(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अलीकडेच कार्तिक आर्यनचे एका मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो व्हायरल झाले होते, ज्यामुळे असा अंदाज लावला जात होता की तो एका मिस्ट्री गर्लला डेट करत आहे. कार्तिक आर्यन गोव्यात वेळ आपल्या सुट्टीची मज्जा घेत होता आणि ती मिस्ट्री गर्लही तिथे दिसली. सोशल मीडियावर आलेल्या कार्तिक आणि या मिस्ट्री गर्लच्या फोटोंमध्ये वापरकर्त्यांनी काही हिंट शोधले, ज्यावरून असे दिसून आले की ते गोव्यात एकत्र सुट्टीवर आहेत. दरम्यान, कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर त्या मुलीला अनफॉलो केल्याचे वृत्त देखील समोर आले. आणि तिनेही प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक आर्यनच्या “मिस्ट्री गर्ल”चे नाव करीना कुबिलियुट आहे. कार्तिकसोबतच्या तिच्या नात्याबद्दल ती काय म्हणाली जाणून घेऊयात.
कार्तिक आर्यनचे “मिस्ट्री गर्ल”सोबतचे फोटो समोर आल्यापासून, ती कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली. त्यानंतर लोकांनी सर्व तपशील शोधण्यास सुरुवात केली, “मिस्ट्री गर्ल” कोण आहे, तिचे वय किती आहे आणि ती काय करते हे शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने आता तिच्या इन्स्टा बायोलाही ‘मी कार्तिकला ओळखत नाही.’ असे देखील लिहिले आहे.
निवडणूक प्रचारकांनी फोडले फटाके, Daisy Shah च्या घराजवळ लागली आग; संतप्त अभिनेत्रीने सुनावले खडेबोल
ही “मिस्ट्री गर्ल” कोण आहे, करीना १७ वर्षांची विद्यार्थिनी?
तिचे नाव करीना कुबिलियुट आहे, ती यूकेची रहिवासी आणि किशोरवयीन विद्यार्थिनी आहे. वृत्तानुसार, ती यूकेमधील कार्लिसल कॉलेजमध्ये शिकत आहे. कार्तिक आर्यन आणि करीनाचे गोव्यातील सुट्टीदरम्यान काढलेले फोटो सारखेच सोशल मीडियावर दिसत होते. त्यानंतर, एक्स आणि रेडिटवरील वापरकर्त्यांनी दोघांवर चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यांनी कार्तिक आणि करीनाच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील फोटोचा शोध घेण्यास सुरुवात केली.
कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले
युजर्सनी असा दावाही केला होता की कार्तिक आर्यन करीनाला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होता पण आता त्याने तिला अनफॉलो केले आहे. कार्तिक किंवा करीनाने या वृत्तांवर आणि दाव्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. आणि यादरम्यान मिस्ट्री गर्ल म्हणाली आहे, “मी कार्तिकची गर्लफ्रेंड नाहीये.” कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या डेटिंगच्या अफवा आणि व्हायरल फोटोंवर आता करिना कुबिलियुटेने प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले आहे की ती त्याची गर्लफ्रेंड नाही आहे. एका युजरने एका पोस्टवर करीनाच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
कार्तिक आर्यनचे नाव या अभिनेत्रींशी जोडले गेले आहेत
याआधी अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचे नाव सारा अली खान, अनन्या पांडे, पश्मीना रोशन, श्रीलीला, जान्हवी कपूर आणि फातिमा सना शेख यांच्याशी जोडले गेले आहे. तसेच तो सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘तू मेरी में तेरा में तेरा तू मेरी’ साठी चर्चेत आहे. यामध्ये तो अभिनेत्री अनन्या पांडेसोबत रोमान्स करताना दिसला आहे.






