मंत्री नितेश राणे (फोटो- सोशल मीडिया)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप जिंकला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा दणदणीत विजय
मंत्री नितेश राणेंनी दिली प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग: आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहे. त्यात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे दिसून येत आहे. कोकणात देखील भाजपने चांगली कामगिरी केली आहे. मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्गमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे. त्यावर आता नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले, “सिंधदुर्गमधील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जे मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. सत्तेच्या माध्यमातून शेवटच्या भागापर्यन्त विकास करण्याचे काम आम्ही करू शकू. ”
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठामध्ये आणि महाविकास आघाडीत भाजपला हरवण्याची ताकद नाही. पांच अपक्ष निवडून आले आहेत. त्यांचा भाजप बंडखोर असा उल्लेख हवे तर करू शकतो. महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढलो.” सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने चांगले यश प्राप्त केले आहे.
दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६ दरम्यान नियुक्त करण्यात आलेले तब्बल ११९ कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याने मतदान प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार गंगापुरात उघड झाला आहे. या प्रकरणी स्वीप कक्ष प्रमुख अरविंद कापसे यांच्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार
नेमके प्रकरण काय?
निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ४, ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी गैरहजेरी लावल्याने मतदान व्यवस्थापन विस्कळीत झाले. मतदान केंद्रांवर मनुष्यबळाची कमतरता निर्माण होऊन प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे तपास करत असून दोषी आढळल्यास कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई होणार आहे.






