Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Delivery : आता थेट आकाशातून होणार जेवणाची डिलिव्हरी! Uber Eats ची मोठी घोषणा, Zipline सोबत केली भागिदारी

Food Delivery : ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी उबेर ईट्सने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आधुनिक आणि अनोखी सुविधा आणण्यासाठी 'झिपलाईन' या ड्रोन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ट्रॅफिकचा सामना न करता थेट आकाशातून अत्यंत कमी वेळेत गरम आणि ताजे जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 18, 2026 | 06:07 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता थेट आकाशातून होणार जेवणाची डिलिव्हरी!
  • Uber Eats ची मोठी घोषणा
  • Zipline सोबत केली भागिदारी
Food Delivery : आपण जेवण किंवा इतर गोष्टी ऑनलाइन मागवतो त्यामुळे कोणतंही सामान आपल्यापर्यंत सहज पोहोचतं. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. आतापर्यंत, आपण जेवण ऑर्डर केलं की ते आपल्यापर्यंत ३० ते ४५ मिनिटांत आपल्या दारापर्यंत पोहोचतं. पण भविष्यात या पेक्षा कमी वेळामध्ये आणि अगदी सहज तुमचं जेवण तुमच्यापर्यंत पोहोचलणार आहे. हा असा बदल आहे जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुमचे जेवण आता रस्त्यावरून नाही, तर थेट आकाशातून येणार आहे. नेमके काय होणार आहेत बदल? ( Food Delivery ) 

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम

जेवण आकाशातून येणार का?

Uber Eats ने ड्रोन कंपनी झिपलाइनसोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमांतर्गत, डिलिव्हरी एजंटच्या गरजेशिवाय, अमेरिकेतील ग्राहकांना ड्रोनद्वारे जेवण पोहोचवले जाईल. दोन्ही कंपन्यांच्या मते, ज्या अमेरिकन शहरांमध्ये झिपलाइन आधीपासून कार्यरत आहे, तिथे २०२६ च्या अखेरीस ड्रोन डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. यानंतर, ही सेवा अमेरिकेतील इतर अनेक शहरांमध्ये विस्तारण्याची योजना आहे. उबरने झिपलाइनमध्ये धोरणात्मक गुंतवणूकही केली आहे, मात्र गुंतवणुकीची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

दररोज १० लाख डिलिव्हरीचं टार्गेट

ही काही छोटी ट्रायल नाही; उबर आणि झिपलाइनने २०२९ च्या अखेरपर्यंत दररोज १० लाख ड्रोन डिलिव्हरी करण्याचे मोठं ध्येय समोर ठेवलं आहे. झिपलाइनच्या मते, त्यांचे ड्रोन नेटवर्क आधीच चार खंडांमध्ये कार्यरत आहे. कंपनीने आतापर्यंत २७ लाखांहून अधिक डिलिव्हरी केल्या आहेत, ज्यात २ कोटींहून अधिक वस्तूंचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचे नेटवर्क अंदाजे दर २० सेकंदाला एक डिलिव्हरी करते.

ड्रोन डिलिव्हरीसाठी फ्लायट्रेक्ससोबत भागीदारी

उबरसाठी, ड्रोन डिलिव्हरी त्यांच्या सध्याच्या डिलिव्हरी प्रणालीचा एक अविभाज्य भाग असणार आहे. भविष्यात, कंपनी मानवी डिलिव्हरी एजंट्ससोबत ड्रोन आणि इतर ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर वाढवून ऑर्डर्स अधिक वेगाने पोहोचवण्याची योजना प्लान करत आहे.
हे लक्षात घेणं गरजेचं आहे की उबरने यापूर्वी ड्रोन डिलिव्हरीसाठी फ्लायट्रेक्ससोबत भागीदारी केली आहे. झिपलाइनसोबतचा हा नवीन करार कंपनीच्या स्वायत्त डिलिव्हरी धोरणाला आणखी मजबूत करेल. जर २०२९ चे लक्ष्य गाठले गेले, तर अमेरिकेत ड्रोन उबर ईट्सच्या डिलिव्हरी प्रणालीचा एक सामान्य भाग बनू शकतात आणि लोकांच्या घरी अन्न पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

TATA Sons AGM Breaking : टाटा समूहाच्या इतिहासातील पहिलीच घटना! टाटा संसची बैठक अचानक रद्द; काय आहे यामागचे मुख्य कारण?

Web Title: Food delivery uber eats drone service features and launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • Business News
  • food
  • Food Safety
  • Marathi News
  • uber

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.