नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : राज्यातील सर्व पीज कांसाठी टीओडी स्मार्ट मोटर बसविण्यात येत आहेत अकज वापराची नोंद घेणारे हे स्मार्ट मोटर सौर कालावधीत होगाया बीज वापराचीही नोंद येते. सौर कालावधीत होणाऱ्या विजेचा वापर सवलतीच्या दरात असल्याने त्याचे बिलीग स्मार्ट मीटरद्वारेच होते. (Electricity News) नांदेड परिमंडलात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्हयात २ हजार स्मार्ट बीज मोटर बन्यातले आहेत बिलींगसा सवलतीच्या दरातील वीजबिलांचा लाभ स्मार्ट मीटर धारकांना होती. सौर कालावधीतील वीज दर प्रति गुनिट ८० पैसे रुपांत कमी आहेत व तंत्रज्ञानानुसार आणि कालानुरूप विजेल्या मोटर मध्ये केही बदल केले जातात इलेक्ट इलेक्टोमॅग्नेटीक, इलेक्ट्रॉनिक मीटरनंतर आता डिजिटल आणि स्मार्ट मीटरचा कालखंड सुरु झालेला आहे. स्मार्ट मीटरची रिडींग ही मानवी हस्तक्षेपाशिवाय असणार असून ती अँटोमेटीक मीटर रिडींग प्रणालीवर अधारित आहे. (Nanded News)
त्यामुळे ग्राहकांच्या वापरांनुसारच त्याचे अचुक बिलींग होते. शिवाय, सौर ऊर्जेचे दर पारंपरिक विजेच्या तुलनेत कमी आहेत. सध्या सौरऊर्जा उत्पादन वाढत असल्याने सौर कालावधी अर्थात, दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या वीज वापरापोटी ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवठा करणे वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. दिवसाच्या कालावधीतील वीज वापर नोंदवणे टीओडी (टाईम ऑफ डे) स्मार्ट मीटरच्या माध्यमातूनच शक्य आहे.
हे देखील वाचा : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खलनायक का ठरवलंय जातंय? हसन मुश्रीफ यांचे विलिनीकरणाबाबत मोठं वक्तव्य
हिंगोली विभागात बसवले ४६ हजार मीटर
मागील काही महिन्यांपासून सर्व ग्राहकांच्या दारावर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम नांदेड परिमंडलात सुरु असून त्या अंतर्गत हिंगोली जिल्हयातील हिंगोली विभागात ४६ हजार, नांदेड जिल्हयातील भोकर विभागात २८ हजार ८८, देगलूर विभागात २५ हजार ८००, नांदेड शहरी विभागात ६७ हजार ५००, नांदेड ग्रामीण विभागात ४० हजार ७६६, परभणी जिल्हयातील परभणी विभागात ३६ हजार १७० तर सेलू विभागात १९ हजार ५८२ ग्राहकांच्या दारावर टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले आहेत. बसविण्यात येणारे मीटर्स हे प्री-पेड नसून जून्या पध्दतीनुसार वीज वापरनंतर एक महिन्यांनंतरच त्याचे बिल भरावयाचे आहे. स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या ग्राहकांना सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत देण्यात येते.
स्मार्ट मीटर पंधरवडा केला जातोय साजरा
त्यामुळे जून्या वीज मीटरच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविणे महावितरणसाठी अत्यावश्यक असल्याने नांदेड परिमंडलासह संपूर्ण राज्यात दि. ९ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘स्मार्ट मीटर पंधरवाडा’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत अधिकाधिक संख्येने ग्राहकांना स्मार्ट मीटर पुरविण्यात येणार आहेत. विजेचे स्मार्ट मीटर हे विनामूल्य असून त्याचा * ग्राहकांवर कुठलाही आर्थिक भूदंड पडणार नाही. सौर कालावधीतील वीज वापर नोंदीसाठी सौर मीटरच उपयुक्त असल्याने ग्राहकांची वीजबिलेही कमी होणार आहेत.
हे देखील वाचा : कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त
स्मार्ट मीटरमुळे सरासरी व अंदाजित बील आकारणीचे प्रमाणही शुन्यावर येत आहे. पर्यायाने वीज बिलांच्या तक्रारी संपुष्टात येतील. नेट मीटर प्रमाणेच घरातील किवा इमारतीमधील वीज वापर आणि छतावरील सौर प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेचे स्मार्ट मीटर मोजमाप करते. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेसाठी स्मार्ट मीटर अत्यंत उपयुक्त आहे.






