Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
काल संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा जोर होता. ‘गोविंदा आला रे आला’च्या आवाजात सगळं वातावरण दणाणून गेलं. मुंबई, ठाण्यात तर एकापेक्षा एक उंच मानवी मनोरे बघायला मिळाले. जय जवान गोविंदा पथकाकडे नागरिक गर्दी करुन पाहत होते. हे पथक नेहमीच काहीतरी विक्रम रचत . यंदा या पथकाचे 11 थर लावण्याचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र कालचा दिवस त्यांच्यासाठी चांगला नव्हता. गेल्या काही वर्षांपासून हे पथक 10 थर आरामात लावले. लोकांना वाटलं होतं की यंदा 11 थरांचा इतिहास घडेल. पण यंदा 10 थर पण लागले नाहीत. दिवसभरात चारवेळा त्यांनी 10 थर लावायचा प्रयत्न केला, पण चारही वेळा अपयश आलं. Jai JawanGovinda Pathak Dahi Handi 2026:
जय जवानच्या पोरांनी यंदा 11 थरासाठी खूप मेहनत घेतली होती. सकाळपासूनच त्यांचा जोश पाहायला मिळाला. सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी 10 थरांचा मनोरा बनवायचा प्रयत्न केला. खालून वरपर्यंत सगळे गोविंदा चढले, लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण शेवटी वर जाऊन तोल गेला आणि सगळा थर खाली कोसळला. दोन्ही वेळा हेच झालं. दुपारी एका ठिकाणी त्यांनी 9 थर लावले. 9 थर तर एकदम व्यवस्थित लागले. सगळ्यांना वाटलं चला आता सलामी होईल. सलामी देऊन खाली उतरताना अगदी शेवटच्या क्षणी तोल गेला आणि परत सगळं पडलं.
शेवटचा प्रयत्न त्यांनी ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीला केला. तिथे सुद्धा दोनवेळा 10 थर लावायचा प्रयत्न केला. परंतू तिथे पण तोच अनुभव आला. थर काही पूर्ण लागलाच नव्हते. दरवर्षी विक्रम करणारं पथक यंदा काहीच करू शकलं नाही, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नैराश्य पाहायले मिळाले. पथकामधील 20 गोविंदा आजारी असल्याचे पथक प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, यंदा आम्ही 4 महिने तयारी करत होते. रोज सरावाने 11 थर लागतीलच अशी पूर्ण तयारी होती. पण पावसाने सगळा प्लॅन बिघडवला.सततच्या पावसामुळे पथकातले जवळपास 20 मुख्य गोविंदा आजारी पडले. त्यातले काही तर मेन पोझिशनवर खेळणारे होते. खालच्या थरातले आणि वरच्या थरातले महत्त्वाचे खेळाडूच आजारी पडल्यामुळे सरावाला मोठा ब्रेक लागला. शेवटच्या काही दिवसात व्यवस्थित सरावच झाला नाही . त्यामुळे ऐनवेळी कॉम्बिनेशन बिघडलं आणि थर लागताना तोल सांभाळणं कठीण झालं.
पुढे ते म्हणाले की, खरं तर दहीहंडीत फक्त ताकदीचा नाही तर टीमवर्क आणि सराव खूप महत्त्वाचा असतो. एक जण जरी आजारी पडला तरी पूर्ण थरावर परिणाम होतो. इथे तर 20 जण आजारी होते. त्यामुळे जय जवानला यंदा अपेक्षित यश मिळालं नाही.पण हरकत नाही, खेळात हार-जीत होतच असते. जय जवानने आजपर्यंत खूप विक्रम केले आहेत आणि पुढे पण ते नक्कीच 11 थरांचा विक्रम करतील अशी आशा सगळ्यांना आहे. गोविंदा पथकांचं कौतुक यासाठीच आहे की पडले तरी परत उठून प्रयत्न करतात.






