(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India-Israel Trade: भारत–इस्रायल व्यापाराला मिळणार नवी चालना; एसबीआयकडून रुपयांत होणार व्यवहार सुलभ
बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एका कार्यक्रमात बोलताना, नरेंद्र मोदींच्या संभाव्य भेटीबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये एक मजबूत युती असून विविध सहकार्याच्या क्षेत्रांवर ही चर्चा अवलंबून आहे. त्यांनी असेही म्हटले की, इस्रायलच्या लोकांना भारत प्रचंड आवडतो. जानेवारीत, भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी पंतप्रधान मोदींना दौऱ्यासाठी आमंत्रण देण्यात आले असल्याची पुष्टी केली होती. त्यांच्या भेटीची अधिकृत तारिख लवकरच जाहीर केली जाईल असे त्यांनी म्हटले.
दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार करार दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार करारवर वाटाघाटी चर्चा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी इस्रायलला भेट दिली.
यावेळी भारत आणि इस्रायलमध्ये (Israel) आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा झाली होती. तर मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यास दोन्ही देशांनी सहमती दिली होती. पंतप्रधान मोदींचा संभाव्य दौरा मेक इन इंडियासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील नवोन्मेष, संशोधन, तंत्रज्ञानालाही चालना मिळणार आहे. २०१७ नंतर पंतप्रधान मोदींचा इस्रायलला हा पहिलाच दौरा असणार आहे.
🚨Just In: Who is coming here next week? Narendra Modi…. there is a tremendous alliance between Israel and India, & we are going to discuss all sorts of cooperation….: Israeli PM Netanyahu pic.twitter.com/D5sElBM1bQ — OsintTV 📺 (@OsintTV) February 15, 2026
Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात २४-२५ फेब्रुवारीला इस्रायली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
Ans: पंतप्रधान मोदींच्या भेटीत भारत-इस्रायल मुक्त व्यापार करार, तसेच आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Ans: पंतप्रधान मोदींचा संभाव्य दौरा मेक इन इंडियासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील नवोन्मेष, संशोधन, तंत्रज्ञानालाही चालना मिळणार आहे.






