Arihant Academy ची मोठी झेप! (Photo Credit- X)
३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी कंपनीचा एकूण महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील १०.१४ कोटी रूपयांच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी वाढून १४.५१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. या तिमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) १.८१ कोटी रूपये राहिला, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीमधील १.१३ कोटी रूपयांच्या तुलनेत ६० टक्के वाढ केली. यामधून प्रबळ आर्थिक कामगिरी दिसून येते, जी प्रबळ महसूल आणि प्रभावी खर्च व्यवस्थापनामुळे शक्य झाली.
३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त झालेल्या नऊमाहीसाठी अरिहंत अकॅडमीचा एकूण महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील ३२.५६ कोटी रूपयांच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढून ४८.७५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. या नऊमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) ५.७० कोटी रूपये राहिला, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील ३.४५ कोटी रूपयांच्या तुलनेत ६५ टक्के वाढ केली. यामधून कंपनीचा सातत्यपूर्ण विकास आणि ऑपरेशनल कार्यक्षमता दिसून येते.
या निकालांबाबत मत व्यक्त करत अरिहंत अकॅडमीचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल कपासी म्हणाले,
”आम्हाला ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त झालेली तिमाही व नऊमाहीसाठी प्रबळ कामगिरीची नोंद करण्याचा आनंद होत आहे. आमच्या निकालांमधून आमच्या शैक्षणिक व विस्तारीकरण धोरणाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी निदर्शनास येते. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या एकूण महसूलामध्ये ४३ टक्के वाढ झाली आहे, ज्यासह आमच्या कार्यसंचालनामधील व्याप्ती व शाश्वतता दिसून येते. गेल्या काही काळात अरिहंत अकॅडमीने मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आम्ही ७ नवीन केंद्रे (मुंबईमध्ये ४ व राजस्थानमध्ये ३) सुरू करत आमची उपस्थिती वाढवली, तसेच प्रमुख सूक्ष्म बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती अधिक दृढ केली आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीमध्ये वार्षिक जवळपास ३,५०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढ झाली, ज्यामधून आमच्या शैक्षणिक क्षमतेमध्ये होत असलेली वाढ दिसून येते. या विस्तारीकरणाला शिस्तबद्ध खर्च व्यवस्थापन आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेचे पाठबळ मिळाले, ज्यामुळे उत्तम मार्जिन कामगिरी आणि प्रबळ करोत्तर नफा वाढ संपादित करता आली. या तिमाहीमधील आमच्या कामगिरीने आमच्या हायब्रिड शैक्षणिक मॉडेलची क्षमता, आमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि विद्यार्थी व पालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास अधिक दृढ केला आहे. आम्ही विकासाच्या पुढील टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असताना विकासात्मक विस्तारीकरण, शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्व भागधारकांना शाश्वत मूल्य देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”
Google Layoffs Update: गुगलकडून ‘Exit Package’ योजना जाहीर! कर्मचाऱ्यांमध्ये वाढली अस्वस्थता






