Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे… भारतात इतकी मोठी सोन्याची खाण? KGF पेक्षाही मोठा धमाका! तब्बल 50 टन सोनं; ठरणार देशातील सर्वात मोठा गोल्ड प्रोड्यूसर

भारतात तब्बल ५० टन सोन्याचा साठा सापडल्यामुळे एक राज्य अचानक चर्चेत आले असून, ते आगामी काळात भारतातील सर्वात मोठा सोने उत्पादक प्रदेश बनू शकते. नेमकं कोणतं आहे हे राज्य?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 20, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य:Chatgpt)

(फोटो सौजन्य:Chatgpt)

Follow Us
Follow Us:

सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. सोनं खरेदी न करण्याच आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यात आपल्याच भारतात सोन्याचा मोठा साठा असल्याची बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी गावात सोन्याचा मोठा साठा सापडला असल्याचं समोर येत आहे. ज्यामुळे येत्या काही वर्षांत हे राज्य देशातील सर्वात मोठे सोन्याचे उत्पादक राज्य बनणार आहे.

No Added Sugar पाहून तुम्हीपण ज्यूस खरेदी करताय? सावध व्हा… FSSAI ने केला कंपन्यांचा पर्दाफाश, काय नेमकं प्रकरण?

खाणकामासाठी चार प्रमुख ठिकाणे निश्चित

अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, या ठिकाणी अंदाजे ५० टन सोने असू शकते. राज्याचे खाण सचिव मुकेश कुमार मीना यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशात सोन्याच्या खाणकामासाठी चार प्रमुख ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये जोन्नागिरी, रामगिरी, जाववाकुला आणि चिगुरुकुंटा बिस्नाथम यांचा समावेश आहे. पण जोन्नागिरीमध्ये सर्वाधिक क्षमता असल्याचं नमुद करण्यात आलं आहे.

फक्त एक-तृतीयांश जमिनीवर १३ टन सोनं

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे १० वर्षांपूर्वी जोन्नागिरीमध्ये खाणकामासाठी १,५०० एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. व्यावसायिक सोने उत्पादन आधीच सुरू झाले आहे, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत केवळ ५०० एकर जमिनीचे अन्वेषण झाले असून, तिथे १३ टन सोने सापडेल असा अंदाज आहे. उर्वरित १,००० एकर जमिनीचे अन्वेषण पूर्ण झाल्यावर, एकट्या जोन्नागिरीमध्ये एकूण ५० टन सोने सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू या महिन्याच्या अखेरीस जोन्नागिरी सुवर्ण खाण प्रकल्पाचे अधिकृतपणे उद्घाटन करतील.

१ टन ढिगाऱ्यातून फक्त १ ग्रॅम सोनं

सोने काढणे हे सोपे काम नाही. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की यासाठी भरीव आर्थिक संसाधने आणि विशेष कौशल्याची आवश्यकता असते. म्हणूनच सरकारने हे काम खाजगी कंपन्यांना निविदा काढून सोपवले आहे. आणखी एक मोठे आव्हान म्हणजे खाणींमधून सोने काढण्याचा वेग मंदावला आहे. आजकाल, १ टन म्हणजेच १००० किलो ढिगारा किंवा कच्चा माल चाळल्यावर फक्त १ ग्रॅम सोने मिळते. पूर्वी, तेवढ्याच ढिगाऱ्यातून अंदाजे ३ ग्रॅम सोने मिळत असे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर १ टन ढिगाऱ्यातून ०.८ ग्रॅमपेक्षा कमी सोने मिळाले, तर उत्खननाचा खर्चही वसूल होत नाही.

‘या’ डिफेन्स स्टॉकचा Stock Market मध्ये धुमाकूळ! सरकारकडून मिळालंय तब्बल 425 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट

Web Title: Gold mine found in india 50 tonnes gold reserves see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Business News
  • Chandrababu Naidu
  • Gold
  • Gold mine
  • gold mines
  • Gold Rate
  • Marathi News

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.