Mar 2026 03:15 PM (IST)
मध्यपूर्व भागामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण-इस्रायल अमेरिकेच्या (Iran-Israel) या युद्धामध्ये भारताने मध्यस्थी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून प्रादेशिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि अलीकडील घडामोडींबद्दल भारताच्या चिंता व्यक्त केल्या. यावेळी, त्यांनी स्पष्ट केले की नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि या प्रदेशातील शत्रुत्व लवकरच संपले पाहिजे.
02 Mar 2026 03:10 PM (IST)
मध्यपूर्वेतील आकाश सध्या लढाऊ विमानांच्या गर्जनेने आणि क्षेपणास्त्रांच्या धुराने काळवंडले आहे. आज सोमवारी सकाळी कुवेतमध्ये एक मोठी लष्करी दुर्घटना घडली. अमेरिकन हवाई दलाचे अत्यंत शक्तिशाली मानले जाणारे F-15 ईगल (US F-15 Eagle crash Kuwait) लढाऊ विमान कुवेतच्या भूमीवर कोसळले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, आकाशातून आगीचा गोळा जमिनीकडे झेपावताना पाहून स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही घटना केवळ अपघात आहे की घातपात, यावर आता जागतिक चर्चा सुरू झाली आहे.
02 Mar 2026 03:05 PM (IST)
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांची दिल्लीत हैद्राबाद हाऊस येथे भेट घेतली आहे. या वेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी जुने राजकीय मतभेद विसरुन संरक्षण, व्यापार, आणि उर्जा सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याचा नवा अध्याय सुरु केला. या भेटीत भारत आणि कॅनडामध्ये १० वर्षांचा युरेनियम साठा पुरवठा करार करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास ३ अब्ज डॉलर्स आहे.
02 Mar 2026 02:35 PM (IST)
मुंबईतील भांडूप परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच्याच मित्रांनी जीव घेतल्याचे समोर आले. सुरुवातीला तलावात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी तिघा मित्रांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
02 Mar 2026 02:30 PM (IST)
१४ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, बॉलीवूडमधील सर्वांत आवडता अभिनेता-दिग्दर्शक जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ‘भूत बंगला’साठी पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला काही आयकॉनिक कॉमेडी चित्रपट देणारी ही जोडी यावेळी हॉरर-कॉमेडीसह परतत आहे. भीती आणि विनोदाचा समतोल साधणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भन्नाट अनुभव देणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्सच्या पाठिंब्याने तयार होत असलेला हा सिनेमा त्यांच्या खास विनोदशैली, अप्रतिम कॉमिक टाइमिंग आणि पूर्वीच्या सहकार्यांना ‘कल्ट क्लासिक’ बनवणाऱ्या मनोरंजनाची आठवण करून देणार आहे.
02 Mar 2026 02:15 PM (IST)
प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरिजित सिंग याने नुकतीच पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. जेव्हा त्याने निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले की ते इतक्या लवकर गायन कसे सोडू शकतो. त्याच्या निवृत्तीची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले. अरिजित सिंग हा एक असा गायक आहे ज्याच्याकडे त्याच्या आवाजाने हृदय तोडण्याची आणि बरे करण्याची क्षमता आहे. जर तुम्ही अरिजित सिंगचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
02 Mar 2026 02:10 PM (IST)
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे आता इराणमधील दुसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँकेच्या मुंबई शाखेच्या मान्यतेवर RBI कडून निर्णय लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बँक पसारगडने अनेक वर्षांपूर्वी भारतात शाखा उघडण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी त्यांनी मुंबईची निवड केली होती. बँकेने २०१८ मध्ये पहिल्यांदा मुंबई शाखेचा प्रस्ताव दिला होता. आता युद्धामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून परवाना मिळविण्याची प्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे.
