एचडीएफसी लाइफकडून 11 टक्के मार्केट शेअरची नोंद, नवीन बिझनेस प्रीमियममध्ये 31 टक्क्यांची वाढ!
एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या सहामाहीसाठी स्वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारला आहे. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्ये मोठी वाढ केली असून, सकारात्मक गती राखली आहे. नवीन बिझनेस प्रीमियममध्ये (वैयक्तिक एपीई) प्रबळ ३१ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
काय आहेत ठळक वैशिष्ट्ये
– उच्च-स्तरीय वाढ : नवीन बिझनेस प्रीमियममध्ये (वैयक्तिक एपीई) प्रबळ ३१ टक्के वाढीची नोंद केली आहे. ज्याला विक्री करण्यात आलेल्या पॉलिसी आणि संतुलित उत्पादन संयोजनामध्ये २२ टक्के वाढीचे पाठबळ मिळाले आहे.
– मार्केट शेअर : खाजगी क्षेत्र मार्केट शेअर (वैयक्तिक डब्ल्यूआरपी) ६० बीपीएसने वाढून, १६.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ज्याद्वारे एकूण मार्केट शेअर सर्वोच्च ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
– नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) १७.४ टक्क्यांनी वाढून १,६५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले. ज्यामधून लाभदायी व्यवसायावरील फोकस दिसून येतो.
– अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) : एयूएम ३० सप्टेंबर २०२४ रोजी ३.२५ लाख कोटी रूपये राहिले. ज्यामध्ये आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत २३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
– सातत्यता : १३ व्या व ६१ व्या महिन्याचे सातत्यता प्रमाण अनुक्रमे ८८ टक्के आणि ६० टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. ज्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत मटेरिअलमध्ये अनुक्रमे १२० बेसिस पॉइण्ट्स व ७३० बेसिस पॉइण्ट्सची वाढ झाली आहे. यामधून कंपनीची ग्राहकांसोबत संलग्न होण्यासोबत त्यांना कायम ठेवण्याची क्षमता दिसून येते.
– एम्बेडेड व्हॅल्यू (ईव्ही) ने तिमाहीदरम्यान ५०,००० कोटी रूपयांचा टप्पा पार करण्यासोबत ईव्हीवरील कार्यरत परताव्यामध्ये १६.० टक्क्यांची नोंद केली, यामधून पॉलिसीधारक आणि शेअरधारकांसाठी स्थिर दीर्घकालीन मूल्य निर्मिती दिसून येत आहे.
– आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत ९११ कोटी रूपयांचा करोत्तर नफा (पीएटी) संपादित करण्यात आला. ज्यामध्ये वार्षिक १५ टक्के वाढीची नोंद करण्यात आली आहे.
– सॉल्वन्सी रेशिओ १८१ टक्के राहिला आहे. जो नियामक थ्रेशोल्ड १५० टक्क्यांपेक्षा जास्त होता. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी १,००० कोटी रूपयांच्या अधीनस्थ कर्ज वाढीनंतर सॉल्वन्सी १९२ टक्के राहिले आहे.
– एचडीएफसी पेंशन फंड मॅनेजमेंट एचडीएफसी लाइफची पूर्णत: मालकीची उपकंपनी आणि भारतातील सर्वात मोठी खाजगी पेंशन फंड मॅनेजर आहे. या कपंनीने आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत असेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये १ लाख कोटी रूपयांचा टप्पा गाठत मोठी उपलब्धी संपादित केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विधान
एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या आहे की, ”खाजगी क्षेत्र आणि एकूण उद्योगाने दुसऱ्या तिमाहीमधील प्रबळ वाढ कायम ठेवली आहे. तसेच आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत वैयक्तिक भारित प्राप्त प्रीमियम बेसिसमध्ये अनुक्रमे २४ टक्के आणि २१ टक्के वाढीची नोंद केली. याच कालावधीदरम्यान बॅंकेने २८ टक्क्यांची आणि २ वर्ष सीएजीआर बेसिसवर १९ टक्क्यांची वाढ करत खाजगी क्षेत्राला मागे टाकले आहे.
१ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सुधारित नियमनांचे पालन करत ४० हून अधिक टॉप उत्पादने यशस्वीरित्या रिलाँच केली आहेत. ज्यांनी व्यवसायामध्ये जवळपास ९५ टक्क्यांचे योगदान दिले आहे. तसेच बॅंक तिमाहीदरम्यान इतर उत्पादने देखील रिलाँच करणार आहे. नवीन उत्पादन नियमनांशी संलग्न होण्याकरिता तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यासाठी आम्ही नियामकांचे आभार व्यक्त करते. असेही त्यांनी म्हटले आहे.
आम्ही शाश्वत विकासाला चालना देण्यावर आणि प्रमुख विभागांमधील आमचे नेतृत्व अधिक प्रबळ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासोबत गतीशील बाजारपेठेत स्थिर राहण्याची खात्री घेण्यासाठी ग्राहक-केंद्रित इनोव्हेशन्समध्ये गुंतवणूक करत राहू. आम्हाला भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य देण्याप्रती आमच्या क्षमतेवर विश्वास आहे. तसेच आम्ही गतीशीलता व स्थिरतेसह बदलत्या बाजारपेठेत स्थितीशी जुळवून घेत राहू.” असेही त्यांनी म्हटले आहे.