Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता? 3 Free Gas Cylinder आणि अकाऊंटमध्ये 3000 रुपये! ‘या’ सरकारचा मोठा निर्णय; कोणाला मिळणार लाभ?

Free Gas Cylinder Scheme : राज्य सरकारने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. तसेच खात्यात 3000 रुपये जमा होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 06, 2026 | 03:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 3 Free Gas Cylinder
  • अकाऊंटमध्ये 3000 रुपये!
  • ‘या’ सरकारचा मोठा निर्णय
Free Gas Cylinder Scheme : जागतिक पातळीवरील परिस्थिती पाहता सध्या महागाईचा भडका आणखीनच वाढणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. या सगळ्या परिस्थिती सर्वसामान्यांचं जीवन बरंच खडतर होणार आहे. पण या सगळ्यात एक सरकारने सर्वसामान्यांवरचा हा बोझा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. वाढत्या महागाईच्या काळात आणि वाढत्या दरांच्या काळात चक्क ३ सिलेंडर फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबत तुमच्या अकाऊंटमध्ये 3000 रुपयेपण ट्रान्सफर होणार आहेत. हा निर्णय नेमका कोणत्या सरकारने घेतला? आणि याचा लाभ कोण कोण घेऊ शकतं सविस्तर जाणून घेऊयात. ( Free Gas Cylinder Scheme ) 

Gen Z शी पंगा म्हणजे थेट सिस्टीम हॅक! McDonald च्या इंटर्नने थेट बॉसला केलं एक्सपोज; नेमकं प्रकरण काय?

या योजनेची घोषणा गोवा सरकारने केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन एलपीजी सिलिंडरच्या खर्चासाठी वार्षिक ३,००० रुपये मिळतील. गोवा सरकारने ‘गोवा उज्ज्वला योजना २०२६’ ला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, राज्यातील पात्र कुटुंबांना तीन घरगुती एलपीजी सिलिंडर किंवा पीएनजीच्या खर्चाएवढी, म्हणजेच वार्षिक ३,००० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. ही योजना २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा एक भाग होती. सरकारने जनतेला आश्वासन दिले होते की, दरवर्षी तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील.

कधी ट्रान्सफर होणार अकाऊंटमध्ये पैसे?

लाभार्थ्यांना ९ सप्टेंबरपासून त्यांच्या बँक खात्यात ३,००० रुपयांची वार्षिक रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. या सरकारी योजनेचा उद्देश दरवर्षी तीन LPG सिलिंडरचा खर्च भागवणे हा आहे. स्वतंत्र सिलिंडर देण्याऐवजी, सरकार ही रक्कम थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जे रहिवासी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे सादर करतील, त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळण्यास सुरुवात होईल.

अर्ज कसा करायचा?

गोव्याच्या या मोफत LPG/PNG सिलिंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू ठेवली आहे. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही अर्ज करु शकता.

  • जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात, नगरपालिका कार्यालयात किंवा तुमच्या भागातील स्थानिक आमदार (आमदार) कार्यालयात जा.
  • तेथून योजनेचा अधिकृत अर्ज मिळवा.
  • फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती जसे की अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, गॅस ग्राहक क्रमांक, गॅस एजन्सीचे नाव आणि बँक खात्याचे तपशील भरा.
  • सोबत गॅस/पीएनजी कनेक्शनची प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुक आणि मतदार ओळखपत्र तयार ठेवा.
  • भरलेल्या फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडा. नंतर त्याच पंचायत किंवा नगरपालिका कार्यालयातील काउंटरवर परत जमा करा. पोचपावती घ्यायला विसरू नका.

कोण करु शकतं अर्ज?

या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही. म्हणजेच सर्वसाधारण आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबंही यासाठी अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ केवळ एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांनाच नाही, तर घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस  कनेक्शन वापरणाऱ्या कुटुंबांनाही मिळणार आहे. लक्षात ठेवा की एका कुटुंबात एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असले तरी, योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबाला फक्त एक गॅस कनेक्शनवर दिला जाईल. सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेपासून दूर ठेवलेले नाही.

Layoffs News : बातमीमुळे खळबळ… Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का! तब्बल ‘इतक्या’ कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात

Web Title: Govt announces 3 free gas cylinder and 3000 rupees financial aid details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • BJP Government
  • Free LPG
  • Goa

संबंधित बातम्या

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले
1

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.