फोटो सौजन्य - Social Media
त्रियुगीनरायण, जिथे स्वतः शंकर आणि देवी पार्वती यांचे प्रेमविवाह झाले, त्या पवित्र ठिकाणी मराठी अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकरचा लग्न पार पडला. काही गाजावाजा नाही, काही जल्लोष नाही अगदी सध्या वेदिक पण मराठी स्वरूपात त्या दोघांचे लग्न पार पडले. या लग्नानंतर, अक्षया-विशालने एक छानशी व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली.
काय आहे या व्हिडिओमध्ये?
विशाल आणि अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्या दोघांनी लग्नानंतर असणाऱ्या त्यांच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ते दोघे फार भावुकही दिसत आहेत. देवाच्या नावाने व्हिडीओ सुरु करतात आणि लग्न झाल्याची गोड बातमी चाहत्यांना देतात. तसेच त्यानंतर अक्षया विशालला कसं वाटतंय असं विचारते तेव्हा विशाल तिच्या कपाळाचा मुका घेऊन छान वाटतं आहे असं म्हणतो तसेच आता नवीन एक जबाबदारी आल्यासारखं वाटतंय. ते व्हिडिओमध्ये कुठे लग्न केलं? त्या ठिकाणाविषयी सांगतात. तसेच ते गेल्या ७ वर्षांपासून नात्यात असल्याचे जाहीर करतात. त्यांच्या या नात्याला यश त्रियुगीनारायण या पवित्र ठिकाणी आले.
विशाल अगदी गोड आवाजात म्हणतो की माझी बायको फार सुंदर दिसतेय. तेव्हा अक्षयाही त्याला दाद देते आणि विशाल म्हणतो की ‘संसाराची सुरुवात करतोय’ आणि दोघे जण गालातल्या गालात लाजतात आणि हसू लागतात. हे गोड क्षण दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. आणि कॅप्शनमध्ये ‘सुखं’ इतकंच पण त्यांच्या मनातल्या भावना लिहल्या आहेत.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
हे सुंदर क्षण पाहून मराठी लहान पडद्यावरील अनेक कलाकारांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दिग्गज कलाकारांनी या दोघांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. चाहत्यांना या दोघांची लग्न करण्याची पद्धत फार भावली आहे त्यामुळे त्यांच्याकडून कौतुक आणि अभिनंदन तर मोठ्या प्रमाणातच होत आहे, त्याचबरोबर त्यांचे कौतुकही मोठ्या प्रमाणात होत आहे.