02 Mar 2026 02:00 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हैदराबाद हाउस में कनाडा के प्रधानमंत्री मार्क कार्नी से मुलाकात की।
(सोर्स: DD न्यूज़) pic.twitter.com/RLIwL4kvD0
— ANI_HindiNews (@AHindinews) March 2, 2026
02 Mar 2026 01:58 PM (IST)
तुमचं ही स्वप्न आहे का की एकाद्या प्रसिद्ध भारतीय सरकारी कंपनीत काम करायचं? तर आता ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. EdCIL (इंडिया) लिमिटेडन एक उत्तम संधी देत आहे. शिक्षण मंत्रालयच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या कंपनीने यंग प्रोफेशनल्स साठी सात रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ही नोकरी अशा तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे ज्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन वास्तविक प्रकल्पांवर काम करायचं आहे. EdCIL मुख्यतः अशा प्रकल्पांवर काम करते जे शिक्षण क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणू इच्छितात.
02 Mar 2026 01:55 PM (IST)
इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी ट्रम्पवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या इच्छापूर्ण विचारसरणीने संपूर्ण प्रदेशाला अनावश्यक युद्धात ओढले आहे. ट्रम्प यांना अमेरिकेच्या सैनिकांची खरोखर चिंता असेल. पण ते इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेकायदेसीर विस्तारवादी महत्त्वाकांक्षाना पाठिंबा देत आहे. ट्रम्प केवळ आपले रक्त आटवून नेतन्याहूंवर पैसा वाया घालवत आहेत.
02 Mar 2026 01:50 PM (IST)
जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या हत्येविरोधात निदर्शने सुरू आहेत. ही निदर्शने तीव्र झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून, काश्मीरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
#WATCH श्रीनगर | ईरान के सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई की हत्या के खिलाफ विरोध प्रदर्शन जारी है। एहतियात के तौर पर कश्मीर के सभी जिलों में पाबंदियां लगाई गई हैं। भारी सुरक्षा तैनात की गई है। pic.twitter.com/1CWZduMFad
— ANI_HindiNews (@AHindinews) March 2, 2026
02 Mar 2026 01:45 PM (IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच इंदिरा गांधी स्टेडियममध्ये दिल्ली सरकारच्या महिला कल्ल्याणकारी योजनांचा शुभारंभ करती. या योजनांमध्ये 'सहेली पिंक स्मार्ट कार्ड', मोफत एलपीजी सिलेंडर योजना, दिल्ली लखपती बिटिया योजना आणि 'मेरी पुंजी मेरा अधिकार' योजना यांचा समावेश आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
#WATCH | Delhi: President Droupadi Murmu to shortly launch four women's welfare schemes of the Delhi government at the Indira Gandhi Indoor Stadium.
The four schemes are 'Saheli Pink Smart Card,' free LPG cylinder scheme, Delhi Lakhpati Bitiya Yojana, and 'Meri Punji Mera… pic.twitter.com/z2Fibfszwx
— ANI (@ANI) March 2, 2026
02 Mar 2026 01:40 PM (IST)
दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचे महिनाभरापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झाले. हा अपघात होता की घातपात होता यावरुन राजकारण रंगले आहे. अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय घेतला जात असताना त्यांच्या पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भावनिक पोस्ट केली आहे. अमोल मिटकरी यांनी होळीच्या मुहूर्तावर अजित पवारांशिवाय होळी कशी साजरी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर
02 Mar 2026 01:35 PM (IST)
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत सुरू झालेल्या महायुद्धाने आता संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. या युद्धाची झळ केवळ आखाती देशांनाच नाही, तर तिथल्या विकासकामात आणि श्रमात मोलाचा वाटा असलेल्या दक्षिण आशियाई देशांनाही बसू लागली आहे. आपल्या लाखो नागरिकांच्या जीविताची काळजी घेत, नेपाळ सरकारने आता अत्यंत सक्रिय पाऊल उचलले आहे. परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष आपत्कालीन मदत पथकाची स्थापना करण्यात आली असून, युद्धाच्या खाईत अडकलेल्या नेपाळी जनतेला वाचवण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम सुरू झाले आहे. वाचा सविस्तर
02 Mar 2026 01:30 PM (IST)
पश्चिम आशियात प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण भयंकर संघर्ष सुरु आहे. या संघर्षाचे परिणाम संपूर्ण पश्चिम आशियात पसरले आहे. इराण पश्चिम आशियातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत असून नुकतेच तुर्कीतील अमेरिकेच्या तळावर क्षेपाणस्त्रे डागण्यात आली आहेत.
