Google Layoffs Marathi News: अमेरिकन टेक जायंट गुगलने पुन्हा एकदा आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. खर्च कमी करण्यासाठी गुगल आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वर आपले लक्ष वाढवत असल्याने ही कपात करण्यात आली आहे. वृत्तानुसार, कंपनीने त्यांच्या क्लाउड युनिटमध्ये डिझाइनशी संबंधित पदांवर काम करणाऱ्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.