Nashik Police News The Burden On Ambad Police Station Will Be Reduced The Wait For The New Midc Police Stations Jurisdiction Is About To End
Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार
जुलै २०१५ मध्ये गृह मंत्रालयाने पोलिस ठाणे मंजूर करुनही महासंचालक कार्यालयाची मंजूरी व हद्दनिश्वितीअभावी अद्यापही 'बुंचाळे चौकी मध्ये 'मिनी पोलिस ठाणे' अंतर्गत कामकाज सुरू आहे.
Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या 'एमआयडीसी' ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार
Follow Us:
Follow Us:
नाशिककरांच्या ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याच्या हद्दीचा पेच लवकरच सुटणार
१५ व्या ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याच्या कामकाजाला वेग
एमआयडीसी पोलिसांच्या हद्दनिश्चितीचा प्रश्न ऐरणीवर
Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद निश्चितीची अधिसूचना अद्याप प्रसिद्धच झालेली नाही. त्यामुळे सध्या तक्रारदाराला गुन्हा दाखल करण्यासाठी अंबड पोलिस ठाण्यात तर तपासाकामी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावे लागते. ‘एमआयडीसी’ पोलिसांच्या हद्दीत अंबड एमआयडीसी, घरकूल योजना, दत्तनगर, वरचे चुंचाळे, खालचे चुंचाळे, रामकृष्णनगर, आझादनगर, संजीवनगर, नवनाथनगर, म्हाडा कॉलनी, जाधव संकुल, मेदगेनगर, तिराडशेत, बेळगाव ढगा हा परिसर समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
जुलै २०१५ मध्ये गृह मंत्रालयाने पोलिस ठाणे मंजूर करुनही महासंचालक कार्यालयाची मंजूरी व हद्दनिश्वितीअभावी अद्यापही ‘बुंचाळे चौकी मध्ये ‘मिनी पोलिस ठाणे’ अंतर्गत कामकाज सुरू आहे. सिंहस्थापूर्वी ठाणे मंजुरीला मान्यता मिळाल्याने आता हद्दनिश्चितीनुसार पुढील कामकाजाला वेग येणार आहे. त्यानुसार शहरात सध्या तेरा पोलिस ठाणे व एक सायबर पोलिस ठाणे कार्यरत असून, नव्याने पंधराव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याची हद निश्चित होत आहे.
शासनाकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत प्रस्ताव
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, संबंधित पोलिस ठाण्यांचे सध्याचे व तत्कालीन निरीक्षकांच्या मदतीने हदनिश्चितीचा प्रस्ताव आयुक्तालयाने सादर केला होता. हा प्रस्ताव आता शासनाकडील अंतिम मंजुरीच्या प्रतिक्षेत असून, महासंवालक कार्यालयाच्या सूचनेनुसार आयुक्तालयाने ‘एमआयडीसी’ पोलिस ठाणे निर्मिती व पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
२८ मार्च २०२३ रोजी चुंचाळे चौकी स्वतंत्र, १० एप्रिल रोजी चौकीचे उद्घाटन.
१० ऑक्टोबर २०२२ रोजी तत्कालीन पालकमंत्री भुसे यांनी पोलिस ठाणे मंजुरीची ग्वाही दिली.
१३ मे २०२५ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरीबाबत चर्चा.
८ जुलै २०२५ रोजी गृह विभागाच्या आदेशान्वये पोलिस ठाण्याला मंजुरी.
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी महासंचालक कार्यालयातून पदनिर्मितीसह खर्चाला मंजुरी.
Web Title: Nashik police news the burden on ambad police station will be reduced the wait for the new midc police stations jurisdiction is about to end