02 Mar 2026 01:25 PM (IST)
मध्यपूर्वेत इस्रायल-अमेरिकेने इराणविरोधात सुरु केलेल्या लष्करी कारवाईने भयंकर रुप धारण केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा या कारवाईत मृत्यू झाला असून इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्रायल सातत्याने मध्यपूर्वेतील चार देशांवर सतत हल्ले करत आहे. इराणने इस्रायलसह, कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, सौदी अरेबिया आणि युएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.
02 Mar 2026 01:20 PM (IST)
इराणमधील घडामोडींचे सर्वात भीषण पडसाद शेजारील देश पाकिस्तानात उमटले आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पाकिस्तानच्या रस्त्यांवर दुःखाऐवजी संतापाचा वणवा पेटला आहे. कराचीपासून ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत (PoK) हजारो लोक रस्त्यावर उतरले असून सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या थेट चकमकीत आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र धूर, अश्रूधुराचे लोट आणि दहशतीचे वातावरण असून ही एक मोठी मानवतावादी शोकांतिका ठरत आहे.
02 Mar 2026 01:20 PM (IST)
पश्चिम आशियातील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल तणाव आता शिगेला येऊन पोहोचला आहे. दोन्ही गटांकडून हल्ल्यांचा वर्षावर सुरुच असून इराणने अमेरिकेचे F-15 फायटर जेट हाणून पाडल्याचा दावा केला आहे. इराणच्या माध्यमांनी आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ अमेरिकेचे फायटर जेट खाली पडताना दिसत आहे. मात्र अद्याप अमेरिकडून याची पुष्टी करण्यात आलेली नाही. रशिया युक्रेन संघर्षानंतर मध्यपूर्व युद्धात बुडाला असून जगातील दुसरा सर्वात मोठा लष्करी संघर्ष सुरु आहे.
02 Mar 2026 01:15 PM (IST)
मध्यपूर्वेतील तणाव आणखी पेटला आहे. अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे सुरु केलेले ऑपरेशन एपिक फ्युरी अजूनही सुरुच आहे. याचे पडसाद लेबनॉन सीमेवरही पाहायला मिळाले आहे. इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईंच्या हत्येनंतर इस्रायलने हिजबुल्लाहवर निशाणा साधला आहे. इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहाविरोधात आक्रमक कारवाईची घोषणा केली आहे.लेबनॉन सीमेजवळ हल्ला करण्यात आला असून यामध्ये किमान ३१ लोक ठार झाले असल्याचे आणि शेकडो जखमी असल्याचे वृत्त मिळाले आहे.
