महाराष्ट्रातील परवडणाऱ्या घरांसाठी गोदरेज कॅपिटलचे अर्थसहाय्य (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Godrej capital Marathi News: गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची वित्तीय सेवा शाखा, गोदरेज कॅपिटलने आपल्या गृह वित्त उपकंपनीच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन विरार येथे केले. आवाक्यातील घरांना अर्थसहाय्य करण्यासाठी निवडण्यात आलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. वसई, बोईसर, डहाणू, पालघरसह अन्य जवळपासच्या भागातही ही शाखा सेवा पुरवेल आणि कमी ते मध्यम-उत्पन्न गटाला गृहकर्ज उपलब्ध करून देईल.
मध्यम ते कमी उत्पन्न असलेल्या गृहखरेदीदारांना स्वस्तातील घरांचे पर्याय शोधून देणे, तसेच पगारदार आणि व्यावसायिकांसाठी INR 5 लाखांपासून गृहकर्ज उपलब्ध करून देणे, हे गोदरेज कॅपिटलचे उद्दिष्ट आहे. या कर्जाचा कालावधी 30 वर्षांपर्यंतचा असेल. आवड आणि किंमत याची सांगड घालण्यासोबतच गृहनिर्माण फायनान्स सोल्यूशन्ससह गृहखरेदीदारांमध्ये एक विश्वास निर्माण करणे, हा या व्यवसाय उभारणीमागचा हेतू आहे.
कमी ते मध्यम-उत्पन्न गटाला गृहकर्ज देणारे विरार हे पहिले ठिकाण आहे. या भागातील सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे घरांची मागणी वाढली आहे. याबरोबरच, सार्वजनिक सुविधांचा विस्तार आणि वसई-विरारच्या जवळपासच्या बाजारपेठांचा विकास यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी ते एक उत्तम केंद्र बनले आहे. वर्धित कनेक्टिव्हिटी आणि सुधारित सुविधांमुळे विरार हे आवाक्यातील घरांसह उत्तम सोयीसुविधा शोधणाऱ्या घर खरेदीदारांची एक पसंतीचे ठिकाण म्हणून समोर येत आहे.
विरार येथील शाखा सुरू केल्यानंतर लवकरच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 11 अतिरिक्त शाखा सुरू केल्या जातील, ज्यामुळे संधी असलेल्या बाजारपेठांमध्ये जास्तीत जास्त लोक घरे घेऊ शकतील या कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला पाठबळ मिळेल.
या उद्घाटन प्रसंगी, गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ श्री. मनीष शाह म्हणाले: “स्वतःच्या मालकीचे घर असणे हे कोणत्याही कुटुंबासाठी किती महत्त्वाचे असते, हे आम्ही जाणतो. कोणत्याही परिवारासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि यामुळेच या क्षेत्रातील आर्थिक समावेश वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. घर खरेदीदारांना विश्वासार्ह गृहनिर्माण वित्त पर्यायांसह विकसित होण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी या व्यवसायामागचा दृष्टिकोन जोडलेला आहे. आमच्या विस्तार योजनेतील विरार हा पहिला टप्पा आहे आणि आम्ही या प्रदेशातील गृहनिर्माण क्षेत्रात योगदान देण्यास उत्सुक आहोत.”
सेवा वितरण आणि ग्राहक-केंद्रित उपायांवर लक्ष केंद्रित करून, अनुकूल आर्थिक उत्पादने ऑफर करून गृहकर्ज प्रक्रिया सुलभ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना सातत्यपूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली असून प्रगत डिजिटल सेवांसह कागदपत्रांचा त्रास कमी करण्याचा आणि जलद मंजूरी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. व्यापक आर्थिक समावेशन सुनिश्चित करून अनौपचारिक उत्पन्न विभागांना पूर्ण करण्यासाठी लवचिक अंडररायटिंग मानके निश्चित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, उत्पादन विभाग कमी उत्पन्न
असलेल्या ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजना (PMAY 2.0) सबसिडीचा लाभ घेता येऊ शकतो.
ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी, पूर्व-मंजूर प्रकल्पांसाठी विभागातील नामांकित विकासकांसोबत टाय-अप करण्यात आले आहे. ज्यामुळे गृहखरेदीदारांना अधिक सुलभ पद्धतीने अर्थसहाय्य करणे शक्य होते.