Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! Akshaya Tritiya चा गोडवा महागला? बाजारपेठेत आंब्याची मोठी आवक, पण दर तब्बल…

शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळली असून ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आवडीच्या आंब्याला बसला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 18, 2026 | 01:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अक्षय तृतीयेचा गोडवा महागला!
  • अहिल्यानगरच्या बाजारपेठेत आंब्याची मोठी आवक
  • युद्धाच्या झळांमुळे दरात 400 रुपयांपर्यंत वाढ
अहिल्यानगर/पोपट पिटेकर : उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण साजरा होत आहे. या दिवशी घराघरात आम्ररस-पुरीचा बेत आखला जातो. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळली असून ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आवडीच्या आंब्याला बसल्याचे पाहायला मिळत आहे.

विविध जातींच्या आंब्यांची बाजारपेठेत रेलचेल

अहिल्यानगरच्या प्रमुख बाजारपेठेत कोकणासह इतर राज्यांतूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी आणि देवगड हापूस चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या हापूस आंब्याला सर्वाधिक मागणी आहे.

लालबाग आणि मैसूर: परराज्यातून आलेल्या या आंब्यांनीही बाजारपेठ व्यापली आहे.

पायरी: आम्ररसासाठी खास वापरल्या जाणाऱ्या पायरी आंब्याचीही खरेदी जोरात सुरू आहे.

आखाती युद्धाचा परिणाम आणि महागाईचा फटका

यंदा आंब्याचे दर ऐन सणासुदीत गगनाला भिडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्ध. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन दरात झालेले बदल आणि मालवाहतुकीवर झालेला परिणाम यामुळे आंब्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे भाव ४०० ते ७०० रुपयांनी वधारले आहेत.

आहूजा आंबा पेढीवर ग्राहकांच्या रांगा

शहरातील प्रतिष्ठित आणि जुनी ओळख असलेल्या ‘आहूजा आंबा पेढी’ मध्ये सकाळपासूनच ग्राहकांचा ओघ सुरू आहे. सण असल्याने दरात वाढ होऊनही नागरिक परंपरेनुसार आंबा खरेदीला प्राधान्य देत आहेत. दर्जेदार आंब्यासाठी ही पेढी ओळखली जात असल्याने येथे हापूस आणि देवगड आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

काय आहेत बाजारभाव?

सध्या बाजारपेठेत दोन डझनच्या पेटीचे दर खालीलप्रमाणे आहेत:

हापूस आंबा (साधारण): १४०० ते १६०० रुपये (दोन डझन)

देवगड हापूस (उच्च दर्जा): १८०० रुपये (दोन डझन)

“यंदा नैसर्गिक हवामानाचा फटका आणि आखाती देशातील युद्धाचा परिणाम यामुळे आंब्याचे दर मागील वर्षापेक्षा जास्त आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने आम्हालाही जादा दराने विक्री करावी लागत आहे. मात्र, अक्षय तृतीयेचा उत्साह असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत.”
– जगदीश आहूजा, प्रसिद्ध आंबा विक्रेते, अहिल्यानगर

वाढत्या महागाईनंतरही अहिल्यानगरकरांमध्ये सणाचा उत्साह कायम असून, उद्याच्या अक्षय तृतीयेसाठी घरोघरी आम्ररसाचा गोडवा चाखण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.

Web Title: Has the sweetness of akshaya tritiya become more expensive a massive influx of mangoes in the marketyet the prices are

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Alphonso Mango
  • Business News
  • Mango Rate
  • Marathi News
  • Market
  • raw mango

संबंधित बातम्या

Credit Card Limit: पगारापेक्षा जास्त का असते क्रेडिट कार्डची लिमिट? बँकांचा ‘हा’ गेम प्लॅन समजून घ्या
1

Credit Card Limit: पगारापेक्षा जास्त का असते क्रेडिट कार्डची लिमिट? बँकांचा ‘हा’ गेम प्लॅन समजून घ्या

Stock Tips : 4 दिवसांत 40% रिटर्न! ‘या’ मल्टिबॅगर शेअरवर ब्रोकरेजचा मोठा विश्वास
2

Stock Tips : 4 दिवसांत 40% रिटर्न! ‘या’ मल्टिबॅगर शेअरवर ब्रोकरेजचा मोठा विश्वास

New Song:  ‘राकेश राऊत प्रॉडक्शन’ आणि व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘माझे स्वामी समर्थ’ गाणं स्वामीभक्तांच्या मनावर करतंय
3

New Song: ‘राकेश राऊत प्रॉडक्शन’ आणि व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘माझे स्वामी समर्थ’ गाणं स्वामीभक्तांच्या मनावर करतंय

Share Market: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा झटका! ‘LTCG टॅक्स हटवण्याचा विचार नाही’; सरकारने स्पष्ट केलं चित्र
4

Share Market: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा झटका! ‘LTCG टॅक्स हटवण्याचा विचार नाही’; सरकारने स्पष्ट केलं चित्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.