02 Mar 2026 01:10 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण ९,३२२ कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही मोठ्या नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. प्रामुख्याने जुन्या आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांनाच गती देण्यावर प्रशासनाने भर दिला असून, नवीन योजनांचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. निवडणूक होऊन लोकप्रतिनिधी सत्तेत आले असले तरी, हा अर्थसंकल्प प्रशासकीय काळात तयार झाल्याने त्यात कल्पकतेची कमतरता असल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर
02 Mar 2026 01:05 PM (IST)
इराण आणि इस्रायलमधील युद्धाने भारतीय गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली असून, इराण-अमेरिका-इस्राइल यांच्या युद्धाचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार उघडताच क्षणी लालेलाल रंगात दिसला. ज्यामुळे बाजार पत्त्यांच्या घरासारखा कोसळला. या युद्धामुळे निर्माण तणावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी बुडालेच नाही तर सामान्य जनतेमध्ये महागाई वाढण्याची एक नवीन भीती निर्माण झाली. मोठे आणि लहान गुंतवणूकदार केवळ युद्धाच्या बातम्या आणि त्यांच्या घसरत्या पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करत होते. वाचा सविस्तर
02 Mar 2026 01:00 PM (IST)
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण जगाला एकाच प्रश्नाने ग्रासले आहे – ‘खामेनींचं पार्थिव नेमकं कुठे आहे?’ २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली हवाई हल्ल्यात खामेनी मारले गेले, या बातमीला ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप इराणच्या सरकारी माध्यमांनी त्यांच्या पार्थिवाचे कोणतेही दर्शन घडवलेले नाही. अंत्यसंस्काराबाबतचा हा सस्पेन्स आता जगभरातील गुप्तचर यंत्रणांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. वाचा सविस्तर
02 Mar 2026 12:55 PM (IST)
भारत आणि पाकिस्तान (India Pakistan water dispute 2026) यांच्यातील तणाव आता केवळ सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो ‘पाण्या’वरून पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी भारताने सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये नद्यांवर वेगाने धरणे आणि जलसंचय प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. भारताची ही वाढती ताकद पाहून पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि तिथले लष्करी अधिकारी भारताच्या या जलप्रकल्पांना “धोकादायक शस्त्र” (Dangerous Weapon) म्हणू लागले आहेत.
02 Mar 2026 12:45 PM (IST)
माथेरान नगरपरिषदेत आर्थिक तूट दिसून येत असून शहरातील पालिकेच्या वास्तू अंधारात जाण्याची शक्यता आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या वस्तुंसाठी केला जाणारा वीज पुरवठा यांची थकबाकी ३५ लाखांवर पोहचली आहे. दरम्यान पालिकेच्या ५४ वास्तूमध्ये सुरू असलेला वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी १० दिला आहे. मात्र आर्थिक लूट होईल अशा वस्तूंच्या खरेदीवर पालिकेचे नियंत्रण नसल्याने माथेरान पालिकेची तिजोरीत आणखी खळखळाट दिसून येणार आहे.माथेरान नगरपरिषद आपल्या मालकीच्या ५४ वास्तूमधील वेगवेगळ्या उपक्रमांना वीज पुरवठा करीत असते. त्यात शाळा, कार्यालय, मार्केट, घोड्यांचे तबेले, सार्वजनिक दिवाबत्ती, चार्जिंग स्टेशन आदी ठिकाणी वीज पुरवठा महावितरणकडून केला जातो.
02 Mar 2026 12:40 PM (IST)
अमेरिका-इस्त्राइलच्या संघर्षाचा फटका भारतीयांनाही होत असून, उरणमधील दाम्पत्य अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी दुबईला गेले होते, पण विमानसेवा बंद झाल्यामुळे आता हे दाम्पत्य दुबईत अडकले आहे. त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. उरणच्या जसखार गावचे हे दाम्पत्य असून, त्यांचे नातेवाईक या घटनेमुळे चिंतेत आहेत. कवीश विजय घरत आणि प्रांजली घरत हे दोघे दुबई फिरण्याचा आनंद लुटत असताना दुबईवर इराणकडून झालेल्या हल्यामध्ये दुबईची वाहतूक व्यवस्था तसेच आयात-निर्यात व्यवस्था बंद करण्यात आली आहे. यातच विमानतळावार हल्ला झाल्याने विमानतळ देखील उड्डाणासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे दाम्पत्य अडकले आहे. अशाचप्रकारे मुंबईतीलही शेकडो पर्यटक दुबई तसेच आखाती देशांमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे.
