मुंबई: नवं 2023 चं वर्ष गौतम अदानी (Gatam Adani) यांच्यासाठी चांगलं नसल्याचं दिसतंय. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या (Adani Group) विश्वासाहर्ततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कंपनीच्या शेअर्सची (Adani Shares) बाजारात मोठी घसरण होताना दिसते आहे. गेल्या 7 दिवसांत कंपनीचं 10 लाख कोटींहून अधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. याचा परिणाम गौतम अदानी यांच्या एकूम मालमत्तेवरही होतोय. त्यांचा जागतिक श्रीमतांच्या क्रमवारीतला क्रमांकही झपाट्यानं खाली येताना दिसतो आहे.
शेअर बाजारात अदानींच्या शेअर्सची धूळधाण
अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्च यांच्या रिपोर्टनं गौतम अदानी यांचं साम्राज्यचं हादरलेलं आहे. अदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स विकण्यासाठी बाजारात मोठी घाई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अदानी ग्रुपचे जास्तीचे शेअर्स हे लोअर सर्किटवर आहेत. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन पॉ़वर, अदानी पॉवर, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही हे सगळे शेअर्स लोअर सर्किटमध्ये पाहायला मिळतायेत. या ढासळत्या उत्पन्नामुळं अदानी यांचा जागतिक क्रमवारीतील श्रीमंतांमधील क्रमांक 20च्याही खाली आला आहे. अदानी यांना एका दिवसातच 12.5 अब्ज डॉलर्सचा फटकाही सहन करावा लागलाय.
6 दिवसांत 46 टक्क्यांची घसरण
शुक्रवारीही बाजारात अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळतेय. अदानी एंटरप्रायजेझचा शेअर 1178 पर्यंत पोहचला आहे. शेअर्समध्ये 25 टक्क्यांनी घसरण झालीये. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, एनडीटीव्ही हे सगळे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आले आहेत. केवळ अदानी पोर्टचा शेअर अजून लोअर सर्किटमध्ये आलेला नाही.