प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक पाणीपुरीचा गाडा दिलत आहे. गाड्यावर ग्राहकांची गर्दी दिसत आहे. पण पाणीपुरी विक्रेता एका वेगळ्याच स्टईलमध्ये दिसत आहे. पाणीपुरी विक्रेत्याने काळे हिरोटाई कपडे घातले असून त्याच्य हातात एक कॉम्बॅट गन आहे. ही एक खेळण्यातली गन असून पाणीपुरीवाला त्यामध्ये पाणी भरुन लोकांच्या तोंडात पिचकारी मारत आहे. आधी त्याने पाणीपुरीत बटाटा आणि उसळ टाकू ठेवली आणि गनने थेट लोकांच्या तोंडात तिखट आणि गोड पाण्याची पिचकारी सोडत आहे. याला लोकांनी जनरेशनल झेड पाणीपुरी स्टाईल म्हटले आहे. अगदी अॅडव्हेंनचर पद्धतीने लोक पाणीपुरी एन्जॉय करत आहेत. त्याची पाणीपुरीची गाडी देखील अगदी हटके स्टाईलमध्ये तयार केलेली आहे.
संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले
व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
A post shared by Sakshi Gadhave | Food ,Travel & Experiences (@victual_diaries)
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @victual_diaries या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर एका नेटकऱ्याने आता स्वच्छतेची कोणालाच काळजी वाटत नाहीय अशी टीका केली आहे, तर दुसऱ्या एकाने होळी स्पेशल आहे का असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने भाई बघूनच एवढं मजेशीर वाटतेय असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






