Inspiring Story: अपंगत्वाला हरवून 'या' फळांच्या (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Inspiring Farmer Story :आयुष्यात अडचणी सगळ्यांनाच येतात, पण त्या अडचणींना घाबरून न जाता त्यावर मात करणारे लोक खूप कमी लोक असतात. परंतू गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातल्या राहणारे गेनाभाई पटेल यांनी हार न मानता ते चक्क शेतीतून वर्षाला 1 कोटी रुपये कमावतात. अडचणींना घेऊन न बसता त्यासोबत मुकाबला करता आला पाहिजे याचे योग्य उदाहरण आहेत.Inspiring Story:
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातल्या गेनाभाई पटेल 62 वर्षांचे आहेत. त्यांना लोक प्रेमाने ‘अनार दादा’ म्हणतात. अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला. त्यामुळे दोन्ही पायांनी काम करणं बंद केलं. लहान वयातच अपंगत्व आलं. दुसरं कोणी असतं तर त्याने हार मानली असती. पण गेनाभाईंनी या अपंगत्वाला कधीच कमजोरी समजली नाही. उलट त्यांनी याच गोष्टीला आपली ताकद केली आणि यशाचे शिखर गाढले. आज ते डाळिंबाच्या शेतीतून वर्षाला 1 कोटी रुपये कमावतात.
गेनाभाईंचं कुटुंब आधी पारंपरिक शेतीच करायचं. गहू, जिरे, बाजरी, एरंडी असे धान्यांची शेती करत होते. त्यातून त्यांना वर्षाला 50 ते 80 हजार रुपये कसेबसे मिळायचे. त्यात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. तिथे जमिनीतलं पाणी 1000 फूट खाली गेलं होतं. गेनाभाईंना त्यांच्या पायामुळे शेतातलं जड काम करणं शक्यच नव्हतं. त्यांनी विचार केला की कमी पाण्यात कोणती शेती केली जाते.
यासाठी त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली, इंटरनेटवर माहिती घेतली. त्यांना कळलं की महाराष्ट्रात नाशिकला डाळिंबाची शेती होते आणि त्याला कमी पाणी लागतं. बाकीच्या शेतकऱ्यांशी बोलणं केल्यानंतर 2005-06 साली त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. नाशिकवरुन डांळिबाची रोपं आणली. प्रति रोप 5 रुपयांप्रमाणे 18 हजार रोपं आणली आणि आपल्या कोरड्या जमिनीवर डाळिंबाची रोप लावली.
सुरुवातीला गावकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले, मात्र त्यांनी डाळिंबासाठी एकदम शास्त्रीय पद्धत वापरली. जमिनीत खड्डे करून ते उन्हात उघडे ठेवले, जेणेकरून मातीतले खराब जिवाणू मरतील. पाणी वाचवण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन लावलं. जेणेकडून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जपून वापरला जाईल.
गेनाभाईंनी सर्वात भन्नाट कल्पना केली. त्यांनी ‘फ्रूट थिनिंग’. संकल्पना आणली. म्हणजेच.एका झाडावर फक्त 100 ते 125 चांगली फळंच ठेवली जातात. त्यामुळे जी फळं राहतात ती एकदम मोठी आणि चांगल्या क्वालिटीची होतात. ह सर्व प्रक्रिया सेंद्रीय शेतीमध्ये होते. त्यामध्ये शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत असतात. कोणतेही केमिकलचा वापर केला जात नाही.
आज त्यांना 12 एकरातून 1 कोटीचा फायदा होतो. एका एकरातून 12 टन डाळिंब मिळतं. 12 एकरातून वर्षाला 144 टन माल निघतो. आधी जिथे एका एकरातून 5 ते 10 हजार मिळायचे, तिथे आता 6 ते 8 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
एका किलोला 60 ते 70 रुपये दर मिळतो. त्यामुळे वर्षाला 96 लाख ते 1 कोटीचा टर्नओव्हर आहे.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना माल विकायला बाजारात जावं लागत नाही. मोठे व्यापारी स्वतः त्यांच्या शेतावर येतात आणि अख्खी बाग विकत घेतात. त्यांची डाळिंबं भारतातमध्ये नाहीतर, दुबई, मलेशिया, बांगलादेशला सुद्धा जातो.
गेनाभाईंनी फक्त स्वतःचं नाहीतर सगळ्या गावाचं भलं केलं आहे. त्यांनी आपल्या शेतातच ‘अनार शाळा’ सुरू केली आहे. तिथे ते शेतकऱ्यांना फुकट ट्रेनिंग दिले जाते. आतापर्यंत 80 हजार लोकांनी त्यांचं शेत बघितलं आहे तसेच 3 ते 4 लाख शेतकऱ्यांना त्यांनी शिकवलं आहे. त्यांच्यामुळे बनासकांठा, कच्छ आणि राजस्थानमध्ये 12 ते 14 हजार हेक्टरवर डाळिंबाची शेती सुरू झाली आहे.
गावातले रस्ते झाले, लोकांकडे ट्रॅक्टर आले, मुलं शिकायला लागली. त्यांच्या या कामासाठी 2017 साली राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.खरंच, एका अपंग माणसाने नापीक जमिनीतून सोनं पिकवून दाखवलं आहे.






