Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

Ghee Sale Ban : बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न सुरक्षा विभागाने मोहीम तीव्र केली आहे. पनीरवरील कडक कारवाईनंतर आता भेसळयुक्त तुपाच्या विक्रीवर राज्य सरकारने १ वर्षाची थेट बंदी घातली आहे. नेमका कोणत्या राज्याने हा निर्णय घेतला आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 02:41 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर
  • करण्यात आली कठोर कारवाई
  • ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी
Ghee Sale Ban : बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचं मार्केटमध्ये प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अन्नपदार्थांविरोधात अन्न सुरक्षा विभागाने मोहीम तीव्र केली आहे. देशभरात पनीरवर कडक कारवाई झाल्यानंतर आता पुढचं टार्गेट तूप असणार आहे. बाजारात भेसळयुक्त तुपाची विक्री होत असल्याचं समोर आल्यानंतर आता सरकारची नजर तुपावर पडली आहे. त्यामुळे विक्रीवर राज्य सरकारने 1 वर्षाची थेट बंदी घातली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी होणार खेळ रोखण्यासाठी आणि पडत चाललेली गुणवत्ता परत आणण्यासाठी कठोर निर्णय घेतले जात आहे. हा निर्णय नेमका कोणत्या राज्याने घेतला? त्याचा इतर राज्यांवर काय परिणाम होणार? ( Ghee Sale Ban ) 

Shipping Charge Hike : ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना झटका! पार्सल डिलिव्हरीच्या दरात वाढ; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

‘या’ सरकारने घेतला निर्णय

हा महत्त्वपूर्ण निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. सरकारने अन्नपदार्थ आणि उत्पादनांमधील भेसळीविरोधात एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल केली जाते अशा गोष्टींचे शिगंजे आवळण्याचं काम सध्या सरकार करत आहे. राज्य सरकारने, मानकांची पूर्तता न करणाऱ्या आणि ‘तूप’ म्हणून लेबल लावलेल्या उत्पादनांचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि पुरवठ्यावर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. हा आदेश संपूर्ण हरियाणा राज्यात लागू करण्यात आला आहे.

हा निर्णय अशा वेळा घेण्यात आला आहे ज्यावेळी राज्यात अन्न सुरक्षा विभाग अन्न गुणवत्ता आणि भेसळीविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. या आदेशानुसार, बाजारात ‘तूप’ या नावाने विकल्या जाणाऱ्या बनावट उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.

नेमकी कोणावर बंदी असेल?

हरियाणा सरकारच्या आदेशानुसार, ‘तूप’ म्हणून विकले जाणारे किंवा जाहिरात केले जाणारे कोणतेही उत्पादन, ज्याची रचना आणि गुणवत्ता ठरवून दिलेल्या गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाही अशा गोष्टींच्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात येईल. विशेषतः, पूजेसाठीचे तूप, दिव्यासाठीचे तूप, वनस्पती तूप, स्वयंपाकाचे तूप, जेवणाचे तूप आणि हवनासाठीचे तूप यांसारख्या नावांनी विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचाही या आदेशात समावेश करण्यात आहे. ही उत्पादने बाजारात ‘तूप’ या नावाने विकली जाऊ शकत नाहीत.

शुद्ध तुपावरही बंदी?

सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा अर्थ असा नाही की बाजारातील सर्व प्रकारच्य तुपाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या तुपाची विक्री सुरूच राहणार आहे. या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, शुद्ध तुपावर बंदी घालण्यात आलेली नाही. पण बनावट किंवा मानकांची पुर्तता केली जात नाही अशा तुपावर बंदी घातली आहे.

हा आदेश कधीपासून लागू होणार?

२१ ऑगस्ट २०२६ पासून एक वर्षासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, जर हा आदेश रद्द केला नाही, तर ही बंदी ऑगस्ट २०२७ पर्यंत लागू राहील. हरियाणाचे अन्न सुरक्षा आयुक्त, डॉ. मनोज कुमार यांनी जारी केलेला हा आदेश, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ च्या कलम ३०(२)(अ) चा आधार येतो.

चीज आणि बटरवरही कारवाई?

तुपाव्यतिरिक्त, हरियाणा सरकारने अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी चीज आणि बटरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या मार्जरीनच्या विक्रीवरही एक वर्षाची बंदी घातली आहे. अॅनालॉग चीजमध्ये अशा उत्पादनांचा समावेश होतो, जी दिसायला आणि स्पर्शाला नेहमीच्या चीजसारखीच असतात, परंतु दुधाच्या फॅटऐवजी, ती पूर्णपणे किंवा अंशतः वनस्पती तेल आणि वनस्पती फॅट वापरून बनवलेली असतात.

Fake Paneer Ban News : देशभरात पनीरवर येणार बंदी? राज्यांनंतर केंद्र सरकार उचलणार मोठे पाऊल; बनावट पनीरवर कडक कारवाई

Web Title: Ghee sale ban for 1 year in this state after paneer food safety action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Banned
  • Business News
  • Desi Ghee
  • FSSAI

संबंधित बातम्या

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…
1

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर
2

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी
3

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी

Vedanta Nand Ghar : वेदांताच्या ‘नंद घर’ मोहिमेने बदलले लाखो कुटुंबांचे चित्र; पोषण अभियानातील उल्लेखनीय कामगिरी
4

Vedanta Nand Ghar : वेदांताच्या ‘नंद घर’ मोहिमेने बदलले लाखो कुटुंबांचे चित्र; पोषण अभियानातील उल्लेखनीय कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.