02 Mar 2026 12:35 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण ९,३२२ कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही मोठ्या नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. प्रामुख्याने जुन्या आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांनाच गती देण्यावर प्रशासनाने भर दिला असून, नवीन योजनांचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. निवडणूक होऊन लोकप्रतिनिधी सत्तेत आले असले तरी, हा अर्थसंकल्प प्रशासकीय काळात तयार झाल्याने त्यात कल्पकतेची कमतरता असल्याचे चित्र आहे.
02 Mar 2026 12:30 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता इराण आणि इस्रायलच्या सीमा (Iran-Israel War) ओलांडून इतर देशांमध्ये पसरु लागली आहे. या देशामधील विनाशकारी युद्धाची झळ ही भारताला देखील बसण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर शिया मुस्लीम आक्रमक झाले आहेत. शिया मुस्लीम यांनी शोक व्यक्त केला असून बदल्याची भावना व्यक्त केली आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये शिया मुस्लीम रस्त्यावर उतरले असून तीव्र निषेध करत आहेत. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (Home Ministry) खबरदारी घेतली जात आहे. काही राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
02 Mar 2026 12:25 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाने ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करून २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अभिमानाने प्रवेश केला. ईडन गार्डन्सवर झालेल्या त्यांच्या शेवटच्या सुपर ८ सामन्यात संजू सॅमसनने भारतासाठी एक उत्कृष्ट खेळी खेळली आणि भारताला विजय मिळवून दिला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग करून भारताने इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १९५ धावांचा डोंगर उभा केला.
02 Mar 2026 12:20 PM (IST)
राजपाल यादव संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात चर्चेत राहिले आहेत. २०१२ मधील चेक बाउन्स प्रकरणात त्यांनी मागील महिन्यात तिहार कारागृहात सरेंडर केले होते. त्यानंतर कुटुंबातील लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःवर झालेल्या फसवणुकीच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देखील दिले आहे. तसेच चित्रपटसृष्टीतून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल अभिनेत्याने आभार देखील मानले आहेत. मात्र याच वेळी प्रियदर्शन यांच्या एका वक्तव्यावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देखील व्यक्त केली.
02 Mar 2026 12:15 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आज मी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालो आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारीचा शब्द देऊन मालवण-कुडाळ मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मदत केली. त्यामुळेच मी दहा वर्षानंतर राज्याच्या सभागृहात आमदार म्हणून सक्रिय झालो आहे, अशा भावना शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या.
02 Mar 2026 12:08 PM (IST)
माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले.
02 Mar 2026 12:05 PM (IST)
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक 18 मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्याच्या गळात पडणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक रविवारी पार पडली.
02 Mar 2026 11:55 AM (IST)
अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा वणवा भडकला असतानाच आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही युद्ध सुरू झालं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या क्षेत्रात केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून अफगाणिस्तानातील तालिबानी प्रशासनाने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, तालिबानी हवाई दलाने रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस, क्वेटा येथील 12 वी तुकडी, खैबर पख्तूनख्वा येथील मोहम्मद एजेन्सीसह घलानी येथील सैन्य तळांना टार्गेट केलं आहे.
02 Mar 2026 11:45 AM (IST)
पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकाबाबत प्रदेश काँग्रेसने यंदा निवडणूक लढलेल्या एकाही उमेदवाराला स्वीकृत म्हणून संधी देण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे.. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचा निर्णय भाजपकडून देखील घेण्यात आला होता.
02 Mar 2026 11:39 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहे. फडणवीस आणि ही जबाबदारी स्वीकारताच पुणे जिल्ह्याला 2026-27 च्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अवघी 93 कोटी रुपयांची वाढ मिळाली आहे. गेल्या वर्षी अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी 123 कोटी रुपयांची वाढ दिली होती. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी हा पहिला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. जिल्हा नियोजन समितीने मुख्यमंत्र्यांकडे 700 कोटींची वाढ मागितली होती आणि अवघी 93 कोटींची वाढ मिळाली आहे.






