एचडीएफसी लाईफ बँकेने तिमाहीत मिळवला 'इतका' नफा; वर्षाची सुरुवात झाली जोरदार!
एचडीएफसी बँक (एचडीएफसी लाईफ) या बँकेने आपल्या तिमाही सत्रातील व्यवसायात चांगलीच वाढ केली आहे. संचालक मंडळाने याबाबतची आकडेवारी जारी केली असून, यात एचडीएफसी लाईफ संचालक मंडळाने 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीसाठी पुनरावलोकन केलेल्या आर्थिक अहवालाला मान्यता दिली. एचडीएफसी लाईफ कंपनीने अनेक मेट्रीक्समध्ये लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे आता एचडीएफसी लाईफ कंपनीच्या चालू आर्थिक वर्षातील विकासाची गतीत वाढ पाहायला मिळत आहे.
आर्थिक वर्षाची सुरवात केली जोरदार
एचडीएफसी एचडीएफसी लाईफ कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्यवसायात चांगलीच वाढ केली आहे. याबाबत बोलताना कंपनीच्या सीईओ विभा पडळकर म्हणाल्या आहे की, “आम्ही वर्षाची सुरुवात जोरदारपणाने केली आहे. एचडीएफसी लाईफ कंपनीचा दोन वर्षाचा 21 टक्के सीएजीआर आहे. एचडीएफसी लाईफ कंपनीची ही मजबूत वाढ सर्व मेट्रीक्समध्ये आहे. त्यामुळे कंपनीचे काम अगदी जोरात सुरू आहे.”
याशिवाय आयआरडीएआयच्या प्रगतीशील सुधारणांच्या सकारात्मक प्रभावाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे भारतातील जीवन विमा प्रस्तावाला लक्षणीय बळकट करणे अपेक्षित आहे. कंपनीच्या व्यवसायवाढीमुळे हे काम सोपे, अधिक पारदर्शक आणि ग्राहकांसाठी अधिक आकर्षक होईल,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कोणत्या विकासात झालीये वाढ
एचडीएफसी लाईफने मार्केट शेयरचा विस्तार केला आहे. कंपनीच्या खासगी बाजाराचा हिस्सा 16.4 टक्केवरुन 17.1 टक्के इतका वाढला आहे. वैयक्तिक डब्लूआरपीमध्ये एकूण बाजार हिस्सा 11.4 टक्केपर्यंत वाढला आहे. रिटेल सम ॲश्युर्ड ग्रोथमध्येही एचडीएफसी लाईफने मोठा व्यवसाय केला. रिटेल सम ॲश्युर्ड ग्रोथमध्ये कंपनीने तब्बल 46 टक्के वाढ केली आहे.
दरम्यान, विम्याच्या पटीत वाढ केल्यामुळे कंपनीला नक्कीच फायदा झाला आहे. मजबूत रायडर अटॅचमेंट आणि किरकोळ बचतीत 28 टक्के वाढीमुळे मोठी मदत झाली. करानंतरचा नफा तब्बल 15 टक्क्यांनी वाढून तो 478 कोटी इतका झाला. तर बॅकबुक सरप्लसमध्ये 18 टक्के वाढ झाली. व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता 22 टक्के वाढीसह 3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. बोनस घोषणा 22 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना 3 हजार 722 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च बोनस घोषित करण्यात आला आहे.






